सीतास्वयंवर (नाटक)
Appearance
सीतास्वयंवर | |
लेखन | विष्णूदास भावे |
भाषा | मराठी |
विषय | रामायणातील सीतास्वयंवराचे आख्यान |
निर्मिती वर्ष | १८४३ |
दिग्दर्शन | विष्णूदास भावे |
गीत | विष्णूदास भावे |
सीता स्वयंवर हे १८४३ साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी आधुनिक नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णूदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले होते. नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' झाला.
पार्श्वभूमी
[संपादन]विष्णूदास भाव्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारी सेवेत होते. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' / यक्षगान करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी विष्णूदास भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीतास्वयंवर नाटक उभारले. ५ नोव्हेंबर, १८४३ रोजी चिंतामणराव पटवर्धनांच्या दरबारात नाटकाचा पहिला खेळ रंगला.