Jump to content

लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
Aeropuerto Internacional de Los Cabos
आहसंवि: SJDआप्रविको: MMSD
SJD is located in मेक्सिको
SJD
SJD
मेक्सिकोमध्ये लोस काबोस विमानतळाचे स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक ग्रुपो एरोपोर्तुआरियो देल पॅसिफिको
स्थळ सान होजे देल काबो, बाहा कालिफोर्निया सुर
समुद्रसपाटीपासून उंची ३७४ फू / ११४ मी
गुणक (भौगोलिक) 23°09′06″N 109°43′15″W / 23.15167°N 109.72083°W / 23.15167; -109.72083
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
16/34 ९,८४३ ३,००० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ३३,८७,४०० १२.२%
स्रोत: ग्रुपो एरोपोर्तुआरियो देल पॅसिफिको

लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SJDआप्रविको: MMSD) मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया सुर राज्याच्या सान होजे देल काबो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ सान होजे देल काबोसह काबो सान लुकास शहर आणि बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.

या विमानतळात तीन टर्मिनले तर चार काँकोर्स आहेत. टर्मिनल १ वर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे तर टर्मिनल ३ वर आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. प्रवाशांच्या वर्दळीनुसार मेक्सिकोमधील सातव्या क्रमांकाचा असलेल्या या विमानतळातून २०१३मध्ये ३३,८७,४०० प्रवाशांनी ये-जा केली. मागील वर्षापेक्षा १२.२% अधिक असलेल्या या संख्येतून बाहा कालिफोर्नियातील वर्दळीची कल्पना येते. या विमानतळावर सध्या मोठा ताण पडत असून अनेकदा विमानांना जागा मिळणे कठीण होते.

सप्टेंबर १५, इ.स. २०१४ रोजी सान होजे देल काबो शहर व या विमानतळाला हरिकेन ओडिल या चक्रीवादळाने तडाखा दिला. प्रचंड वेगाच्या वाऱ्याने विमानतळावर थांबवलेली विमाने जागची हलून एकमेकांवर आदळली. विमानतळ अनेक दिवस बंद ठेवण्यात आला होता व त्यामळे हजारे प्रवासी येथे अडकून पडले होते. मेक्सिकोच्या सरकारने या प्रवाशांना येथून विनामूल्य तिहुआना, माझात्लान, ग्वादालाहारा आणि मेक्सिको सिटी येथील विमानतळांवर पोचवून तेथून पुढच्या प्रवासाची सोय केली तसेच परदेशी नागरिकांना त्यांच्या वकीलातींशी संपर्क साधण्यासही मदत केली.

विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एरोमेक्सिको मेक्सिको सिटी
मोसमी: न्यू यॉर्क-जेएफके[]
1
एरोमेक्सिको कनेक्ट मेक्सिको सिटी, माँतेरे 1
एर कॅनडा मोसमी: कॅल्गारी, व्हॅनकूवर 1
एर कॅनडा रूज मोसमी: टोरोंटो-पीयरसन 1
एर ट्रॅन्सॅट मोसमी: कॅल्गारी, माँत्रियाल-पिएर त्रुदू, सास्काटून, व्हॅनकूवर 1
अलास्का एरलाइन्स लॉस एंजेलस, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ)
मोसमी: पोर्टलँड (ओ), सिॲटल-टॅकोमा
2
अमेरिकन एरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेलस
मोसमी: शिकागो-ओ'हेर
2
ॲपल व्हेकेशन्स - फ्रंटियर एरलाइन्सद्वारा संचलित मोसमी: कॅन्सस सिटी[] 2
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, सॉल्ट लेक सिटी
मोसमी: डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, सान डियेगो (२० डिसेंबर, २०१४ पासून), सिॲटल-टॅकोमा (२० डिसेंबर, २०१४ पासून)[]
2
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी 2
फ्रंटियर एरलाइन्स डेन्व्हर 2
इंटरजेट ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, मेक्सिको सिटी-तोलुका 1
मॅग्निचार्टर्स माझात्लान, मेक्सिको सिटी 1
साउथवेस्ट एरलाइन्स बाल्टिमोर (१३ जून, २०१५ पासून),[] डेन्व्हर, ऑरेंज काउंटी
मोसमी: ऑस्टिन
2
स्पिरिट एरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, ह्युस्टन-आंतरखंडीय (७ मे, २०१५ पासून),[] सान डियेगो 2
सन कंट्री एरलाइन्स मोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल[] 1
सनविंग एरलाइन्स मोसमी: कॅल्गारी, एडमंटन, माँत्रियाल-पिएर त्रुदू, ऑटावा, रेजायना, सास्काटून, टोरोंटो-पीयरसन, व्हॅनकूवर, व्हिक्टोरिया, विनिपेग 2
युनायटेड एरलाइन्स डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेलस, न्यूअर्क
मोसमी: ऑस्टिन, शिकागो-ओ'हेर, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस (२० डिसेंबर, २०१४ पासून)[]
1
युनायटेड एक्सप्रेस ह्युस्टन-आंतरखंडीयl 1
यूएस एरवेझ शार्लट, फीनिक्स 1
व्हर्जिन अमेरिका सान फ्रांसिस्को 2
विवाएरोबस कुलिआकान, ग्वादालाहारा, माँतेरे
मोसमी: मेक्सिको सिटी
1
व्होलारिस कुलिआकान, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, माँतेरे, तिहुआना 1
वेस्टजेट कॅल्गारी, व्हॅनकूवर
मोसमी: एडमंटन, केलोव्ना, विनिपेग
2

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Aeromexico Announces New Services from New York City". 2013-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-११-२७ रोजी पाहिले.
  2. ^ http://www.applevacations.com/flight-schedule/mci-kansas_city/
  3. ^ http://airlineroute.net/2014/05/26/dl-sea-nov14/
  4. ^ "संग्रहित प्रत". 2015-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-18 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.chron.com/business/article/Spirit-Airlines-to-add-10-new-nonstop-flights-at-5893355.php
  6. ^ http://www.suncountry.com/reservations/routemap.shtml
  7. ^ "UNITED Adds मोसमी Washington - San Jose/Los Cabos Service from late-Dec 2014". २०१४-०७-१५ रोजी पाहिले.