साउथवेस्ट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साउथवेस्ट एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
साउथवेस्ट एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
WN
आय.सी.ए.ओ.
SWA
कॉलसाईन
SOUTHWEST
स्थापना १६ मार्च १९६७
मुख्य शहरे बॉल्टिमोर-वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिकागो मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळ
डॅलस लव्ह फील्ड
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ
हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
लास व्हेगास आंतरराष्ट्रीय विमानतळ
नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळ
फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ
सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ
टँपा आंतरराष्ट्रीय विमानतळ
ह्युस्टन हॉबी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर रॅपिड रिवॉर्ड्स
विमान संख्या ६४६
ब्रीदवाक्य If it matters to you, it matters to us
मुख्यालय डॅलस, टेक्सास
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले साउथवेस्ट एरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान

साउथवेस्ट एरलाइन्स (इंग्लिश: Southwest Airlines) ही अमेरिका देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. कमी दरात प्रवासी विमानसेवा पुरवणारी साउथवेस्ट ही जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. अमेरिकेच्या एकूण ९१ शहरांमध्ये रोज ३,४०० सेवा पुरवणारी साउथवेस्ट देशांतर्गत प्रवासी संख्येत अमेरिकेमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.

विमानांचा ताफा[संपादन]

सद्य[संपादन]

साउथवेस्ट एरलाइन्सने कटाक्षाने आपला ताफा एकाच प्रकारच्या विमानांचा ठेवलेला आहे. आपली सगळी विमाने बोईंग ७३७ प्रकारची[१][२] असल्याने त्यांची निगा राखणे, देखभाल करणे तसेच आयोजन करणे सोपे जाते.

साउथवेस्ट एरलाइन्सचा विमानताफा
प्रकार संख्या मागण्या ऑप्शन प्रवासी नोंदी
बोईंग ७३७-३०० १२७ १३७
१४३
२०२०पर्यंत निवृत्त होतील[३]
बोईंग ७३७-५०० १२ १२२ २०१६पर्यंत निवृत्त होतील[४]
बोईंग ७३७-७०० ४४७ २० ३७ १४३ या मागण्या -८००मध्ये परिवर्तित करता येतील
बोईंग ७३७-८०० ९५ २६ १७५
बोईंग ७३७ मॅक्स ७ ३०
अजून माहिती नाही
२०१९मध्ये ताफ्यात दाखल होतील[५]
बोईंग ७३७ मॅक्स ८ १७० १९१
TBA
२०१७मध्ये ताफ्यात दाखल होतील[६]
एकूण ६८१ २४८ २२८

साउथवेस्ट एरलाइन्स कडे जगात सर्वाधिक बोईंग ७३७ प्रकारची विमाने आहेत. पैकी -३००, -५०० आणि -७०० उपप्रकारांची विमाने सर्वप्रथम साउथवेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती तसेच -मॅक्स ७ आणि -मॅक्स ८ उपप्रकारांची विमानेही सर्वप्रथम साउथवेस्टकडेच येतील.[७] २०१२मध्ये एरट्रान एरवेझ खरेदी केल्यावर त्या ताफ्यातील ७३७ प्रकारची विमाने साउथवेस्टच्या ताफ्यात शामिल करण्यात आली तर बोईंग ७१७ प्रकारची विमाने हळूहळू डेल्टा एर लाइन्सला विकण्यात आली.[८][९]

साउथवेस्टच्या ताफ्यातील -३०० विमानांमध्ये आधुनिक फ्लाइट डेक आणि विंगटिप लावण्यात येतात. याने ही विमाने -७०० उपप्रकारांच्या अगदी सारखी होउन देखभालीचा खर्च कमी होते. याशिवाय साउथवेस्टने अंगिकारू पाहिलेल्या जीपीएस प्रणालीशी ही विमाने सुसंगत होण्यासही मदत होते.[१०][११] साउथवेस्टने -८०० उपप्रकाराची विमाने ११ एप्रिल, २०१२ रोजी दाखल केली. यात इतर विमानांपेक्षा ३८ किंवा अधिक जादा प्रवासी बसू शकतात.[१२] ही विमाने ईटॉप्स प्रमाणित असून त्यात बोईंक स्काय इंटिरियर प्रकारची अंतर्रचना आहे.[१३]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ "Southwest Airlines – Details and Fleet History – Planespotters.net Just Aviation". Archived from the original on 2012-01-25. October 6, 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Corp Fact Sheet 1Q13.pdf. "Southwest Corporate Fact Sheet - Corporate Fact Sheet - Southwest Airlines Newsroom". Archived from the original on 2018-07-04. 2013-10-06 रोजी पाहिले.
  3. ^ रीड बिझनेस इन्फोर्मेशन लिमिटेड. "Southwest outlines retirement plan for older 737s". फ्लाइटग्लोबल.कॉम. April 3, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ Reed Business Information Limited. "Southwest outlines retirement plan for older 737s". flightglobal.com. April 3, 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Southwest Launches 737 MAX 7, Converts 30 737 NG Orders". May 15, 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "Southwest converts 20 737s to Max".
  7. ^ "बोईंगने ५,०००वे ७३७ साउथवेस्टला सुपूर्त केले.[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २०१२-०१-२५ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  8. ^ "साउथवेस्ट एरलाइन्स न्यूझरूम: पत्रके,Swamedia.com" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-11-16. December 19, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "डेल्टाच्या ताफ्यात लहान जेट विमानांच्या ऐवजी बोईंग ७१७ दाखल" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2019-04-21. October 5, 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "बोईंग प्रेस रिलीझ, २२ डिसेंबर, २००८[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). December 22, 2008. August 22, 2011 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ [१][मृत दुवा]
  12. ^ "साउथवेस्ट एरलाइन्स न्यूझरूम - पत्रके". 2012-03-21. Archived from the original on 2013-12-17. 2013-07-29 रोजी पाहिले.
  13. ^ लोरीरॅन्सन (December 15, 2010). "पहिले ७३७-८०० साउथवेस्टकडे मार्च २०१२मध्ये येईल" (इंग्लिश भाषेत). January 25, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)