व्हर्जिन अमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हर्जिन अमेरिका ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील बर्लिंगेम शहरात स्थित विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे तळ सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत. या कंपनीची एक चतुर्थांश मालकी व्हर्जिन ग्रूप या रिचर्ड ब्रॅन्सनच्या कंपनीकडे तर उरलेली तीन चतुर्थांश मालकी व्हीएआय पार्टनर्सकडे आहे.

२०१६मध्ये अलास्का एर ग्रूपने ही कंपनी विकत घेण्याची घोषणा केली. २०१७ च्या सुरुवातीपर्यंत ही कंपनी अलास्का एरलाइन्समध्ये विलिन होईल.