Jump to content

कॅस्पियन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅस्पियन समुद्र
endorheic lake, salt lake, सरोवर, समुद्र
ह्याचा भागMediterranean Sea Area संपादन
बहिर्वाहकिंमत टाकलेली नाही संपादन
Drainage basinCaspian Sea Basin संपादन
पाणलोट क्षेत्रामधील देशरशिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, अझरबैजान संपादन
याचे नावाने नामकरणKassites संपादन
देशइराण, रशिया, कझाकस्तान, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान संपादन
Located in/on physical featureAral–Caspian Depression संपादन
भौगोलिक गुणक४२°०′०″N ५०°३०′०″E संपादन
Map

कॅस्पियन समुद्र (अझरबैजानी: Xəzər dənizi, फारसी: دریای خزر or دریای مازندران, रशियन: Каспийское море, कझाक: Каспий теңізі, चेचन: Paama Xord, तुर्कमेन: Hazar deňzi) हा पृथ्वीवरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे (पृष्ठभागच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने). कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे सरोवर किंवा एक वेगळा समुद्र ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल) इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व ७८,२०० किमी (१८,८०० घन मैल) इतके पाण्याचे घनफळ असलेल्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला इराण, पश्चिमेला अझरबैजान तर पूर्वेला तुर्कमेनिस्तानकझाकस्तान हे देश आहेत. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापाशी कॉकासस पर्वतरांगेची सुरुवात होते. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.

वोल्गा नदी, उरल नदीकुरा नदी ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे. कॅस्पियन हे नाव मुळात कॅस्पियन ह्या लोकांपासून मिळाले आहे. जुन्या काळात ग्रीक आणि पर्शियन लोकं कॅस्पियन समुद्राला हैरकॅनीयन समुद्र म्हणून उल्लेखित असत. आजच्या काळात पर्शियात माझानदरान सागर असे हे उल्लेखले जाते.

कॅस्पियन समुद्राचा नकाशा
Stenka Razin (Vasily Surikov)