संतोष राम
संतोष राम | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक ,लेखक, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | २००८-चालू |
पुरस्कार | आयरिस, इनोसेंटी फिल्म फेस्टिव्हल, इटली |
संतोष राम हे भारतीय लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. वर्तुळ (लघुपट) (२००९), गल्ली (२०१५) आणि प्रश्न (२०२०) या लघुपटांसाठी ते मोठ्या प्रमाणावर ओळखले जातात . त्यांना जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत . वर्तुळ (लघुपट) [१] त्यांचा पहिला लघुपट "वर्तुळ" [२] हा ५६ चित्रपट महोत्सवांमध्ये निवडला गेला , त्या चित्रपट महोत्सवामध्ये वर्तुळने १३ पुरस्कार पटकावले आहेत . "प्रश्न" या लघुपटला फिल्मफेअर लघुपट पुरस्कार २०२० साठी नामांकन मिळाले होते .संतोष राम यांना फ्लोरेन्स, इटली येथे युनिसेफ इनोसेंटी चित्रपट महोत्सव २०२१ मध्ये " प्रश्न "च्या लेखनासाठी विशेष उल्लेखनिय आयरिस पुरस्कार मिळाला आहे .
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]संतोष चा जन्म डोंगरशेळकी, महाराष्ट्र येथे झाला. राम उदगीर [३] येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आहेत . [४]
कारकीर्द
[संपादन]संतोष [५] २००९ मध्ये [६] लेखन आणि दिग्दर्शन करून चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. त्यांचा पहिला मराठी भाषेतील लघुपट वर्तुळ (लघुपट) हा त्यांनी ३५ मिमी रीळ वर शूट केला. वर्तुळ (लघुपट) ५६ हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवडला गेला ज्यात ११ व्या ओसियन्स सिनेफॅन चित्रपट महोत्सव २००९ [७] , नवी दिल्ली, ३रा आंतरराष्ट्रीय माहितपट आणि लघुपट महोत्सव केरळ २०१० , ८वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव [८]२००९ मुंबई आणि १७ वा टोरंटो रील आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १०१३ (कॅनडा) इ आहेत . वर्तुळ तेरा पुरस्कार विजेता लघुपट आहे . त्यांचा दुसरा लघुपट गल्ली (२०१५) हा १३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवडला गेला .त्याचा प्रश्न [९] फिल्मफेअर लघुपट पुरस्कार २०२० [१०] आणि जगभरातील ३६ चित्रपट महोत्सवांसाठी [११] निवडला गेला आहे, ज्याने सतरा पुरस्कार जिंकले आहेत.
चित्रपट सूची
[संपादन]वर्ष | भाषा | दिग्दर्शक | लेखक | निर्माता | टिप्पणी | |
---|---|---|---|---|---|---|
२००९ | वर्तुळ (लघुपट) | मराठी | होय | होय | नाही | ५३ चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड. १४ पुरस्कार विजेता |
२०१५ | गल्ली | मराठी | होय | होय | होय | तेरा चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड |
२०२० | प्रश्न[१२] | मराठी | होय | होय | नाही | चौतीस चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड |
२०२४ | युवराज आणि शहाजहानची कथा | मराठी, हिंदी | होय | होय | होय | लघुपट |
२०२६ | चायना मोबाईल [१३] | मराठी | होय | होय | होय |
पुरस्कार
[संपादन]वर्तुळ २००९
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - चौथा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०१०, चेन्नई.
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - दुसरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नागपूर २०११
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - पुणे लघुपट महोत्सव २०११, पुणे
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - ६ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव २०१३,गोवा
- सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट - मलबार लघुपट महोत्सव २०१३
- चित्रपट निर्मितीतील उत्कृष्टते साठी प्रशंसा पुरस्कार- कन्याकुमारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१३, कन्याकुमारी
- ज्युरी विशेष उल्लेख -नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१४, नवी मुंबई
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - बार्शी लघुपट महोत्सव २०१४
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - पहिला महाराष्ट्र लघुपट महोत्सव २०१४
- नामांकित - महाराष्ट्र टाइम्स अवॉर्ड्स २०१०
प्रश्न २०२०
- नामांकन - सर्वोत्कृष्ट लघुपट - फिल्मफेअर पुरस्कार २०२०
- सर्वोत्कृष्ट लघुपट - 3रा व्हिंटेज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२०
- सर्वोत्कृष्ट लघुपट - चौथा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२१
- सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट - बेतिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२०
- सर्वोत्कृष्ट लघुपट विशेष सन्माननीय उल्लेख - स्प्राउटिंग सीड इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, २०२०
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - चौथा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२१
- सर्वोत्कृष्ट पटकथा - चौथा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२१
- सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपट विशेष उल्लेख - १४वा सायन्स लघु आणि माहितीपट चित्रपट महोत्सव, २०२१
- सर्वोत्कृष्ट लघुपट - सहावा बंगाल आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, २०२१
- स्पेशल ज्युरी मेन्शन अवॉर्ड - नववा स्मिता पाटील माहितीपट आणि लघुपट महोत्सव , पुणे.
- सर्वोत्कृष्ट कथा - म. टा. लघुपट महोत्सव २०२२. , मुंबई
- "दुर्गम भागात शिक्षणाच्या विकासासाठी" लघु वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा डिप्लोमा.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "साकारले प्रयत्नांचे 'वर्तुळ'". archive.loksatta.com. 2021-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-29 रोजी पाहिले.
- ^ "Vartul to be screened at Third Eye Asian Film Festival". archive.indianexpress.com.
- ^ "वर्तूळ - एक अनुभव". misalpav.com.
- ^ "Cinema that can't escape reality". thehindu.com.
- ^ "Showcasing Maharashtra's rural milieu like no other filmmaker". thehindu.com.
- ^ "His Cinema doesnot escape reality". issuu.com/thegoldensparrow/docs.
- ^ "'Vartul' to be screened at Osian's-Cinefan film festival". deccanherald.com.
- ^ "UNICEF Innocenti Film Festival tells stories of childhood from around the world". Unicef.org.
- ^ "Prashna (Question) – Social Awareness Short Film". Filmfare.com.
- ^ "Online programme". migrationcollective.com.
- ^ "Online programme". migrationcollective.com.
- ^ "Short Film Review: Prashna (Question, 2020) by Santosh Ram". asianmoviepulse.com.
- ^ "संतोष राम दिग्दर्शित 'चायना मोबाईल' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण". divyamarathi.bhaskar.com.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील संतोष राम चे पान (इंग्लिश मजकूर)