Jump to content

शेलवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?शेलवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .४४३४९ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,७०७ (२०११)
• ३,८४९/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• एमएच४८

शेलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर चिकूवाडीनंतर हे गाव लागते. पुढे वाघोबा खिंड आहे. पालघरपासून हे गाव पाच किमी अंतरावर आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४४९ कुटुंबे राहतात. एकूण १७०७ लोकसंख्येपैकी ८७७ पुरुष तर ८३० महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.९२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.५९ आहे तर स्त्री साक्षरता ५३.०२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २६३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १५.४१ टक्के आहे. येथे मुख्यतः आदिवासी राहतात.ते छोट्या प्रमाणावरची शेती करतात व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून काम करतात; अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालनसुद्धा करतात.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. दिवसभर ऑटोरिक्शा मिळतात.

जवळपासची गावे

[संपादन]

बीरवाडी, सातपाटी, धनसार, देवखोप, नंडोरे, अंबाडी, वरखुंटी, कमारे, हरणवाळी, वडराई, माहीम ही जवळपासची गावे आहेत.अंबाडी आणि शेलवाडी ही गावे शेलवाडी ग्रामपंचायतीमध्ये येतात.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/