Jump to content

देवखोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवखोप भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

  ?देवखोप

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२५
• महा ४८

भौगोलिक स्थान

[संपादन]

भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे पालघर स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर डाव्या बाजूला फुटणाऱ्या रस्त्याने येथे जाता येते. पालघरपासून ६ किमी अंतरावर पूर्वेला हे गाव वसलेले आहे.गावालगत पाणी साठविण्यासाठी देवखोप धरण बांधलेले आहे त्यामुळे वर्षभर पाणीपुरवठा होतो.येथे ३.२८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता असलेला लघु पाटबंधारा आहे.[]

लोकजीवन

[संपादन]

येथे मुख्यतः आदिवासी समाजातील लोक पूर्वीपासून स्थायिक आहेत.येथील लोक शेतमजुरी तसेच विविध प्रकारच्या पालघर येथील कारखान्यात नोकरी करतात. मोजक्या जणांच्या जमिनी आहेत ते भातशेती, तसेच फुलभाज्या, पालेभाज्या, इत्यादी व्यवसाय करतात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरी सुविधा

[संपादन]

सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, रस्तेवीज ग्रामपंचायत पुरविते. पालघर रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी देवखोप एसटी बस नियमितपणे चालू असते. पालघर रेल्वे स्थानकातून मनोर,वाडा,भिवंडी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस देवखोप तिठ्यावर थांबतात. डमडम, रिक्षा, सुद्धा दिवसभर उपलब्ध असतात.

संदर्भ

[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक ६ जुलै २०२४