शीनिंग
Appearance
| शीनिंग 西宁市 |
|
| चीनमधील शहर | |
| देश | |
| प्रांत | छिंगहाय |
| क्षेत्रफळ | ७,५९६ चौ. किमी (२,९३३ चौ. मैल) |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ७,४६४ फूट (२,२७५ मी) |
| लोकसंख्या | |
| - शहर | २४,६७,६९५ |
| - घनता | ३२० /चौ. किमी (८३० /चौ. मैल) |
| प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
| अधिकृत संकेतस्थळ | |
शीनिंग (देवनागरी लेखनभेद : लानझोऊ चिनी: 西宁市) ही चीन देशातील पश्चिम भागातील छिंगहाय प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर तिबेटच्या पठारावरील सर्वात मोठे शहर असून ते ह्वांगशुई नदीच्या काठावर वसले आहे. २०२० साली शीनिंग शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख होती.
वाहतूक
[संपादन]चीनला मध्य आशियासोबत जोडणारे शीनिंग हे एक महत्त्वाचे प्रादेशिक वाहतूककेंद्र आहे. येथून बीजिंग-ल्हासा महामार्ग, ज्यांग्सू-शिंच्यांग महामार्ग असे अनेक देशव्यापी महामार्ग धावतात. लानचौ-उरुम्छी हा १,७७६ किमी लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्ग शीनिंगमधूनच धावतो. तसेच छिंगघाय–तिबेट रेल्वे शीनिंगला तिबेटची राजधानी ल्हासासोबत जोडते.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील शीनिंग पर्यटन गाईड (इंग्रजी)
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-01-22 at the वेबॅक मशीन. (चिनी भाषेत)
