ल्हासा
ल्हासा 拉萨 |
|
चीनमधील शहर | |
देश | चीन |
राज्य | तिबेट |
स्थापना वर्ष | ७ वे शतक |
महापौर | डोजे सेझुग |
क्षेत्रफळ | ५२ चौ. किमी (२० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११,९७५ फूट (३,६५० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २,५७,४०० |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.lasa.gov.cn/ |
ल्हासा हे चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. तिबेटच्या पठारावरील लोकसंख्येच्या मानाने शिनिंग शहराच्या पाठोपाठ ल्हासा हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. ल्हासा शहर समुद्रसपाटीपासून ३४९० मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच शहरांपैकी एक आहे.
१७ व्या शतकापासून ल्हासा हे तिबेटचे प्रशासकीय आणि धार्मिक केंद्र आहे. पोताला महाल, जोखांग मंदिर, नोरबुलिंका पॅलेस यांसारखी अनेक तिबेटी बौद्ध संस्कृतीची अतिमहत्तवाची स्थानके ह्या शहरात आहेत.
व्युत्पत्ती
[संपादन]'ल्हासा' शब्दाचा अर्थ 'देवतांचे स्थान' असा होतो. प्राचीन तिबेटी पत्र आणि शिलालेखांपासून असे दिसून येते की ह्या ठिकाणाचे नाव 'रासा' असे होते. 'रासा' हे नाव 'रावे सा' ह्या नावाचा अपभ्रंश असावा. 'रावे सा'चा अर्थ 'कुंपण घातलेली जागा' असा होतो. ह्यावरून अशी शक्यता निर्माण होते की, ल्हासा शहराच्या ठिकाणी मूलतः तिबेटच्या राज्यकर्त्यांचे शिकारीचे उद्यान असावे. इ.स. ८२२ मध्ये चीन आणि तिबेट ह्यांच्यात झालेल्या 'जोवो' मंदिरासंबंधीच्या करारात ल्हासा हे नाव प्रथम आढळते.
भूगोल
[संपादन]ल्हासा शहराची उंची साधारण ३५०० मीटर असून स्थान तिबेटन पठाराच्या मध्यभागी आहे. शहराभोवती ५५०० मीटर्सपर्यंत उंचीचे पर्वत आहेत. येथील हवेत समुद्रसपाटीच्या प्रमाणाच्या मानाने केवळ ६८% ऑक्सिजन आहे. शहराच्या दक्षिण भागातून 'क्यी' नदी वाहते. ल्हासाचे वार्षिक सरासरी तापमान ८ °C इतके आहे आणि वार्षिक पर्जन्यमान ५०० मि.मी. इतके आहे.
अतिउच्चतेमुळे ल्हासा शहराची हवा थंड व कोरडी आहे. हिवाळे थंड व उन्हाळे सौम्य असतात. तरी खोऱ्यातील स्थान तीव्र वारे आणि थंडीपासून शहराचे रक्षण करते. वर्षाला सरासरी ३००० तास सूर्यप्रकाश शहराला लाभतो.