विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा २
ध्येय आणि धोरणांशी संबंधित चालू चर्चा
[संपादन]- चर्चा:वि.वा. शिरवाडकर#दत्तक नाव येथे वडीलांच्या नावाबद्दल चर्चा सुरू केली आहे. कृपया आपले मत तेथे नोंदवावे. -- अभय नातू (चर्चा) १९:०५, २० नोव्हेंबर २०१७ (IST)
दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव
[संपादन]हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. याची नोंद विकिपीडिया:प्रचालक आणि विकिपीडिया:प्रशासक या पानांवर केलेली आहे. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.
नि:संदिग्धीकरण
[संपादन]@Mahitgar आणि अभय नातू: नि:संदिग्धीकरण पाने ही नि:संदिग्धीकरण या वर्गाव्यतिरीक्त अन्य वर्गातही असावीत यासाठी मराठी विकिपीडियाचे काही वेगळे धोरण आहे काय ? -- संतोष दहिवळ (चर्चा) ०९:५६, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)
- मी नि:संदिग्धीकरणात मुख्यत्वे मथळा साचेच लावले आहेत. नि:संदिग्धीकरण पानात काय काय असणे अधिक उचीत असेल. याबाबत मागे फार चर्चा झाली असेल असे वाटत नाही तरी एकदा चर्चा पानांचा ढोबळ शोध घेतलेला बरा असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५६, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)
लेखाधिकार (कॉपीराईट) संबंधित
[संपादन]जर मी विकी ची ध्येयधोरणे न वाचता एखाद्या लेखाधिकारित संकेतस्थळावरून माहिती कॉपि पेस्ट केलेले असेल तर काय होऊ शकते ?
- उपरोक्त सही न केलेले लेखन बहुधा -सदस्य:Swapnil mangalvedhekar यांनी केले आहे.
- आपल्या प्रश्न विचारण्याचा मुख्य हेतु लक्षात आला नाही, तरी जेवढे जमेल तेवढे उत्तर देतो.
- जिथ पर्यंत विकिपीडियाचा संबंध आहे. कुणी प्रताधिकार विषयक अधिकृत आक्षेप नोंदवून प्रचालकांचे लक्ष वेधल्यास असे लेखन / छायाचित्र वगळले जाते. शक्य असल्यास संबंधीत सदस्यांना पुढे चालून तसे न करण्याची त्यांच्या व्यक्तीगत सदस्य चर्चापानावर बऱ्याचदा विनंतीही केली जाते. इतर वेळी शंका आलेल्या मजकुरावर कॉपीपेस्ट हा टॅग लावला जातो. असे टॅग लावलेले लेखन सहसा स्वत: कॉपीपेस्टरने सुधारणे अभिप्रेत असते अर्थात इतर इच्छुक सदस्यही यात सहभागी होऊ शकतात. कॉपीराईट मुख्यत्वे मांडणी आणि लेखन शैलीमुळे निर्माण होत असतो त्यातील वस्तुनिष्ठ फॅक्ट्सवर नसतो हे लक्षात घेणे गरजेचे असते; लिखीत मजकुरातील आलंकारीकता विशेषणे वगळून स्वत:च्या भाषेत पुर्नलेखन करून मुळ लेखनाचा संदर्भ दिल्यास बहुतांष लिखीत मजकुरा बद्दल समस्या सहजतेने सोडवणे शक्य असते. (अर्थात असे करणे शक्य असते, म्हणून "हेतुपुरस्सरच्या कॉपीपेस्टींगला उत्तेजन दिले जात नाही", हेही लक्षात घ्यावे). छायाचित्रात बदल करणे शक्य नसते कॉपीराईट परवाना नसलेली छायाचित्रे वगळण्याशिवाय बहुतांश वेळा पर्याय नसतो.
- प्रताधिकार विषयक अधिकृत आक्षेप नोंदवण्याचे अपवादात्मक तुरळक प्रसंग घडले आहेत. सहसा संबंधीत मजकुर वगळल्या नंतर संबंधीत व्यक्तींनी मराठी विकिपीडियाचे महत्व लक्षात घेऊन कॉपीपेस्टर सदस्यांचा कायदेशीर पाठपुरावा केल्याचे अद्यापतरी पाहण्यात नाही पण कॉपीराईट असलेल्या संबंधीतांचे कायदेशीर आधिकार चांगलेच सबळ असतात त्यामुळे सरसकट कॉपीपेस्टींगचा विचार टाळलेला बरा . कॉपीपेस्टींग अथवा कॉपीपेस्टरची कोणतीही जबाबदारी विकिपीडिया घेत नाही हे येथे लक्षात घ्यावे. आपला उद्देश कितीही चांगला असला तरीही खाया पिया कुछ नही गिलास फोडा बारा आना अशी आपली स्थिती होणार नाही याची प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी.
- मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणावरच्या कॉपीपेस्टींग हतोत्साहीत करणाऱ्या काही चांगल्या संपादन गाळण्या आणि नवागतांना शक्य तिथे मार्गदर्शनाची चांगली परंपराही आहे.
- कॉपीपेस्टरने केलेल्या प्रताधिकारभंगाची कोणतीही जबाबदारी इतर कुणीही घेत नाही ती केवळ संबंधीतांची आपापसातली असते. अधिक माहिती करता विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार पहावे.
- आणखी एक महत्वाचे आंतरजालावर बऱ्याच ठिकाणी मोफत उपलब्ध असे लिहिले जाते (एक प्रकारची धूळफेक) पण तरीही त्यांचे कॉपीराईट शाबूत असतात आणि त्याचे कॉपीपेस्टींग (कॉपीराईट फ्री करण्याचा स्पष्ट परवाना नसल्यास) अवैध असते.
- आपला शंका विचारण्याचा नेमका उद्देश समजला नाही. आपणास स्वत:चे कॉपीराईटेड लेखन कॉपीपेस्टेड झालेले आढळल्यास ते आपण स्वत:ही वगळू शकता अथवा इतर जाणत्या सदस्यांना याच पद्धतीने विनंती करू शकता. मराठी विकिपीडीयास कॉपीपेस्टेड लेखनाची आवश्यकता नाही. आंतरजालावर जे लेखन उपलब्ध आहे ते जसेच्या तसे मराठी विकिपीडीयावर आणण्यात मराठी विकिपीडियांच्या वाचंकांना नवे काहीच मिळत नाही. शिवाय असे कॉपीपेस्टेड लेखन जसेच्या तसे येथील अभिप्रेत ज्ञानकोशीय लेखन शैलीत बसतही नाही. त्यामुळे तुरळक झालेले न लक्श्ःआत आलेले कॉपी पेस्टींगही काळाच्या ओघात सहसा कुणी न कुणी ज्ञानकोशीय रुपात आणते आणि सहसा कॉपीराईटच्या समस्येतून मुक्तता होते.
- आपणास अजून काही माहिती शंका साहाय्य हवे असल्यास जरूर कळवावे. आम्ही आपणास सर्वतोपरी साहाय्य करू.
- आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन आणि वाचन होत राहो ही शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२५, ७ मे २०१४ (IST)
व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षकलेखन संकेतांत प्रस्तावित बदल
[संपादन]हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.
मराठी विकिपीडिया धोरणे
[संपादन]नमस्कार,
मराठी विकिपीडियावर वेळोवेळी अनेक धोरणे ठरविण्यात आलेली आहेत. ती सगळी धोरणे, नियम, संकेत, इ.चे एकत्रीकरण झालेले दिसत नाही.
असे एकत्रीकरण करण्यास मदत हवी आहे.
कृपया येथे किंवा माझ्या चर्चा पानावर संदेश द्यावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:२९, २१ फेब्रुवारी २०१५ (IST)
मुखपृष्ठ सदर लेख निकष
[संपादन]हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.
नमस्कार,
मराठी विकिपीडियावर मुखपृष्ठ सदर लेख म्हणून निवड होण्यासाठी किमान निकष लावावे असा माझा प्रस्ताव आहे. हे निकष सर्वसंमतीने (किमान बहुमताने तरी) निवडावे. खाली मी काही निकष प्रस्तावित करीत आहे. यावर आपले मत द्यावे तसेच इतरही निकष सुचवावे ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:४९, २४ फेब्रुवारी २०१५ (IST)
निकष
[संपादन]१. आकार - किमान ८,१९२* बाइट.
२. साचे - किमान एक साचा. शक्यतो माहितीचौकट स्वरूपातील.
३. चित्रे - माहितीचौकट साच्यातील चित्राखेरीज किमान १ चित्र.
४. संदर्भ - किमान ३* संदर्भ. हे संदर्भ ब्लॉग किंवा सोशल मीडियांवरील नसावेत.
५. वर्गीकरण - किमान १* वर्ग.
६. लाल दुवे - ५* पेक्षा जास्त नसावेत.
७. व्यक्तिगत दृष्टिकोन - नसावा.
८. आंतरविकि दुवे - शक्यतो विकिडेटा कलम असावे. क्वचित हे दुवे नसले तरी चालतील.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) चे निती निर्धारण
[संपादन]मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल. रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी चर्चा करावी.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा या पानावर आणणे शक्य नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक बरे पडेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४२, १३ मे २०१५ (IST)
मराठी विकिपिडीयावर चित्रपटांच्या लेख शीर्षकाचे धोरण ठरवण्या बाबत
[संपादन]मराठी विकिपिडीयावर शीर्षक लेखनाचे नियम वेळोवेळी आपण करत आलेलो आहे. येथे चित्रपटाच्या लेखांच्या शीर्षकाचे सर्वसमावेशक धोरण ठरवण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव मांडीत आहे.
पूर्वार्ध:
[संपादन]नजीकच्या काळात चित्रपटांच्या शीर्षकान बाबत नामांतराची काही उदाहरणे
१) लेख आघात (१९८५ हिंदी चित्रपट) ह्यास ज यांनी आघात (१९८५ सालचा हिंदी चित्रपट) असे नामांतरित केले. पुढे अभय नातू यांनी त्यास पुन्हा आघात (१९८५ हिंदी चित्रपट) असे पुन्हा हलवले
२) लेख अनंतयात्रा (१९८५ हिन्दि चित्रपट) ह्यास अभय नातू यांनी अनंतयात्रा (१९८५ चित्रपट) असे नामांतरण केले
मतितार्थ :
[संपादन]नजीकच्या काळातील वरील दोन्ही उदाहरणावरून मराठी विकिपिडीयावर चित्रपटांवरील लेख नावांच्या संकेताचे धोरण ठरवण्याची गरज आहे आसे वाटते जेणे करून वारंवार एकाच काम करण्याचे श्रम वाचतील आणि लेख नावांमध्ये पण सुसूत्र बद्धता येईल.
प्रस्ताव :
[संपादन]मराठी विकिपिडीयावर चित्रपटांच्या वरील लेख लिहित असतांना त्याचे शीर्षक लेखन करतांना खालील निकष पाळावेत
चित्रपटांच्या वरील लेखनावाचे ४ भाग असावेत १) चित्रपटाचे नाव २) चित्रपट प्रदाशित झाला ते साल (वैकल्पिक ) ३) चित्रपट कोणत्या भाषेतील आहे ती भाषा ४) चित्रपट हा शब्द
वरील ४ भागांपैकी चित्रपटाचे नाव वगळता बाकी २,३,४ हे कौन्सात लिहावे
उदारणार्थ : आघात (१९८५ हिंदी चित्रपट)
स्पष्टीकरण :
[संपादन]१) चित्रपटाचे नाव - हा लेखाचा अनिवार्य भाग आहे ज्याने लेखास ओळखले जाईल
२) चित्रपट प्रदाशित झाला ते साल (वैकल्पिक ) - अनेकदा कालांतराने एकाच नावाचे अनेक चित्रपट निर्माण होतात (जसे देवदास , डॉन, गोलमाल ....वैगरे) तेव्हा त्यांना संबोधण्या साठी प्रदाश्नाचे साल वापरता येईल. लेख बनवीत असतांना प्रदर्शनाचे वर्ष अचूक माहिती असण्याची श्याक्याता कमी वाटत असल्यास ह्यास वैकल्पिक ठेवता येईल
३) चित्रपट कोणत्या भाषेतील आहे ती भाषा - आज काल अनेक मराठी, हिंदी चित्रपटांना मोठ्या प्रमाणात इंग्रजी नवे दिली जातात ( जसे "टाईम पास" हा मराठीतील प्रसिद्ध चित्रपट आहे ) आणि एकाच नावाची दक्षिण भारतीय भाषां मधील चित्रपटांचे पुनर्निर्माण हिंदीत केले जाते. तेव्हा ह्या सर्व बाबींचे संयोजन करण्यासाठी चित्रपटाची भाषा शीर्षकात असणे हा अनिवार्य भाग असावा
४) चित्रपट हा शब्द - विश्वकोशिय शीर्षक लेखन संकेता प्रमाणे शेवटी चित्रपट असे लिहावे
'वरील प्रस्तावावर आपण आपल्या सूचना , बदल, विचार मांडून चित्रपटांच्या लेखाचे शीर्षक लिहिण्याचे मराठी विकिपिडीयावरील धोरण ठरवण्यात सहभाग द्यावा - राहुल देशमुख ११:०४, ९ ऑगस्ट २०१५ (IST)
संदर्भ : इतर विकीन वरील चित्रपटाच्या शीर्षक लेखनाचा तौलनिक अभ्यास.
- माझे मत व्यक्तीविषयक लेखांच्या शीर्षकाबाबत होते तेच येथेही आहे. शीर्षक शक्यतो संक्षिप्त असावे. जेथे चित्रपटाच्या नावाचा इतर कोणताही लेख अस्तित्वात यायची शक्यता नाही तेथे फक्त चित्रपटाचे नावच पुरे. उदा. अशी ही बनवाबनवी. हे ना कोणत्या पुस्तकाचे नाव असू शकते किंवा ह्या नावाचा इतर कोणत्या भाषेत चित्रपट देखील नाही. तेव्हा इथे केवळ नावच पुरे. आता देवदास नावाची कादंबरी देखील आहे व देवदास नावाचे अनेक चित्रपट देखील निघाले आहेत. तेव्हा देवदास (२००२ चित्रपट) असे नि:संदिग्धीकरण करणे योग्य ठरेल. जेथे एकाच नावाचे चित्रपट दोन किंवा अधिक भाषांमध्ये आहेत तेव्हा भाषेचा उल्लेख शीर्षकात करणे सयुक्तिक ठरेल. उदा: गजनी. ह्या नावाचे हिंदी व तामिळ भाषिक चित्रपट आहेत म्हणून गजनी (२००५ तमिळ चित्रपट) किंवा गजनी (२००८ हिंदी चित्रपट) असे करावे.
- सरसकट सर्व चित्रपटांच्या शीर्षकांमध्ये भाषा व साल घालण्याचा आग्रह चुकीचा वाटू शकतो. अर्थात शीर्षके ओढूनताणून लांबलचक करण्याचा अट्टाहास धरणारे येथे आहेतच हे वेगळे सांगायला नको. - अभिजीत साठे (चर्चा) १८:४९, ९ ऑगस्ट २०१५ (IST)
- इतर म्हणजे कोणत्या विकिंवर ही पॉलिसी अस्तित्वात आहे? इंग्लिशवर मी वर वर्णन केले तेच कन्व्हेन्शन पाळले जाते. Naming conventions (films)
पूर्वी या विषयावर चर्चा होउन साधारणपणे खालीलप्रमाणे निकष ठरले होते. त्यात किरकोळ बदल स्पष्टीकरण करुन येथे दिले आहेत --
१. चित्रपटलेखाचे शीर्षक शक्य तितके लहान असावे.
२. चित्रपट लेखाचे शीर्षक १००% निःसंदिग्ध असावे.
याकरता खालील संकेत पाळले जातात (जावे अशी अपेक्षा आहे/होती) --
१. जर चित्रपटाचे नाव पूर्णतः निःसंदिग्ध असेल तर फक्त नावाचा लेख असावा, उदा. कयामत से कयामत तक
२. जर एकाच नावाचे एकाधिक चित्रपट दोन भाषांत, दोन वर्षी, दोन माध्यमांत किंवा इतर कोणत्याही बाबतीत संदिग्ध असेल तर ते निःसंदिग्ध होण्यासाठी शीर्षकात वाढ करावी, उदा. ट्वेल्व अँग्री मेन (१९५७ चित्रपट), ट्वेल्व अँग्री मेन (१९९७ चित्रपट) किंवा घनचक्कर (मराठी चित्रपट), घनचक्कर (हिंदी चित्रपट), टू किल अ मॉकिंगबर्ड (कादंबरी), टू किल अ मॉकिंगबर्ड (चित्रपट), इ.
३. जेथे नुसते नाव संदिग्ध आहे तेथे निःसंदिग्धीकरण पाने तयार करावीत किंवा प्रत्येक लेखात गल्लत साचा किंवा हे सुद्धा पहा या उपशीर्षकाखाली इतर शीर्षकांचा उल्लेख करावा.
३. अधिक निःसंदिग्धीकरण करणाऱ्या शीर्षकांपासून पुनर्निर्देशने असण्यास काहीच हरकत नाही, किंबहुना तशी करावीत, उदा. ट्वेल्व अँग्री मेन (१९५७ चित्रपट), ट्वेल्व अँग्री मेन (१९५७ इंग्लिश चित्रपट), ट्वेल्व अँग्री मेन (इंग्लिश १९५७ चित्रपट), ...
मी वरील उल्लेखिलेली स्थानांतरणे या संकेतांनुसारच केली होती. मराठी विकिपीडियावरील सगळेच चित्रपटविषयक लेख या संकेतांनुसार आहेत असे नाही परंतु बव्हंश तसे आहेत आणि उरलेले या संकेतात आणावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०८:०६, १० ऑगस्ट २०१५ (IST)
राज्य मराठी विकाससंस्थेसाठी विकिपीडिया कार्यशाळा घेणाऱ्यां सदस्यांसाठी 'खाते विकसक' पदानुमती
[संपादन]नमस्कार,
१ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ आणि तदनंतर पुढेही विवीध विद्यापिठे आणि महाविद्यालयातून 'विषयतज्ञांसोबत कार्यशाळा' स्वरुपाच्या कार्यशाळा घेण्याचे राज्य मराठी विकास संस्थेने योजीले आहे. कार्यशाळेत किमान ४० ते ५० विद्यार्थ्यांची उपस्थितीवर भर रहाणार आहे. अशा सर्व नविन विद्यार्थ्यांची सदस्यांची खाती कार्यशाळेच्या दिवशी वेगाने तयार करता यावीत या साठी राज्य मराठी विकास संस्थेत कार्यरत सुशान्त देवळेकर (योगायोगाने मराठी विकिपिडीयाचे माहित असलेल्या सर्वात जुन्या दोन सदस्यांपैकी एक असण्याचा मान जातो) त्यांचे सद्य सदस्य खाते सदस्य:सुशान्त देवळेकर यांना खाते विकसक म्हणून पदानुमती दिली जावी व विकिपीडिया प्रशासकांनी (स्वीकृती अधिकारी) प्रस्ताव ठेवलेल्या विद्यापिठ/ महाविद्यालयांमधील कार्यशाळा समन्वयक प्राध्यापक सदस्यांना दोन वर्षाचे कालावधीसाठी खाते विकसक म्हणुन पदानुमती दिल्या जाव्यात; एखाद्या खाते विकसक खात्याचा अभिप्रेतेतर उपयोग झाल्यास मराठी विकिपीडिया प्रशासक (स्वीकृती अधिकारी) खाते विकसक पदानुमती काढून घेण्याबाबत निर्णय घेऊ शकतील असा प्रस्ताव ठेवत आहे. सदस्य खाते निर्मितीतील वेग वाढल्यामुळे कार्यशाळा समन्वयक आणि विद्यार्थ्यांना संपादन कार्यावर अधिकवेळ देणे संभवणार आहे.
सध्या ज्या प्राध्यापक सदस्यांसाठी 'खाते विकसक' पदानुमती मागत आहे त्यात
१) प्रा. डॉ. केतकी मोडक (उपप्राचार्या, गरवारे महाविद्यालय पुणे)
२) प्रा डॉ. देवानंद सोनटक्के (कर्मवीर भाऊराव महाविद्यालय पंढरपूर)
३) प्रा. डॉ. दिलीप बिरुटे (औरंगाबाद)
४) प्रा. डॉ. प्रकाश रामचंद्र पवार (विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
५) प्रा. डॉ. आनंद काटीकर (विभग प्रमुख मराठी फर्ग्यूसन महाविद्यालय पुणे)
६) प्रा. डॉ. प्रभाकर देसाई (प्रमुख विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे)
७) प्रा. संभाजी पाटील (वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था नागपूर)
८) प्रा. राजशेखर शिंदे (दयानंद महाविद्यलय, सोलापूर)
९) प्रा. डॉ. अनघा तांबे ( स्त्री अभ्यासकेंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे)
१०) प्रा. डॉ. श्रीनिवास हेमाडे ( संगमनेर महाविद्यालय संगमनेर)
११) प्रा.डॉ. अभिजीत मिनाक्षी (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे)
१२) प्रा. डॉ. मनीष जोशी (जळगाव विद्यापीठ)
१३) प्रा. डॉ. भारती निरगुडकर (विभाग प्रमुख मराठी भाषा विभाग मुंबई विद्यापीठ)
१४) जगदानंद भटकर (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:०६, ३० डिसेंबर २०१६ (IST)
विकिवरून हटवलेली चित्रे
[संपादन]सदस्य:CommonsDelinker हे कॉमन्सच्या वतीने विकिवरील अ-प्रताधिकारीत चित्रे एकतर हटवित आहेत किंवा पर्यायी चित्र टाकीत आहेत.चित्रे हटविलेल्या अशा लेखपानांवर लाल दुवा दिसतो तो, लेखाचे दृष्टीने चांगला दिसत नाही.
त्यासाठी:
- एकतर तो चित्राचा लाल दुवा हटविण्यात यावा.
- तो तसाच राहू द्यावा.
- इतर वेगळी काही कल्पना सुचत असेल तर ती.
सर्व सदस्यांना / अधिकाऱ्यांना विनंती आहे कि याबाबत आपले साधक-बाधक विचार येथे मांडावेत, जेणेकरून त्यावर सर्वानुमतीने सर्वसमावेशक निर्णय घेणे शक्य होईल. धन्यवाद.
--वि. नरसीकर (चर्चा) १५:५१, २६ ऑगस्ट २०१७ (IST)
- अशा लेखांतून काढलेल्या चित्राच्या ऐवजी पर्यायी चित्र घालावे.
- पर्यायी चित्र न मिळाल्यास चित्र दुवा काढावा.
- CommonsDelinker या सांगकाम्याने चित्रे काढली असलेल्या (बदललेल्या नव्हे) लेखांचा एका (न दिसणाऱ्या) वर्गात समावेश करावा ज्यायोगे अशा लेखांची यादी एकाच ठिकाणी मिळेल आणि वरील बदल करणे सोपे होईल.
- अभय नातू (चर्चा) २०:२६, २६ ऑगस्ट २०१७ (IST)
>>CommonsDelinker या सांगकाम्याने चित्रे काढली असलेल्या (बदललेल्या नव्हे) लेखांचा एका (न दिसणाऱ्या) वर्गात समावेश करावा ज्यायोगे अशा लेखांची यादी एकाच ठिकाणी मिळेल आणि वरील बदल करणे सोपे होईल.>> ती पाने आपोआप ' वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने ' या वर्गात दाखल होतात. पर्यायी चित्र उपलब्ध असेल तर सांगकाम्या ते चित्र स्वतःच घालतो.
ते लाल चित्रदुवे काढणेच योग्य होईल अन्यथा लेख विद्रुप दिसतो असे माझे मत आहे.दुजोरा हवा. --वि. नरसीकर (चर्चा) १०:४६, २८ ऑगस्ट २०१७ (IST)
- ज्या चित्रांसाठी पर्यायी चित्रे उपलब्ध नाहीत तेथून लालदुवे काढावेतच पण असे लेख कसे शोधणार? जर सांगकाम्या चालवून, किंवा CommonsDelinkerला विनंती करून असे लेख एके ठिकाणी गोळा केले तर तेथे पर्यायी चित्रे आहेत का हे बघता येईल.
- सरसकट दुवे काढणे चुकीचे नाही पण त्याद्वारे पर्यायी चित्रे घालण्याची संधी हुकते.
- अभय नातू (चर्चा) २१:५८, २८ ऑगस्ट २०१७ (IST)
- ते लेख वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने येथे बघता येतील. कृपया तो वर्ग उघडून त्यातील वर्गवर्णन वाचावे ही विनंती.पर्यायी चित्रे असल्यास ती शोधत आहे.काम चालू करतो.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:४७, २९ ऑगस्ट २०१७ (IST)
- धन्यवाद नरसीकरजी!
- अभय नातू (चर्चा) १८:४०, २९ ऑगस्ट २०१७ (IST)
मराठी विकिपीडियाच्या नावाने आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण
[संपादन]* नव्या धोरणा मागची भूमिका
|
---|
गेल्या काही वर्षाँपासून मराठी आणि भारतीय भाषा विकिपीडियां विकासाच्या नावाने वेगवेगळ्या माध्यमातून परस्पर फंडींग मागण्याची प्रकरणे चिघळत चाललेली दिसतात. मी काय लिहितो आहे, बाहेर काय चालू आहे, बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि प्रत्येकवेळी तशी जरुरीही नसते. आतापर्यंतचा दृष्टीकोण मराठी विकिपीडियासाठी काम करणाऱ्यांना शक्यतोवर 'नाही म्हणावयाचे नाही' असाच राहीला होता. - पुढेही सकारात्मकच राहणार आहे - ते मराठी विकिपीडियाच्या बाहेर काय करताहेत याच्याशी मराठी विकिपीडियात फक्त ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्यांना रस असण्याचे कारण नाही असेच आजतागायत धोरण होते. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली पण तो पैसा रयतेसाठी वापरला. आताही नवे धोरण ठेवताना मराठी रयतेसाठी काम होत असेल तर कोण कुठून कसे किती मिळवतो याचे विस्तृत तपशिलामध्ये आपल्याला रस असण्याचे कारण नाही. पण रयतेच्या नावानी घेता काम करत नाही तेही एखादेवेळेस ठिक पण काम करणाऱ्यांच्या पायात पाय घालणाऱ्या कारवायांमुळे आणि रयतेकडून रयतेच्या नावानी गोळा केलेला पैसा रयतेच्या उद्दीष्टासाठी किमान प्रमाणात तरी वापरला जातो का ? असा प्रश्न उद्भवतो. आपल्याला कल्पना आहेच की असभ्यता नसलेल्या रास्त टिकेचेही मराठी विकिपीडिया स्वागतच करतो. पण फंडींगच्या स्पर्धेत पडलेल्यांना आपणच काम करतो हे दाखवण्यासाठी काम करणाऱ्यांना असभ्यपणा कमी दाखवणे, प्रसंगी अमराठी लोकांना वापरणे अशा प्रकारचे राजकारण चालू होऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या कामात ही मंडळी पडताना दिसत आहेत. तळे राखणारे तळे चाखतील हे गृहीत धरले तरी धरणाच्या कालव्यांचा काहीतरी विकास होतो आहे का हे ही पहावयास हवे. |
ह्या साठी किमान आणि रिझनेबल नियम असावयास हवेत आता अगदीच मोकळ्या चर्चेस टाकले तर त्यावरही राजकारण खोटे आयडी वापरणे असे सगळे होणार हे टाळण्यासाठी म्हणून मराठी विकिपीडियाचे प्रशासकीय अधीकार एकतर्फी वापरत, दोन वर्षांसाठी खालील नियमावली आखून देण्यात येत आहे. येत्या दोन वर्षानंतर या विषयावर महाराष्ट्रातील विद्यापीठ प्राध्यापक स्तरीय चर्चेतून, मराठी भाषेचे प्राध्यापक विभाग प्रमुख, राज्य मराठी विश्वकोश मंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या आपसात चर्चेनंतर आणि ती चर्चा मराठी विकिपीडियावर मांडून नियमावलीत सहमती आणि सुधारणा करुयात.
- फंड्स देणाऱ्या संस्थांच्या स्वत:च्याही नियमावली असणार खालील मार्गदर्शक नियम त्या व्यतिरीक्त असतील.
- सध्या मंजुरीस पेंडींग आणि इथून पुढे मंजुरीस जाणाऱ्या
- १) फंड्सचा प्रस्ताव ठेवणाऱ्या आणि समर्थन पुरवणाऱ्या आणि समन्वयक ते व्हॉलेंटीअर सर्व व्यक्ती मराठी विकिपीडियाच्या निती-स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्या असाव्यात.
- २) कोणत्याही रकमेच्या फंड्सचा प्रस्ताव ठेवणाऱ्या आणि समर्थन पुरवणाऱ्या व्यक्तींना मराठी विकिपीडियात; किमान दोन वेगवेगळ्या मराठी स्रोतातून संदर्भ देऊन किमान दोन दोन परिच्छेद ज्ञानकोशीय लेखन, किमान एक हजार लेखातून कोणत्याही मेजर कॉपीराईट उल्लंघनाशिवाय असावे. + दोन वर्षांचा कालावधी अनुभव असावा
- ३) ५०,००० रुपये पेक्षा अधिक रकमेचा फंड्स प्रस्तावास किमान एक हजार लेखात किमान दोन वेगवेगळ्या मराठी स्रोतातून संदर्भ देऊन, किमान दोन-दोन परिच्छेद लेखन किमान एक हजार लेखातून कोणत्याही मेजर कॉपीराईट उल्लंघना शिवाय असलेल्या पाच जणांचे तरी समर्थन असावे.
- ४) फिल्ड मधले कामात मराठी विकिपीडिया निती बद्दल मार्गदर्शन करणारा किमान दोन दोन परिच्छेद लेखन किमान एक हजार लेखातून कोणत्याही मेजर कॉपीराईट उल्लंघनाशिवाय असलेला किमान एक मेंटॉर असावा.
- ५) प्रत्येक फंडींगसाठी समर्थन आणि वेळोवेळी किमान स्वरुपाचे मराठी विकिपीडियाचे काम होते आहे का आणि मराठी हितांच्या निती राबवल्या जाताहेत का हे पहाण्यासाठी इतर संबंधीत विषयाच्या प्राध्यापक मंडळींसोबतच एक मराठी विषयाचे प्राध्यापक असावेत आणि एका महाविद्यालय स्तरीय अथवा विद्यापिठीय मराठी भाषा विभाग प्रमुखांचे अथवा राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्षांचे अथवा राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांचे जातीने मेंटॉरींग असावे. प्रकल्प फंडींग विनंती करण्यापुर्वी, दरम्यान आणि नंतर संबंधीत खर्चांना त्यांचे अनुमोदन घ्यावे.
- ६) मराठी विकिस्रोत, मराठी विकिबुक्स आणि मराठी विक्शनरी प्रकल्पासाठी फंडींग मागताना, महाराष्ट्रातील किमान दोन वेगवेगळ्या महाविद्यालयाचे मराठी भाषी ग्रंथपाल आणि मराठी हितांच्या निती राबवल्या जाताहेत का हे पाहण्यासाठी इतर संबंधीत विषयाच्या प्राध्यापक मंडळींसोबतच एक मराठी विषयाचे प्राध्यापक असावेत आणि एका महाविद्यालय-स्तरीय अथवा विद्यापिठीय मराठी भाषा विभाग प्रमुखांचे अथवा राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्षांचे अथवा राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांचे जातीने मेंटॉरींग असावे. प्रकल्प फंडींग विनंती करण्यापुर्वी, दरम्यान आणि नंतर संबंधीत खर्चांना त्यांचे अनुमोदन घ्यावे.
- ७) प्रस्ताव मांडणारे आणि अनुमोद देणारे यांचे सदस्यखात्यातून मागच्या दोन वर्षात कुणावरही असभ्यता हल्ला झालेला नसावा. विशेषत:, दुसऱ्या सदस्यांशी / बद्दल चर्चापानांवर संवाद साधताना मराठी आदरार्थी बहूवचन वापरलेले असावे तू हे सर्वनाम वापरलेले नसावे.
- ७) अनुमोदन प्रस्ताव वरील पद्धतीने आधी चावडी प्रगती वर तेही मराठी भाषेतून यावेत. चर्चा सहभाग मराठीतूनच असावा. त्या नंतरच मराठी विकि प्रकल्पांच्या नावाने इतरत्र विनंत्या कराव्यात. अशा अनुमोदीत विनंत्या कुणाच्याही असल्या तरी मेटा आणि विकिमिडीया प्रकल्पांवर त्या केवळ प्रचालकच पोहोचवतील, आणि मगच इतर वरीलप्रमाणे दोन परिच्छेदांचे हजार लेख झालेले मराठी विकिपीडियन तेथे अनुमोदन पुरवतील.
- ८) वरील पद्धतीने सध्या आणि दोन वर्षांनंतर तेंव्हाच्या सुधारीत नियमांनुसार न वागता जाणीवपुर्वक परस्पर प्रस्ताव ठेवणाऱ्या, परस्पर जाणीवपुर्वक अनुमोदन पुरवणाऱ्या आणि जाणिवपुर्वक फिल्ड मध्ये मिस ॲप्रोप्रीएशन अथवा मराठी फंड्स अमराठी कार्यात वापरणे, मराठी विकिपीडिया निती स्वातंत्र्य असणाऱ्या सदस्यखात्यांना मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिपीडिया प्रशासक(स्वीकृती अधिकारी) अटकाव करु शकतील.
- ९) वरील नितीचा मेटा प्रकल्पांसाठी इंग्रजी अनुवाद उपलब्ध केला जाईल.
नियमावलीचा उद्देश छळ करणे (हरॅस), चारीत्र्य-हनन करणे, अनावश्यक प्रमाणात शंका पसरवणे, नाही किंवा होऊन गेलेल्या गोष्टी खोदणे हा नाही. (आणि म्हणून या संपूर्ण प्रकारात कोणतेही संदर्भ आणि नामनिर्देशन टाळलेले आहे - हे कोणत्याही एखाद्या विषीष्ट व्यक्तीच्या अनुभवावरुनही नाही. गेल्या काही वर्षात घडलेल्या दोनचार गोष्टी वरुन एक सकारात्म्क पाऊल आहे.) अथवा जेन्युईन काम करणाऱ्यांना थांबवणे नाही. लवचिकता नसावी असेही नाही नियम माणसांसाठी आहेत, माणूस नियमांसाठी नाही.
एक शंका दोन-दोन परिच्छेदांचे हजार लेख करण्याबद्दल आहे. मराठी विश्वकोश आणि केतकर ज्ञानकोश दोन कॉपीराईट-फ्री स्रोत सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे हे कठीण अथवा अशक्य नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३७, ८ ऑक्टोबर २०१७ (IST)
- नमस्कार,
- हे धोरण अधिकृत आहे का? वरील लिखाणावरून असे वाटते (मराठी विकिपीडियाचे प्रशासकीय अधीकार एकतर्फी वापरत, दोन वर्षांसाठी खालील नियमावली आखून देण्यात येत आहे) पण १००% कळले नाही.
- जर हे धोरण अधिकृतपणे राबविण्यात येत असले तर याला (माहितगारांशिवाय) कोणत्या प्रशासकांची अनुमती आहे हे कळवावे. तसेच वरील नियम कोणत्या आराखड्यानुसार (framework) केलेले आहेत हे ही कळवावे. जर आराखड्यानुसार नसतील तर किती व्यक्तींचा हे नियम तयार करण्यात सहभाग होता हे लिहावे.
- हे धोरण मराठी विकिपीडियाबाहेरील फाउंडेशनच्या तत्त्वांमध्ये ढवळाढवळ करणारे वाटते. या धोरणाद्वारे मराठी विकिपीडियाच्या नावाने फाउंडेशनचे नियम बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचेही वाटते. असे करणे अनुचित आहे असे माझे मत आहे. अर्थात, फाउंडेशनच्या किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या नियमांना व्यक्तिशः विरोध असला तर तो व्यक्तिशः दाखविण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधितच आहे.
- मराठी विकिपीडियाच्या नावे असे धोरण चर्चा न होता राबवू नये असे माझा आग्रह आहे.
- जर हा अद्याप नुसता प्रस्तावच असला तर ते तसे स्पष्ट करावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १०:०४, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)
- प्रचालक, प्रशासक - मराठी विकिपीडिया
- टिप्पणी: या तथाकथित धोरणावर भाष्य नसले तरी विकिमीडिया फाऊंडेशनचे हे संबंधित विधान पाहावे. कुणाला त्यातली इंग्रजी समजण्यात अडचण आल्यास भाषांतर करायला मला आनंद होईल. -- Rohini (चर्चा) ०८:०८, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)
विकिपीडियावर अमराठी संदेश
[संपादन]हा प्रस्ताव नोव्हेंबर, २०१७मध्ये नामंजूर झाला. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.
प्रशासकांच्या (स्वीकृती अधिकारी) अधिकारांत बदल
[संपादन]हा प्रस्ताव जानेवारी, २०१८मध्ये मंजूर झाला. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.
कार्यशाळा कशी हवी?
[संपादन]मराठी विकिपीडियावर अनेक कार्यशाळा चालली आहे. अशी काही वैशिष्ट्ये आहेत ज्यांची आम्हाला कमतरता आहे आम्ही एक यशस्वी कार्यशाळा कशी तयार करू शकतो याबद्दल मराठी विकिपीडिया वापरकर्ते त्यांच्या सूचना देऊ शकाल?. मराठी विकिपीडियावरील प्रभावी कार्यशाळे तयार करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. कृपया खालीलप्रमाणे तुमच्या सूचना / हरकती / शिफारशी लिहा.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:०१, १३ जानेवारी २०१८ (IST)
विकिपिडीयावर वापरायची परिभाषा
[संपादन]विकिपिडीयावर शक्य तेवढे लोकांना सहज समजतील असे असे शब्द वापरावे अशी माझी सूचना आहे. उदाहरणार्थ निर्वाह हा शब्द घ्या. सर्वसामान्य मराठी भाषिकांना उदरनिर्वाह हा शब्द परिचित असावा, केवळ निर्वाह नाही असा माझा अंदाज आहे. आपट्यांच्या संस्कृत - इंग्रजी शब्दकोशात निर्वाहचा अर्थ accomplishing, carrying out असा दिला आहे, आणि मला थोडे बहुत संस्कृत समजते म्हणून माझाही असाच अंदाज होता. पण दाते-कर्व्यांच्या महाराष्ट्र शब्दकोशात निर्वाह म्हणजे कारभार असा अर्थ दिला आहे. विकिपिडीयाचा कारभार म्हटल्यास सर्व सामान्य वाचकांना ते सहजी समजेल, तेव्हा निर्वाह शब्दाच्या जागी कारभार हाच शब्द वापरावा अशी माझी सूचना आहे. MadhavDGadgil (चर्चा) १४:५२, २१ मार्च २०१८ (IST)
ती हळूहळू बदलली जात आहे, शेवटी पर्वतीच्या पायथ्याशी जन्माला येऊन ओंकारेश्वरी जे देह ठेवतात त्यांच्याकडून अश्या भाषे व्यतरिक्त दुसरे काय अपेक्षित होते, जेव्हा ह्या भुगोलाच्या बाहेरची जनता विकीवर येईल तेव्हा हे बदल आपसूकच होतील आणि ती वेळ आली आहे. WikiSuresh (चर्चा) २३:२७, २६ मार्च २०१८ (IST)
- येथील भाषा सोपी, सुटसुटीत असावी यासाठी पूर्णपणे पाठिंबा! पूर्वी काही सदस्यांकडून याला कडाडून विरोध झालेला होता परंतु मराठी विकिसमाजाने जर असे शब्द आणायचे/बदलयाचे ठरवले तर त्यास काही थोडक्या लोकांचा विरोध असून काही उपयोग नाही.
- सहज समजणारे शब्दच नव्हे तर त्यासाठी इतर भाषांतून छोटे, नेमके शब्द (अपवादाने) आणावे असाही प्रस्ताव.
- आधीपासून घातले गेलेले शब्द कोणते हे शोधून त्यांसाठी प्रतिशब्द सुचवले तर सांगकाम्या किंवा इतर स्वयंचलित उपयोजने वापरुन पटकन हे करता येईल.
- यासाठी लागल्यास एखादे स्वतंत्र पान तयार करावे असे मी सुचवतो.
- अभय नातू (चर्चा) ०१:३३, २७ मार्च २०१८ (IST)
अशी चर्चा पूर्वी झाली असेल तर तोही मजकूर विकिपीडिया:विकिपीडिया परिभाषा या पानावर एकत्रित करुन बदलण्यास पात्र शब्दांची यादी करुया. त्यांत प्राधान्यक्रम ठरवूया. उदा.सनोंद-निर्गम साठी बाहेर पडा हा रूढ सोपा शब्द.फोनवर सध्या लोक सफाईने कळफलक,सर्व मेनू मराठीत वापरतात. त्यांतील काही चांगले शब्द घेता येतील.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२७, २७ मार्च २०१८ (IST)
युट्युबवरील साहित्य संदर्भ म्हणून वापरणे
[संपादन]सध्या अनेक लेखांमध्ये युट्युबवरील व्हिडिओ संदर्भ म्हणून वापरले जात आहेत.प्रत्येक विषयावर एखादी क्लिप तेथे मिळतेच. हे नियमात बसते का? या साहित्याचे विश्वासार्हता,प्रताधिकार इ.कोण तपासणार? या संदर्भात धोरण नसेल तर ठरविणे आवश्यक आहे असे वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:३६, २९ मार्च २०१८ (IST)
- फक्त युट्युब का? इंटरनेटवर अनेक संकेतस्थळ आहेत जी व्हिडिओ ठेवतात. अधिक माहिती List of video hosting servicesवर भेटेल. @सुबोध कुलकर्णी: जर आपण संदर्भ म्हणून व्हिडिओ असे म्हणतात तर एकदा Wikipedia:Videos as references पाहावे. आपल्याला असे काही मराठी विकिपीडियावर आणू इच्छिता? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:१३, २९ मार्च २०१८ (IST)
अमुक किंवा तमुक संकेतस्थळ हा मुद्दा नाही, विकीतत्वे कशी पाळायची व त्यासाठी मराठी विपीचे धोरण काय असावे ही चर्चा करूया.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५७, २९ मार्च २०१८ (IST)
- आपला प्रस्ताव पुन्हा एकदा पहा व चर्चा करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१०, २९ मार्च २०१८ (IST)
निष्क्रिय प्रचालक/ प्रशासकांसाठीचा कालावधी ६ वर्षांवरून १ वर्ष करणे
[संपादन]- पहा - विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/निष्क्रीय प्रचालक - हा प्रस्ताव चर्चाधीन आहे.
- हा प्रस्ताव ८-० मताधिक्याने मंजूर झाला आहे. -- अभय नातू (चर्चा) २३:०८, ७ मे २०१८ (IST)
मशीन ट्रान्सलेशन
[संपादन]नमस्कार! आत्ता एक मशीन ट्रान्सलेशन केलेला लेख पाहण्यात आला,असे अधिक लेख असतील,मला कल्पना नाही तपशीलात.एकूणातच अशा लेखात वाक्यरचना आणि मराठी व्याकरण यांच्या खूपच चुका असण्याची शक्यता असते. मी आज काम केलेल्या लेखनातही पुष्कळ सुधारणा कराव्या लागल्या. प्रताधिकार संबंधी लेख जसे शोधता येतात तसे हे लेखही शोधण्याची गरज तातडीने वाटते आहे. मला तांत्रिक मदत करणे जमले नाही तरी असे लेख सुधारणे हे मी करू शकेन.हा विषय महत्वाचा आणि व्यासपीठाच्या दृष्टीने गंभीर वाटतो त्यामुळे आपण यावर काहीतरी काम करायला हवे असे वाटते. सर्वांच्या सकारात्मक, सकस आणि प्रगल्भ मतांचे स्वागत आहे. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) ०९:३३, २७ एप्रिल २०१८ (IST)
- मशीनद्वारे भाषांतरित केलेल्या लेखांची यादी उपलब्ध झाली तर यावरही काम करता येईल. असे लेख हे बहुतेक खूप जूने असावेत.--संदेश हिवाळेचर्चा ०९:४४, २७ एप्रिल २०१८ (IST)