"गोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) छो →उपचार |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[चित्र:RougeoleDP.jpg|200px|right|thumb|गोवर झालेला मुलगा]] |
[[चित्र:RougeoleDP.jpg|200px|right|thumb|गोवर झालेला मुलगा]] |
||
'''गोवर''' हा |
'''गोवर''' हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्सअॅन्डथम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीजल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो. |
||
वर्णन गोवर हा जगभर |
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते. |
||
माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर येऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही. |
|||
==कारण आणि लक्षणे== |
==कारण आणि लक्षणे== |
||
गोवराचे कारण पॅरामिक्सोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. |
गोवराचे कारण पॅरामिक्सोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो. |
||
[[File:Rash of rubella on skin of child's back.JPG|left|thumb| गोवराचे पुरळ]] |
[[File:Rash of rubella on skin of child's back.JPG|left|thumb| गोवराचे पुरळ]] |
||
गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक |
गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो. |
||
कॉप्लिक पुरळ आल्यानंतर गोवराचे पुरळ येण्यास प्रारंभ होतो. डोके, चेहरा आणि हातापायावर |
कॉप्लिक पुरळ आल्यानंतर गोवराचे पुरळ येण्यास प्रारंभ होतो. डोके, चेहरा आणि हातापायावर टप्प्याटप्प्याने पुरळ येतात. पुरळ प्रारंभी सपाट तांबड्या रंगाचे असतात. पण कालांतराने त्यावर उंचवटा दिसू लागतो. पुरळ आल्या ठिकाणी खाज सुटते. पुरळ आल्यानंतर ताप येतो. ताप ४०.५ से. (१०५ फॅ.) असतो. सोबत मळमळ, उलट्या, अतिसार, आणि लसिकाग्रंथीना सूज अशी लक्षणे दिसतात. पुरळ पाच दिवस राहतात. खोकल्याने रुग्ण बेजार होतो. पुरळांचा रंग बदलून तपकिरी झाल्यानंतर त्वचा कोरडी होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खपली पडते. |
||
पाच ते दहा टक्के रुग्णामध्ये |
पाच ते दहा टक्के रुग्णामध्ये जीवाणू संसर्गाची गुंतागुंत होते. लहान मुलांच्या मध्ये कान, नाकाची पोकळी (सायनस) आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. इतर विषाणुजन्य आजारांमध्ये क्राउप(घसा आणि स्वरयंत्रास होणारा विषाणू संसर्ग, घसा दाह, श्वासनलिका दाह वगैरे), विषाणुजन्य न्युमोनिया, यकृत दाह, अपेंडिक्स दूषित होणे, पोटातील लसिकाग्रंथींची सूज, असे आजार होऊ शकतात. क्वचित हृदय किंवा वृक्क दाह, आणि रक्तक्षय होऊ शकतो. . रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास रक्त गोठण्यामध्ये अडचण येते. जुनाट क्षयाने गोवरामध्ये डोके वर काढल्याची उदाहरणे सामान्यपणे दिसतात. |
||
गोवरामध्ये मेंदूस सूज आली म्हणजे गंभीर परिस्थिति ओढवते. यास |
गोवरामध्ये मेंदूस सूज आली म्हणजे गंभीर परिस्थिति ओढवते. यास एन्सिफलायटिस असे म्हणतात. गोवराची लक्षणे दिसेनाशी झाल्यानंतर हा प्रकार उद्भवू शकतो. हजारातून एका रुग्णास या स्थितीस तोंड द्यावे लागते. एकदा ही स्थिति निर्माण झाली की त्यांतले १५% रुग्ण दगावतात. ताप,डोकेदुखी, झोप न येणे, आकडी, आणि कोमा ही मेंदूस सूज आल्याची लक्षणे आहेत. यातून रुग्ण बरा झालाच तर आकडी आणि मानसिक वाढ खुंटणे यास तोंड द्यावे लागते. |
||
एक अति |
एक अति विरळी गुंतागुत गोवरानंतर दहा वर्षामध्ये उद्भवू शकते. याला सब अक्यूट पॅनेन्सिफलायटिस असे म्हणणतात. या आजारात हळू हळू धुमसत राहणारी सूज येऊन पूर्ण मेंदू नष्ट होण्याची क्रिया होते. वयाच्या दोन वर्षांपूर्वी गोवर झाला असल्यास ही शक्यता अधिक असते. व्यक्तिमत्त्वामध्ये फरक, बुद्धिमत्तेमध्ये घट, शालेय शिक्षणामध्ये पुरेशी प्रगति नसणे, शरीरास अधूनमधून झटके येणे, शरीराचे संतुलन बिघडणे ही आजाराची लक्षणे आहेत. जसा आजार वाढत जातो तसे रुग्ण अंथरुणास खिळून राहतो; त्याला सभोवतालचे भान रहात नाही. अंधत्व येते. ताप झपाट्याने वाढतो आणि कमी होतो. मेंदूचे तपमान नियंत्रण बिघडते. आणि दुर्देवी मृत्यू ओढवतो. |
||
गरोदरपणात गोवर हा गंभीर आजार आहे. मातेस हा आजार झाल्यास गर्भपाताची शक्यता वाढते. अर्भक मृत ज्न्मते. गोवर झालेल्या मातेस न्यूमोनिया होण्याची शक्यता बळावते. |
|||
==निदान== |
==निदान== |
||
गोवराचे अचूक निदान |
गोवराचे अचूक निदान लक्षणांवरून करता येते. कॉप्लिक पुरळ आणि शरीराच्या धडापासून अवयवाकडे पसरत जाणारे पुरळ हे प्रमुख लक्षण. निदानामध्ये नेमकेपणा नसल्यास मूत्र परीक्षण किंवा म्यूकस अनुस्फुरित गोवर प्रतिपिंड यांचे मिश्रण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास नेमके निदान होते. शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमार्फत प्रतिपिंड तयार होतात. ठरावीक प्रतिजनबरोबर त्याची ओळख पटते. हे पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते. |
||
==उपचार== |
==उपचार== |
||
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर |
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास [[प्रतिजैविक|प्रतिजैविके]] देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अॅस्पिरिन देऊ नये. यामुळे एक दुर्धर आणि जीवघेणा रेय सिंड्रोम होण्याची शक्यता असते. वाफाऱ्यामुळे घसा मोकळा होतो. रुग्णास भरपूर द्रव पदार्थ पिण्यास द्यावेत. तापामुळे शुष्कता येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यावी. गोवर झालेल्या काहीं लहान मुलाना एन्सिफलायटिस झाल्यास अ जीवनसत्त्वाचा मोठा डोस दिल्याचा फायदा झाल्याचे दिसले. |
||
==पर्यायी उपचार पद्धत== |
|||
‘इचिनॅसिया’ |
‘इचिनॅसिया’ (अक्कलकारा) या वनस्पतीच्या वापरामुळे विषाणुसंसर्गानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होते. होमिओपॅथीमुळे गोवर आलेल्या कालखंडामध्ये आराम मिळतो असे म्हणतात. काहीं पर्यायी औषधांमुळे गोवराची तीव्रता कमी होते. यामध्ये चिनी औषधातील बुप्लेरम आणि पेपरमिंट बरोबर रातकिड्याच्या (सिकॅडा) रिकाम्या कोशांचा वापर गोवरावर करतात. पुरळ अंगावर उठल्याने होणारी खाज विच हॅझेलमुळे कमी होते.(ही वनस्पती भारतात मिळत नाही.)ओटमील घालून स्नान केल्याने अंगाची खाज कमी होते. आय ब्राइट या वनस्पतीपासून केलेल्या द्रावणाने डोळे स्वच्छ करावेत. आयुर्वेदामध्ये गोवरासाठी आले आणि लवंगाचा चहा वापरण्याचा सल्ला दिला आहे. |
||
==पूर्वानुमान== |
==पूर्वानुमान== |
||
सामान्य निरोगी सशक्त मुलास गोवर झाल्यास फार चिंता करण्याचे कारण नाही. विकसनशील |
सामान्य निरोगी सशक्त मुलास गोवर झाल्यास फार चिंता करण्याचे कारण नाही. विकसनशील देशांमध्ये गोवराचे १५ ते २५% रुग्ण मरण पावतात. कुमारवयीन मुलांत आणि प्रौढांमध्ये बरे होण्यात अडचणी येतात. गर्भारपणी गोवर झाल्यास बाळ कर्णबधिर असण्याची शक्यता असते. हजारी एका गोवराच्या रुग्णास एन्सिफलायटिस होत असला तरी एन्सिफलायटिस झालेल्यांपैकी १० ते १५ % रुग्ण मरण पावतात. यातील २५% रुग्णांच्या मेंदूंमध्ये कायमची विकृती उत्पन्न होते. |
||
==प्रतिबंध== |
==प्रतिबंध== |
||
गोवराचा |
गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते. १०-११ वर्षानंतर आणखी एकदा लस देण्याचा सल्ला दिला जातो. महाविद्यालयाच्या परिसरात गोवराची साथ पुरेसे लसीकरण न झालेल्या मुलामध्ये आल्याची उदाहरणे आहेत. |
||
गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते. |
गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते. |
१४:०९, २३ मार्च २०१२ ची आवृत्ती
गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्सअॅन्डथम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीजल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.
माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर येऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.
कारण आणि लक्षणे
गोवराचे कारण पॅरामिक्सोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.
गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.
कॉप्लिक पुरळ आल्यानंतर गोवराचे पुरळ येण्यास प्रारंभ होतो. डोके, चेहरा आणि हातापायावर टप्प्याटप्प्याने पुरळ येतात. पुरळ प्रारंभी सपाट तांबड्या रंगाचे असतात. पण कालांतराने त्यावर उंचवटा दिसू लागतो. पुरळ आल्या ठिकाणी खाज सुटते. पुरळ आल्यानंतर ताप येतो. ताप ४०.५ से. (१०५ फॅ.) असतो. सोबत मळमळ, उलट्या, अतिसार, आणि लसिकाग्रंथीना सूज अशी लक्षणे दिसतात. पुरळ पाच दिवस राहतात. खोकल्याने रुग्ण बेजार होतो. पुरळांचा रंग बदलून तपकिरी झाल्यानंतर त्वचा कोरडी होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खपली पडते. पाच ते दहा टक्के रुग्णामध्ये जीवाणू संसर्गाची गुंतागुंत होते. लहान मुलांच्या मध्ये कान, नाकाची पोकळी (सायनस) आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. इतर विषाणुजन्य आजारांमध्ये क्राउप(घसा आणि स्वरयंत्रास होणारा विषाणू संसर्ग, घसा दाह, श्वासनलिका दाह वगैरे), विषाणुजन्य न्युमोनिया, यकृत दाह, अपेंडिक्स दूषित होणे, पोटातील लसिकाग्रंथींची सूज, असे आजार होऊ शकतात. क्वचित हृदय किंवा वृक्क दाह, आणि रक्तक्षय होऊ शकतो. . रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास रक्त गोठण्यामध्ये अडचण येते. जुनाट क्षयाने गोवरामध्ये डोके वर काढल्याची उदाहरणे सामान्यपणे दिसतात.
गोवरामध्ये मेंदूस सूज आली म्हणजे गंभीर परिस्थिति ओढवते. यास एन्सिफलायटिस असे म्हणतात. गोवराची लक्षणे दिसेनाशी झाल्यानंतर हा प्रकार उद्भवू शकतो. हजारातून एका रुग्णास या स्थितीस तोंड द्यावे लागते. एकदा ही स्थिति निर्माण झाली की त्यांतले १५% रुग्ण दगावतात. ताप,डोकेदुखी, झोप न येणे, आकडी, आणि कोमा ही मेंदूस सूज आल्याची लक्षणे आहेत. यातून रुग्ण बरा झालाच तर आकडी आणि मानसिक वाढ खुंटणे यास तोंड द्यावे लागते.
एक अति विरळी गुंतागुत गोवरानंतर दहा वर्षामध्ये उद्भवू शकते. याला सब अक्यूट पॅनेन्सिफलायटिस असे म्हणणतात. या आजारात हळू हळू धुमसत राहणारी सूज येऊन पूर्ण मेंदू नष्ट होण्याची क्रिया होते. वयाच्या दोन वर्षांपूर्वी गोवर झाला असल्यास ही शक्यता अधिक असते. व्यक्तिमत्त्वामध्ये फरक, बुद्धिमत्तेमध्ये घट, शालेय शिक्षणामध्ये पुरेशी प्रगति नसणे, शरीरास अधूनमधून झटके येणे, शरीराचे संतुलन बिघडणे ही आजाराची लक्षणे आहेत. जसा आजार वाढत जातो तसे रुग्ण अंथरुणास खिळून राहतो; त्याला सभोवतालचे भान रहात नाही. अंधत्व येते. ताप झपाट्याने वाढतो आणि कमी होतो. मेंदूचे तपमान नियंत्रण बिघडते. आणि दुर्देवी मृत्यू ओढवतो. गरोदरपणात गोवर हा गंभीर आजार आहे. मातेस हा आजार झाल्यास गर्भपाताची शक्यता वाढते. अर्भक मृत ज्न्मते. गोवर झालेल्या मातेस न्यूमोनिया होण्याची शक्यता बळावते.
निदान
गोवराचे अचूक निदान लक्षणांवरून करता येते. कॉप्लिक पुरळ आणि शरीराच्या धडापासून अवयवाकडे पसरत जाणारे पुरळ हे प्रमुख लक्षण. निदानामध्ये नेमकेपणा नसल्यास मूत्र परीक्षण किंवा म्यूकस अनुस्फुरित गोवर प्रतिपिंड यांचे मिश्रण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास नेमके निदान होते. शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमार्फत प्रतिपिंड तयार होतात. ठरावीक प्रतिजनबरोबर त्याची ओळख पटते. हे पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते.
उपचार
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अॅस्पिरिन देऊ नये. यामुळे एक दुर्धर आणि जीवघेणा रेय सिंड्रोम होण्याची शक्यता असते. वाफाऱ्यामुळे घसा मोकळा होतो. रुग्णास भरपूर द्रव पदार्थ पिण्यास द्यावेत. तापामुळे शुष्कता येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यावी. गोवर झालेल्या काहीं लहान मुलाना एन्सिफलायटिस झाल्यास अ जीवनसत्त्वाचा मोठा डोस दिल्याचा फायदा झाल्याचे दिसले.
पर्यायी उपचार पद्धत
‘इचिनॅसिया’ (अक्कलकारा) या वनस्पतीच्या वापरामुळे विषाणुसंसर्गानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होते. होमिओपॅथीमुळे गोवर आलेल्या कालखंडामध्ये आराम मिळतो असे म्हणतात. काहीं पर्यायी औषधांमुळे गोवराची तीव्रता कमी होते. यामध्ये चिनी औषधातील बुप्लेरम आणि पेपरमिंट बरोबर रातकिड्याच्या (सिकॅडा) रिकाम्या कोशांचा वापर गोवरावर करतात. पुरळ अंगावर उठल्याने होणारी खाज विच हॅझेलमुळे कमी होते.(ही वनस्पती भारतात मिळत नाही.)ओटमील घालून स्नान केल्याने अंगाची खाज कमी होते. आय ब्राइट या वनस्पतीपासून केलेल्या द्रावणाने डोळे स्वच्छ करावेत. आयुर्वेदामध्ये गोवरासाठी आले आणि लवंगाचा चहा वापरण्याचा सल्ला दिला आहे.
पूर्वानुमान
सामान्य निरोगी सशक्त मुलास गोवर झाल्यास फार चिंता करण्याचे कारण नाही. विकसनशील देशांमध्ये गोवराचे १५ ते २५% रुग्ण मरण पावतात. कुमारवयीन मुलांत आणि प्रौढांमध्ये बरे होण्यात अडचणी येतात. गर्भारपणी गोवर झाल्यास बाळ कर्णबधिर असण्याची शक्यता असते. हजारी एका गोवराच्या रुग्णास एन्सिफलायटिस होत असला तरी एन्सिफलायटिस झालेल्यांपैकी १० ते १५ % रुग्ण मरण पावतात. यातील २५% रुग्णांच्या मेंदूंमध्ये कायमची विकृती उत्पन्न होते.
प्रतिबंध
गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते. १०-११ वर्षानंतर आणखी एकदा लस देण्याचा सल्ला दिला जातो. महाविद्यालयाच्या परिसरात गोवराची साथ पुरेसे लसीकरण न झालेल्या मुलामध्ये आल्याची उदाहरणे आहेत.
गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते. गोवर, गालगुंड आणि रुबेला अशा तीनही लसी एकत्र दिल्या जातात. (एमएमआर) लस दिल्याने ऑटिझम (स्वमग्न) बालक होते अशी समजूत आहे. जागतिक आरोग्य निधि या संघटनेने एमएमआर लसीमुळे स्वमग्न बालक होण्याची शक्यता फेटाळली आहे. डब्लिन मध्य गोवराची लस ना दिलेल्या बालकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सर्व विकसनशील देशातील बालकाना एमएम आर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आराखड्यानुसार 2015 पर्यंत गोवराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा संकल्प केला आहे.