गोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोवर हा गोवर विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात आणि ती ७ ते १० दिवसांपर्यंत टिकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप येतो. हा बहुतेक वेळा ४० °से (१०४ °फॅ) पेक्षा जास्त असतो, तापाशिवाय खोकला, वाहणारे नाक आणि डोळ्यांची जळजळ या लक्षणांचा समावेश होतो. कोप्लिकचे स्पॉट्स म्हणून ओळखले जाणारे लहान पांढरे डाग लक्षणे सुरू झाल्याच्या दोन किंवा तीन दिवसांच्या नंतर तोंडामध्ये तयार होऊ शकतात. लक्षणे सुरू झाल्याच्या तीन ते पाच दिवसांनंतर लाल, सपाट पुरळ बहुधा चेहऱ्यावर येतो आणि नंतर उर्वरित शरीरावर पसरणे सुरू होते. बळावलेल्या गोवरामुळे कधीकधी अतिसार (८% प्रकरणांमध्ये), मध्य कर्ण संसर्ग (७%) आणि न्युमोनिया (६%) होऊ शकतो. हे काही प्रमाणात गोवर-प्रेरित इम्युनोसप्रेशनमुळे उद्भवते. क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदूची जळजळ होण्याची शक्यता असते. इतर नावांमध्ये मॉरबिली, रुबेला, लाल गोवर आणि इंग्रजी गोवर समाविष्ट आहे. "जर्मन गोवर" म्हणून ओळखले जाणारे दोन्ही रुबेला आणि रोझोला हे असंबंधित विषाणूंमुळे उद्भवणारे भिन्न रोग आहेत.

गोवर हा हवाजनित रोग आहे. तो संसर्ग झालेल्या लोकांच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळे सहज पसरतो. हा तोंडातला किंवा नाकातील स्राव यांच्या थेट संपर्काद्वारे देखील पसरू शकतो. रोगप्रतिकार करू शकत नसलेल्या आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबर राहण्याने दहापैकी नऊ जणांना हा संसर्ग होऊ शकतो. पुरळ सुरू झाल्याच्या चार दिवस आधीपासून ते चार दिवस नंतरपर्यंत असे लोक इतरांसाठी संसर्गजन्य असतात. हा रोग एकाव माणसाला एकापेक्षा जास्त वेळा बहुधा होत नाही. सार्वजनिक आरोग्यासाठी रोगाच्या संशयास्पद प्रकरणांमध्ये गोवरच्या विषाणूची तपासणी महत्त्वाची आहे.

गोवर लस ही रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी आहे, आणि बहुधा इतर लसींच्या बरोबर (MMR = Measles, Mumps and Rubella) बऱ्याचदा ती दिली जाते. लसीकरणामुळे २००० ते २०१७ दरम्यान गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८०% घट झाली असून जगभरातील सुमारे ८५% मुलांना २०१७ सालापर्यंत प्रथम डोस मिळाला आहे. जरी अनुषंगिक काळजी घेतल्याने परिणाम सुधारू शकत असले तरीही, एकदा का एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाला, की कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. अशा प्रकारच्या उपचारांमध्ये तोंडी रीहायड्रेशन द्रावण (किंचित गोड आणि खारट द्रव), पोषक अन्न आणि ताप नियंत्रित करण्यासाठीचे औषधोपचार यांचा समावेश होतो. जर कानामध्ये झालेला संसर्ग किंवा न्युमोनियासारख्या दुय्यम जिवाणूचा संसर्ग झाला तर प्रतिजैविके घेण्याचा सल्ला दिला पाहिजे. मुलांसाठी अ जीवनसत्व देण्याचीही शिफारस केली जाते.

गोवर मुख्यतः आफ्रिकेच्या आणि आशियाच्या विकसनशील भागांमध्ये दरवर्षी सुमारे २ कोटी लोकांना होतो. अनेकदा बालपणातील आजार म्हणून मानले जात असले तरी त्याचा परिणाम कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. या रोगाची परिणिती मृत्यूमध्ये होऊ शकते असा हा एक लसीने प्रतिबंधित करता येऊ शकणारा अग्रगण्य रोग आहे. १९९०मध्ये, या रोगामुळे २६ लाख लोक मरण पावले, आणि १९९०मध्ये, ५,४५,००० मरण पावले; २०१४पर्यंत जागतिक लसीकरण कार्यक्रमांनी गोवरामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ७३,०००पर्यंत कमी केली होती. असा कल असूनही, लसीकरण कमी झाल्याने रोग आणि मृत्यूचे प्रमाण २०१७ ते २०१९मध्ये वाढले आहे. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका सुमारे ०.२% इतका आहे, परंतु कुपोषण असलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण १०% पर्यंत असू शकते. जे लोक संसर्गामुळे मरण पावतात त्यांच्यापैकी बहुतांश हे पाच वर्षापेक्षा कमी वयाचे असतात. इतर प्राण्यांना गोवर झाल्याचे आढळलेले नाही.


==संदर्भ==

गोवर आजाराची सर्व माहिती

लेखक - डॉ. विवेकानंद वि. घोडके