Jump to content

डांग्या खोकला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डांग्या खोकला (Whooping Cough) हा संसर्गजन्य रोग आहे. बोर्डेटेला पेर्तुसिस नांवाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणाऱ्या थेंबावाटे हा विषाणू पसरतो, रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणाऱ्या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्याने देखील हा रोग पसरतो.

लक्षणे

[संपादन]

संसर्गानतर सात ते दहा दिवसांत रोग-लक्षणे दिसू लागतात. पहिल्या अवस्थेत सर्दी, पडसे व थोडा ताप असतो. नंतर पाच-सात दिवसांनी दुसरी अवस्था सुरू होते. खोकला येऊ लागतो. प्रथम खोकला कोरडा असतो. पुढे खोकल्याच्या उबळी सुरू होऊन श्वास आत घेताना. 'हुप' असा आवाज येतो. म्हणून यास माकड खोकला असे म्हणतात. उबळीच्या शेवटी चिकट 'कफ' पडतो. कधी कधी 'कफ' परत घशात जाऊन तो गिळला जातो. कधी कधी उलटी होते. उबळी दररोज पंधरा वीस अगर जास्तही वेळा येतात. उबळीच्या जोराने चेहरा लाल होतो. नाकातून एखादे वेळी रक्तस्राव होतो. कोणाकोणाच्या डोळ्यात रक्त उतरते. अशक्त रोग्याला खोकला झाला तर तो बरा होणे कठीण असते. या विकारात ताप येऊन न्युमोनिया होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. तिसऱ्या अवस्थेत उबळी कमी होत जाऊन रोगी बरा होतो.

प्रतिबंध

[संपादन]

डांग्या खोकल्याची लस घेण्याची शिफारस सर्व बालकांसाठी केली जाते. ही लस सामान्यतः डीटीपी (घटसर्प, धनुर्वात, आणि डांग्या खोकला) अशी संयुक्तपणे दिली जाते. पूर्वीचे संसर्ग किंवा लसीकरण यांच्यामुळे आयुष्यभर प्रतिकारक्षमता मिळत नाही. तथापि, वयाच्या सहाव्या वर्षानंतर, संसर्गाचा उद्रेक होत नाही तोवर लसीचे बूस्टर डोस देण्याची शिफारस करण्यात येत नाही.