Jump to content

"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:


महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते.. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुर्‍याचे अनेक प्रयोग केले.
महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते.. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुर्‍याचे अनेक प्रयोग केले.

==पोवाड्यांचे प्रशिक्षण==
पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे प्रशिक्षण देते.


==संदर्भ==
==संदर्भ==

२३:५२, २९ मे २०१७ ची आवृत्ती

पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो.

पोवाडे गाणारा कलाकारांस शाहीर म्हटले जाते. पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये "पवद" असा केलेला आढळतो.

मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेऊन गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणार्‍या आणि गाणार्‍या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.[]

अगदी आद्य पोवाडे

इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्याप प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणार्‍या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे.

महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होनाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली.[]

हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ हे पुस्तक लिहून सन १८९१मध्ये प्रसिद्ध केले.[] यापैकी १० पोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.[]

महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले.[]

महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते.. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुर्‍याचे अनेक प्रयोग केले.

पोवाड्यांचे प्रशिक्षण

पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे प्रशिक्षण देते.

संदर्भ

  1. ^ http://www.powade.com/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.transliteral.org/pages/i071201204616/view. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://books.google.co.in/books?id=rxD3hZox2ZMC&pg=PA89&dq=Acworth+Shaligram+Marathi+Ballads&hl=en&ei=IrxDTYL9KcPVrQf9or36Dw&sa=X&oi=book_result&ct=result&sqi=2#v=onepage&q=Acworth%20Shaligram%20Marathi%20Ballads&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://bhmoviesnews.blogspot.in/2010/09/mi-shivaji-raje-bhosle-boltoy-watch.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://zelshingramteke.blogspot.in/2011/06/literature-books-by-mahatma-phule.html. Missing or empty |title= (सहाय्य)