Jump to content

"बोधीवृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ १७: ओळ १७:
==पुस्तके==
==पुस्तके==
[[हेमा साने]] यांनी ‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ या नावाचे एक मराठी पुस्तक लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील साधेपण, स्पष्टता आणि सर्वव्यापीपणा हा जगभर औत्सुक्याचा आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक बुद्धचरित्राचा, परंपरांचा वेध घेत बुद्धचरित्रात उल्लेखिलेल्या वृक्षांचा बुद्धाच्या आयुष्याशी किंवा प्रसंगोपात घटनांशी संबंध व संदर्भ जोडते.<ref>[http://www.loksatta.com/lokrang-news/book-review-buddha-parampara-ani-bodhi-vruksha-665831/ ‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ पुस्तकाचे लोकसत्तामधील परीक्षण]</ref>

सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला.

दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत.

दुसर्‍या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धाचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदम्ब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे.

==उत्सव==
==उत्सव==

०३:१६, १२ मे २०१७ ची आवृत्ती

बोध गयाच्या महाबोधी विहारातील महाबोधी वृक्ष

बोधीवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधीवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधीवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधीवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसर्‍या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधीवृक्ष पुन्हा तोडला.

चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधीवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधीवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधीवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[]

बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प

बौद्ध लोक या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज हे बोधीवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधीवृक्ष यांची पुष्कळ महिमा गायलेली आहे.[]इ.स.१८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर बकिंगहॅम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.

उद्गम आणि वारसा

प्रख्यात बोधी वृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा -हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधीवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य खोडे एकत्रित उघडपणे दिसतात, बोधीवृक्षाचे निश्चित पुनर्रुजीवन नियमितपणे झालेले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधीवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो डॉ बुकॅनन (हॅमिल्टन) यांनी पाहिला होता. त्यांने त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.[]

तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि इ.स. १८७६ मध्ये वादळात उर्वरित वृक्ष नष्ट झाला. इ.स. १८८१ मध्ये बकिंगहॅम(Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधीवृक्ष लावला.[][]

पुस्तके

हेमा साने यांनी ‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ या नावाचे एक मराठी पुस्तक लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील साधेपण, स्पष्टता आणि सर्वव्यापीपणा हा जगभर औत्सुक्याचा आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक बुद्धचरित्राचा, परंपरांचा वेध घेत बुद्धचरित्रात उल्लेखिलेल्या वृक्षांचा बुद्धाच्या आयुष्याशी किंवा प्रसंगोपात घटनांशी संबंध व संदर्भ जोडते.[]

सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला.

दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत.

दुसर्‍या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धाचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदम्ब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे.

उत्सव

बोधी दिवस

गौतम बुद्धांना ८ डिसेंबर रोजी बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून "बुदू सरणयी"(बुद्धामुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात. []

चित्रदालन

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ J. Gordon, Melton; Martin, Baumann (2010). Religions of the World: A Comprehensive Encyclopedia of Beliefs and Practices, Second edition. ABC-CLIO, Santa Barbara. p. 358. ISBN 1598842048.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सहावा
  3. ^ Archaeological Survey of India, Volume 1, Four Reports Made During the Years 1862-63-64-66
  4. ^ "Buddhist Studies: Bodhi Tree". Buddhanet.net. 2013-08-01 रोजी पाहिले.
  5. ^ महाबोधी विहार बोधगया येथे बोधीवृक्षाखाली, अलेक्झांडर बकिंगहॅम इ.स. १८९२ मध्ये म्हणतात."मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स.१८७५ मध्ये बोधीवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स.१८७६ मध्ये बोधीवृक्ष पाहिला तर उर्वरित भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडालेला होता.आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि बोधीवृक्षाच्या अनेक बिया जमा करून जुन्या मूळ झाडापासून नवीन झालेल्या रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती."
  6. ^ ‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ पुस्तकाचे लोकसत्तामधील परीक्षण
  7. ^ "University of Hawaii".