Jump to content

हेमा साने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेमा साने
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावHema संपादन
आडनावSane संपादन
जन्म तारीख१३ मार्च 1940 संपादन
मृत्यू तारीख१९ सप्टेंबर 2025 संपादन
मृत्यूस्थानपुणे संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषामराठी संपादन
व्यवसायlecturer, botanist, लेखक, Indologist संपादन
नियोक्ताआबासाहेब गरवारे महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Master of Science, विद्यावाचस्पती संपादन

डॉ. हेमा साने (१३ मार्च, १९४० - १९ सप्टेंबर, २०२५)[] या पुण्यातील एक वनस्पतीशास्त्रज्ञ होत्या. त्या वनस्पती शास्त्रात एम.एस्सी., पी‌एच.डी. धारक असून त्याच सोबत त्यांनी भारतविद्या शास्त्रात एम.ए., एम.फिल. पर्यंत चे शिक्षण घेतले होते. पुण्यातील आबासाहेब गरवारे (एम.ई.एस.) महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या.[][][]

त्या निसर्गप्रेमी असून त्यांनी इतिहासाचादेखील अभ्यास केला होता. साने पुण्यातील जोगेश्वरी बोळाजवळच्या शीतलादेवीचा पार भागातील जुनाट आणि पडक्या अशा वाड्यात एकट्या रहात असत. त्यांच्याबरोबर चार मांजरांचा, एका मुंगुसाचा, एका घुबडाचा आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा पक्ष्यांचाही निवास तेथे होता.[][]

हेमा साने यांनी इ.स. १९६० पासून विजेचा वापर केला नाही. त्यामुळे घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणेही नाहीत. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरले. तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. अजूनही त्या विहिरीवरून पाणी आणतात. त्यांनी टेलिफोनही वापरलेला नाही. केवळ दिवसाच्या प्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. मात्र उपलब्ध झाल्यापासून त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरू लागल्या आहेत.[][]

लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आपले हिरवे मित्र
  • पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (सहलेखिका - डॉ. विनया घाटे)
  • बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष
  • वा.द. वर्तक यांनी संपादित केलेल्या 'शंभरेक संशोधन प्रबंधां'तील काही प्रबंध
  • सम्राट अशोकावरील 'देवानंपिय पियदसी राञो ashok' हे पुस्तक
  • Flora and fauna of NCL / edited by Mukund V. Deshpande, Vandana Ghormade ; identification of flora and text compilation, Hema Sane ; Sanskrit text compilation and composition, Suruchi Pande. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, Council of Scientific and Industrial Research, Pune, 2010 साचा:Lccn 156 p. : col. ill. ; 24 cm.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली क्रमिक पुस्तके

[संपादन]
  • Biology (सहलेखिका - वीणा अरबाट)
  • Industrial Botany (सहलेखिका - डॉ. सविता रहांगदळे)
  • Plant Anatomy and Embryology
  • Plant Biotechnology (सहलेखक - डॉ. सविता रहांगदळे आणि डॉ, संजयकुमार रहांगदळे)

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • उरवडे(तालुका मुळशी-जिल्हा पुणे) येथी शिवबा प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार.
  • किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या ४थ्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 3 4 "घरात ना लाईट ना टीव्ही-फ्रीज, पुण्यातील बुधवार पेठेत विजेविना जीवनशैली, 85 वर्षीय ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञाचं निधन". महाराष्ट्र टाइम्स. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. 1 2 3 "This 79-Year-Old Retired Professor From Pune Still Lives Without Electricity At Home". इंडिया टाइम्स (इंग्लिश भाषेत). १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. "Renowned botanist Hema Sane passes away at 85". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2025-09-21. 2025-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]