पिंपळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पिंपळ 
species of fig
Ficus religiosa, TamilNadu407.JPG
Fulles i tronc de la figuera sagrada.
माध्यमे अपभारण करा

Wikispecies-logo.svg  Wikispecies
प्रकार taxon
याचे नावाने नामकरण
Taxonomy
साम्राज्यPlantae
SubkingdomViridiplantae
InfrakingdomStreptophyta
SuperdivisionEmbryophyta
DivisionTracheophyta
SubdivisionSpermatophytina
OrderRosales
FamilyMoraceae
GenusFicus
SpeciesFicus religiosa
Taxon author कार्ल लिनेयस, इ.स. १७५३ Edit this on Wikidata
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
ဗောဓိညောင်ပင် (my); 菩提樹 (yue); પીપળો (gu); അരയാൽ (ml); ਪਿੱਪਲ (pa); Ficus relixosa (ast); figuera sagrada (ca); ඇසතු (si); Ficus religiosa (de); Pippal-Baum (gsw); Ficus religiosa (ga); انجیر معابد (fa); 菩提树 (zh); Figowiec pagodowy (pl); پپل (pnb); インドボダイジュ (ja); ಅಶ್ವತ್ಥಮರ (kn); Ficus religiosa (sq); Ficus religiosa (sv); temppeliviikuna (fi); Ficus religiosa (oc); Ficus religiosa (la); Ficus religiosa (nl); पीपल (hi); ᱦᱮᱸᱥᱟᱜ ᱫᱟᱨᱮ (sat); 인도보리수 (ko); আঁহত (as); Ficus religiosa (en-ca); fíkovník posvátný (cs); அரச மரம் (ta); पीपर (bho); অশ্বত্থ (bn); Figuier des pagodes (fr); Ficus religiosa (bg); Sveta smokva (sh); އަޝްވަތި ގަސް (dv); โพ (th); Ficus religiosa (es); पिपल (ne); पिंपळ (mr); Ficus religiosa (war); ଓସ୍ତ (or); Ficus religiosa (pt); פיקוס קדוש (he); Ficus religiosa (ceb); Maldyklinis fikusas (lt); Sveti figovec (sl); bồ đề (vi); Ficus religiosa (pt-br); రావి చెట్టు (te); Ficus religiosa (id); Ficus religiosa (nn); Ficus religiosa (nb); 菩提樹 (zh-tw); Ficus religiosa (en-gb); Ficus religiosa (it); بڙ (sd); фикус священный (ru); Ficus religiosa (en); أثأب الهند (ar); Фікус священний (uk); ಅಶ್ವತ್ಥ ಮರ (tcy) specie di pianta della famiglia Moraceae (it); вид рослин з роду фікус родини тутових. (uk); вид растение (bg); વૃક્ષ (gu); สปีชีส์ของวงศ์มะเดื่อ (th); گونه‌ای از فیکوس (fa); מין של פיקוס הגדל כצמח נוי (he); soort uit het geslacht ficus (nl); вид растений (ru); species of fig (en); Art der Gattung Feigen (Ficus) (de); loài cây thuộc chi Đa đề (vi); species of fig (en); كائن حي (ar); druh rostliny (cs); पदीप (hi) ညောင်ဗုဒ္ဒဟေ, ညောင်ဗောဓိ (my); পিপল, অশ্বথ (bn); Ficus religiosa, Arbre de la bodhi, Pipal, Figuier Des Pagodes, Arbre de la Bodhi (fr); Ficus religiosa, фикус религиозный, дерево бодхи (ru); Bồ-đề thụ, Ficus religiosa, cây bồ đề, cây đề, cây Đề, cây Bồ-đề, cây bồ-đề, đề (vi); 菩提樹 (zh); インドボタイジュ (ja); Ficus religiosa (th); Ficus religiosa (uk); Figueira-dos-pagodes (pt); Árbol Plaska, Higuera sagrada, Aúdumbara, Pippala, Audumbara, Pipala, Áshwattha, Arbol Plaska, Ashwattha, Aśvattha, Higuera de agua, Acyutavāsa (es); Ficus religiosa (si); pyhäviikuna, pipal, bodhipuu (fi); sacred fig (en); പീപ്പലം, Bodhi tree (ml); pipal (cs); ଅଶ୍ଵତ୍ଥ (or)
पिंपळाचे पान

पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव. ज्या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृुक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' म्हटले जाते. हा वृक्ष बिहारमधील बॊधगया येथे आहे.

पिंपळाची उंची १० ते १५ मीटरपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची, आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात. अग्रस्थ अंकुर, उपपर्णानी झाकलेला, उपपर्णे लांबट तांबूस-गुलाबी असतात. हिरव्या रंगाची फुले, अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात याचे पुष्पाशय (फळासारखा दिसणारा भाग) पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्याची मादीपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात.

पिंपळाची फळे
Typical shape of the leaf of the Ficus religiosa

हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यांमधे वाढून घराला हानी निर्माण करतो.

औषधी व अन्य वापर[संपादन]

पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. बौद्ध भिक्खू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात. हडाप्पा अणि मोहोंजेदाडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत.

भारतीय संस्कृतीतील समजुती[संपादन]

पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना 'तोडू नये' असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

बौद्ध धर्मातील महत्त्व[संपादन]

गौतम बुद्धांनी बिहार मधील बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले असता, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासून याला बोधिवृक्ष असे म्हणू लागले.

पिंपळ आणि भूत[संपादन]

पिंपळाच्या पानांचा एकमेकांवर आपटून पावलांच्या आवाजासारखा आवाज होतो. त्यामुळे पिंपळावर भूत (मुंजा) असते असा समज झाला आहे. त्याकरता लोक पिंपळाच्या झाडाखालून रात्री जात नाहीत.

हे ही पहा[संपादन]