Jump to content

पुष्यमित्र शुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुष्पमित्र शुंग या पानावरून पुनर्निर्देशित)


ऑक्सफर्ड विद्यापीठा नुसार शुंग साम्राज्य

पुष्यमित्र शुंग(इ. स. पूर्व १८७ ते इ.स. पूर्व १५०): हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू सम्राट होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ हा दुर्बल आणि अहिंसक असल्यामुळे त्याची हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.[ संदर्भ हवा ]

पुष्यमित्र शुंग हा बृहद्रथचा सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे या ग्रीक राजाचे आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच पुष्पमित्र शुंगाच्या शासनकाळात लयास जाणाऱ्या हिंदू धर्माचे संवर्धन झाले आणि बौद्ध धर्माचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली. हिंदू धर्माला अस्तंगत होण्यासून वाचविण्याचे महान कार्य पुष्पमित्र शुंगाने केले आहे त्यामुळे पुष्पमित्र शुंग राजाचा हिंदू लोक सन्मान करतात. तसेच १४ एप्रिलला पुष्पमित्र शुंगाची जयंती साजरी करतात.[ संदर्भ हवा ] पुष्यमित्र शुंग हा एक वाईट राजा होता याबद्दल मोठी नोंद:

पुष्यमित्र शुंग हा शुंग वंशाचा संस्थापक होता. त्याने मौर्य साम्राज्याचा शेवट केला आणि स्वतःच्या वंशाची स्थापना केली. पुष्यमित्र याला विविध कारणांमुळे वाईट राजा मानले जाते:

1. **धार्मिक असहिष्णुता**: पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धर्माचे मोठे हानी केली. अनेक बौद्ध मठ आणि विहार याच्या हुकुमाने नष्ट करण्यात आले. बौद्ध भिक्षूंना त्रास देण्याचे अनेक पुरावे आढळतात.

2. **कठोर शासन**: पुष्यमित्र याचे राज्य अत्यंत कठोर आणि निर्दयी होते. त्याच्या शासनकाळात अनेक लोकांना शिक्षा देण्यात आल्या, त्यात काही अकारण होत्या.

3. **स्वार्थी राजकारण**: पुष्यमित्र शुंग याने स्वतःच्या सत्ता आणि वर्चस्वासाठी अनेक राजकीय खेळ खेळले. त्याने इतर राज्यांवर आक्रमण करून त्यांची संपत्ती लुटली आणि जनतेचे जीवन कठीण केले.

4. **सामाजिक असंतोष**: त्याच्या कारकीर्दीत सामाजिक असंतोष वाढला. विविध समाजघटकांमध्ये भेदभाव आणि अन्याय वाढला.

अशा विविध कारणांमुळे पुष्यमित्र शुंग हा एक वाईट राजा मानला जातो. त्याच्या शासनकाळात अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाला.

आक्रमण परिस्थिती

[संपादन]

चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याने स्वतः जैन अजीविका पंथातून दीक्षा घेतली. यानंतर सम्राट बिंदुसारांचा मुलगा अशोक गादीवर बसला. भयंकर हिंसा करून आपल्या साम्राज्याचा विस्तार करणारे सम्राट अशोक अहिंसक बनले. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यानंतर अशोकाचे संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रचारात गेले. भारत अहिंसेच्या कचाट्यात पडत होता. बृहद्रथ राजाच्या काळात ग्रीक राज्यकर्ते भारतावर हल्ले करत होते. ग्रीकांचे हे आक्रमण डेमेट्रियस (दिमित्र) च्या नेतृत्वाखाली झाले असावे. प्रसिद्ध व्याकरणकार पतंजली सम्राट पुष्यमित्रांचे समकालीन होते. त्यांनी 'अरुणत यवनः साकेतम्, अरुणत यवनः माध्यमिकम्' (यवनाने साकेतवर हल्ला केला, यवनाने मध्यमिकावर हल्ला केला) लिहून ठेवले आहे. त्यामुळे पतंजली आणि पुष्यमित्र यांच्या काळातही भारतावर यवनांनी आक्रमण केले होते आणि यावेळी यवनांचे सैन्य साकेत येथे होते हे स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ]

मौर्य साम्राज्य अधिकाधिक कमकुवत होत चालले होते आणि बृहद्रथाच्या कारकिर्दीत ही अहिंसा शिगेला पोहोचली होती. याच बृहद्रथ राजाचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग! एकीकडे शत्रू आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकत होता आणि दुसरीकडे त्याचा बृहद्रथ राजा कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हता. जनतेवर आक्रमकांचे अनाचार चालले होते हे पाहून पुष्यमित्र शुंग अस्वस्थ होता. राजाचे सैन्य पण अस्वस्थ होते. त्याच्या हेरांकडून माहिती मिळाली की ग्रीक सैनिक बौद्ध भिक्षूंच्या वेशात मठांमध्ये लपले आहेत आणि काही बौद्ध धर्मगुरूही त्यांना मदत करत आहेत. या माहितीने व्यथित होऊन पुष्यमित्राने कारवाई केली. या कारवाईदरम्यान पुष्यमित्र आणि त्याच्या सैनिकांची मठांमध्ये लपलेल्या शत्रूंच्या सैनिकांशी चकमक झाली. अनेक शत्रू सैनिकांना ठार मारण्यात आले.[ संदर्भ हवा ]

राजकारण

[संपादन]

पुष्यमित्राच्या या कृतीने अहिंसक असलेला बृहद्रथ राजा संतापला, त्याने पुष्यमित्राला सर्व चकमकी थांबवायला सांगितले. भारतावरच हल्ला होत असतांना असे करणे सेनापती पुष्यमित्राला शक्य झाले नाही. आणि सेनापती विरुद्ध राजा असाच संघर्ष उभा राहिला. त्यात राज अहिंसक असल्याने सैन्य पुष्यमित्राकडे आले आणि त्यांनी पुष्यमित्राला राजा घोषीत केले.[ संदर्भ हवा ]

कर्तृत्त्व

[संपादन]
राजा झाल्यानंतर भारताच्या सीमेकडे जाणाऱ्या ग्रीक आक्रमकांना हुसकावून लावले. हे सैन्य आजचे अश्वगणस्थान म्हणजेच अफगाणिस्तान आणि इराणचा काही भाग हे भारताचा भाग होते ते गिळंकृत करून पंजाबच्या पुढे आले होते. पुष्यमित्राने आक्रमकपणे ग्रीक सैन्याचा प्रतिकार सुरू केला आणि त्यांना रेटत परत इराणच्या पल्याड हुसकावले आणि भारताचा भाग परत मिळवला. भारतातून पूर्णपणे आक्रमकांचा नायनाट केला. अशा प्रकारे पुष्यमित्र शुंगाने पुन्हा नव्या अखंड भारताचा पाया घातला. राज्यव्यवस्था सुव्यवस्थित करण्याचे उत्तम काम केले. यामुळेच पुष्यमित्राचे साम्राज्य उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील बेरारपर्यंत आणि पश्चिमेला सियालकोटपासून पूर्वेला मगधपर्यंत पसरले होते.[ संदर्भ हवा ] पुष्यमित्राच्या कारकीर्दीत राज्यपाल व सह-शासक नेमण्याची पद्धत सुरू झाली. अर्थातच ज्या बौद्ध भिक्षूंवर पुष्यमित्राच्या हत्येचा आरोप आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून वर नमूद केल्याप्रमाणे भिक्षूंचा पोशाख घातलेले ग्रीक सैनिक होते. पुष्यमित्र शुंग हा बौद्धविरोधी नव्हता किंवा बौद्धांचा मारेकरीही नव्हता. सांची आणि भरहुत सारखे बौद्ध स्तूप सम्राट पुष्यमित्र शुंगाच्या काळात बांधले गेले.[ संदर्भ हवा ]

इतिहासकार मते

[संपादन]

भारतातील मार्क्सवादी इतिहासकारांना मात्र निराळे वाटते. जी. चक्रवर्ती यांनी पुष्यमित्र शुंग यांच्याबद्दल अजेंडा बनवला आहे असे त्यांच्या लिखाणातून दिसून् येते. त्यांनी दिव्यवदन या संहितेवरून पुष्यमित्रला धर्मांध करून टाकले. पुष्यमित्रासारखा धर्मांध ठरवलेला राजा एकही स्तूप उध्वस्त करू शकला नाही, तर मंदिर बांधले नाही.[ संदर्भ हवा ]

पुष्यमित्र शुंगानंतर या वंशात आणखी नऊ राज्यकर्ते होते, त्यांची नावे पुढीलप्रमाणे-

पुष्यमित्र शुंगावरील पुस्तके

[संपादन]
  • भारतीय इतिहासातील पडद्याआड गेलेले वीरपुरुष : धोधा बाप्पा, पुष्यमित्र शुंग, पौरस, बख्तार खान, विक्रमादित्य, हरिहर बुक्क (जनार्दन ओक)[ संदर्भ हवा ]
  • सेनानी पुष्यमित्र लेखक सत्यकेतु विद्यालंकार[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]