Jump to content

"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ९०: ओळ ९०:
* नाट्यशिक्षण आणि आळेकरांची नाटके, वगैरे वगैरे.
* नाट्यशिक्षण आणि आळेकरांची नाटके, वगैरे वगैरे.


==चित्रपट/दूरदर्शन मालिका/डॉक्युमेन्टरी==
==चित्रपट/दूरदर्शन मालिका/डॉक्युमेन्टरीललित लेखन==
रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.
रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.

रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्तीये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे. १९७५ची आणीबाणी आणि
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे.


== सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके ==
== सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके ==

१३:१४, २८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

सतीश आळेकर
जन्म जानेवारी ३०, इ.स. १९४९
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा नाट्यलेखन , नाट्यसंस्था उभारणी आणि नाट्यप्रशिक्षण
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार


सतीश वसंत आळेकर (जानेवारी ३०, इ.स. १९४९ - हयात) हे मराठी नाटककार आहेत.

जीवन

आळेकरांचा जन्म जानेवारी ३०, इ.स. १९४९ रोजी दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्‌सी. झाले.

शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्याछे मामा काकासाहेब गाडगीळ यांच्यामुळे काँग्रेस, साधना कार्यालयाजवळ घर असल्याने राष्ट्र सेवा दल आणि शेजारेच मोतीबाग असल्याने संघविचार असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.

शाळकरी वयात शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होतं. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले..

कारकीर्द

फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.

'मेमेरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच. पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला. 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.

'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.

विशेष

आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.

२९ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ’नाटककार सतीश आळेकर’ या विषयावर तीन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले आणि नाटककार दत्ता भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आळेकरांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. अतुल पेठे दिग्दर्शित ’नाटककार सतीश आळेकर’ हा माहितीपट दाखवला गेला.

या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध वक्त्यांनी मांडलेले विषय:-

  • आळेकरांच्या नाटकांची भाषा
  • आळेकरांच्या नाटकांतील आशयांची प्रयोगशीलता
  • आळेकरांच्या नाटकातील प्रयोगशीलता
  • आळेकरांच्या नाटकांतील मिथके
  • आळेकरांच्या नाटकांतील विनोद
  • सतीश आळेकरांचा नाट्यप्रवास
  • आळेकरांची नाट्यशैली
  • आळेकर आणि समकालीन नाटककार
  • आळेकरांच्या नाटकांतील सामाजिक जाणिवा
  • आळकरांची नाटके : सांस्कृतिक आकलन
  • आळेकरांच्या नाटकांतील स्त्री-पुरुष संबंध
  • आळेकरांच्या नाटकांतील स्त्री-व्यक्तिरेखा
  • नाट्यशिक्षण आणि आळेकरांची नाटके, वगैरे वगैरे.

चित्रपट/दूरदर्शन मालिका/डॉक्युमेन्टरीललित लेखन

रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.

रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्तीये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे. १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे.

सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके

नाटक सहभाग प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती प्रकाशक
अतिरेकी लेखन इ.स. १९९०
एक दिवस मठाकडे लेखन इ.स. २०१३
दुसरा सामना लेखन इ.स. १९८९ नीलकंठ प्रकाशन
बेगम बर्वे लेखन इ.स. १९७९ नीलकंठ प्रकाशन
महानिर्वाण लेखन इ.स. १९७४ १९७९, १९८७, १९.., २०११ नीलकंठ प्रकाशन
महापूर लेखन इ.स. १९७६ नीलकंठ प्रकाशन
मिकी आणि मेमसाहेब लेखन इ.स. १९७४ नीलकंठ प्रकाशन
शनिवार-रविवार लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
एकांकिका सहभाग प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती -
आधारित लेखन इ.स. २०११
आळशी अत्तरवाल्याची गोष्ट आधारित इ.स.
कर्मचारी आधारित इ.स.
जज्‍ज आधारित इ.स.
झुलता पूल लेखन इ.स. १९७२ नीलकंठ प्रकाशन
दार कोणी उघडत नाही लेखन इ.स. १९९६ नीलकंठ प्रकाशन
नशीबवान बाईचे दोन आधारित इ.स.
बसस्टॉप लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
भिंत लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
भजन लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
मेमरी लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
यमूचे रहस्य आधारित इ.स.
वळण लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
सामना लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
सुपारी आधारित इ.स.

पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार : इ.स. २०१२ []
  • बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार
  • द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार
  • सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार
  • एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्सवात करण्यात आलेला विशेष सन्मान (जुलै २०१२)
  • अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ (जून २०१२)
  • संगीत नाटक अकादमी सन्मान
  • फुलब्राइट शिष्यवृत्ती
  • नांदीकार सन्मान
  • एशियन कल्चरल कौन्सिल न्यूयॉर्कचा सन्मान, वगैरे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://ibnlive.in.com/news/full-list-2012-padma-awards/224135-53.html. January 25, 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

(http://www.cultureunplugged.com/play/2003/Satish-Alekar--The-Playwright)