राष्ट्र सेवा दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राष्ट्र सेवा दल (स्थापना इ.स.४ जून १९४१) ही एक लोकशाही समाजवादी संघटना आहे. या संघटनेची स्थापना मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात झाली.साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांनी या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. एस.एम.जोशी यांची दलप्रमुखपदी निवड करण्यात आली.

योगदान[संपादन]

स्वांतंत्र्य चळवळ[संपादन]

सेवा दलाच्या सैनिकांनी १९४२ च्या चले जाव च्या क्रांतीकारी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. सेवा दलाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवकांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.


स्वातंत्र्योतर[संपादन]

उल्लेखनीय कार्यकर्ते[संपादन]

स्वातंत्रपूर्व काळात [१]या चळवळीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खूप मोठा गट सक्रीय होता. त्यात भाऊसाहेब थोरात, राठी मामा, डॉ.महाले, चिमण शेठ मेहता, जाजू अशी मंडळी होती. या चळवळीतून एस.एम. जोशी, मधु लिमये,नानासाहेब गोरे, मधु दंडवते, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, स्मिता पाटील, दादा कोंडके, मेधा पाटकर,ग.प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, बा. य. परीट गुरुजी , मृणाल गोरे, पन्नालाल सुराणा, वसंत बापट, सदानंद वर्दे, माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रकाश मोहाडीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वातंत्र्य चळवळ आणि सामजिक क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ अमृत मंथन ( आत्मवृत्त ) - लेखक - भाऊसाहेब थोरात


बाह्यदुवे[संपादन]

अमृत मंथन - भाऊसाहेब थोरात