Jump to content

"चौल-रेवदंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:
==चौलमधील भेट देण्यासारखी स्थळे==
==चौलमधील भेट देण्यासारखी स्थळे==
* रामेश्वर मंदिर : रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. मंदिराचे छत उतरत्या कौलांचे बनले आहे. देवळाच्या पुढ्यात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करणी आहे. कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना म्हणता येईल. मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण मराठेशाहीत [[नानासाहेब पेशवे]], मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.

या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशा नावांची तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की, ‘पर्जन्य’, वारा पडला-गदगदू लागले की ‘वायू’ आणि थंडी-गारठा वाढला की, उर्वरित ‘अग्नी’ कुंड उघडायचे. गावातील त्या-त्या गोष्टींची उणीव ही कुंडे भरून काढतात, अशी मान्यता आहे. पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या नोंदी आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते.

१४:०७, २५ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.

पौराणिक नाव

दोन्ही स्थळांची पौराणिक नावे अनुक्रमे चंपावती आणि रेवती. चंपक म्हणजे चाफा, तर अशी चाफ्याची झाडे असलेला भाग तो चंपावती. याला आधार म्हणून आजही गावात जागोजागी असलेली चाफ्याची झाडे दाखवली जातात. काहींच्या मते इथे वापरल्या जाणार्‍या ‘चंपा’ नावाच्या मासे पकडण्याच्या जाळीवरून किंवा चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले, तर रेवदंड्याचे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या रेवती नावाच्या पत्‍नीच्या नावावरून पडले.

चौलची पर्यायी नावे

खौल, चंपावतीनगर, चावोल, चिमोलो, चिवल, चिवील, चेऊल, चेमुल, चेमुली, चौले, जयमूर, तिमुल, शिऊल, सिबोर, सिमुल, सेमुल्ल, सैमुर या नावांनीही चौल ओळखले जाते. इतिहासाचा प्रदीर्घ कालखंड, त्यातच बंदर असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या सार्‍यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती, लिपी, उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही नावांची जंत्री जन्माला आली.

चौलमधील राजाभाऊ राईलकरांची वाडी

राजाभाऊ राईलकरांनी पाऊण एकर जमिनीमध्ये ही शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष लावून ही जिवंत वनस्पतींची वाडी तयार केली आहे. यामध्ये आंबा, नारळ, पोफळी, फणस, रातांबा अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही परदेशी वनस्पती आहेत. एकेक झाड पाहताना हा खजिना उलगडत जातो. कवठी चाफा, बकुळ, सीतेचा अशोक, सोनटक्का, अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. वनस्पतींच्या दालनात अनंतमूळ, चित्रक, तुळस, ब्राह्मी, महाळुंग, वैजयंती, शतावरीसारख्या वनस्पती औषधी वनस्पती आहेत. जायफळ, दालचिनी, मिरीचा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि अननस, कॉफी, चॉकलेटमध्ये वापरला जाणारा कोकोे, साबूदाणा यासारख्या वनस्पती या वाडीत आहेत. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘अ‍ॅव्हाकॅडो’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘पॅशन फ्रूट’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत आहे. राईलकरांनी तोे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला आणि आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत.

चौलमधील भेट देण्यासारखी स्थळे

  • रामेश्वर मंदिर : रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. मंदिराचे छत उतरत्या कौलांचे बनले आहे. देवळाच्या पुढ्यात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करणी आहे. कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना म्हणता येईल. मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.

(अपूर्ण)