Jump to content

प्रवीण अनंत दवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रवीण दवणे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. प्रवीण दवणे ( ६ एप्रिल १९५९) हे मराठी लेखक, गीतकार, पटकथालेखक आहेत. ते ’ज्ञानसाधना महाविद्यालया’त प्राध्यापक होते तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले.

प्रवीण दवणे हे ठाणे शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी २०००हून अधिक गीते लिहिली आहेत, आणि ती लता मंगेशकर, आशा भोसले,पंडित जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर,सुलोचना चव्हाण, श्रीधर फडके,साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अशा अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत.

प्रवीण दवणे उत्तम वक्ते आहेत. ‘दिलखुलास’, ‘सावर रे!’ ' वय वादळ विजांचं', ' माझ्या लेखनाची आनंदयात्रा ' हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

प्रवीण दवणे यांची आजपर्यंत ११०हून अधिक पुस्तके व कविता संग्रह प्रकाशित केले आहेत.

पुस्तके

[संपादन]

त्यांची ' दिलखुलास ',' सावर रे!', ' थेंबातले आभाळ ' ' रे जीवना ' ,जाणिवांच्या ज्योती, आनंदोत्सव, ' देहधून ', 'द्विदाल ', 'सप्न बघा स्वप्न जगा ' ही पुस्तके फार नावाजली गेली आहेत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
जडे जीव ज्याचा
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंक्य मी बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन
अत्तराचे दिवस ललितलेख मंजुल प्रकाशन
अध्यापन आणि नवनिर्मिती लेखसंग्रह नवचैतन्य प्रकाशन
अपूर्वसंचित ललित लेखसंग्रह नवचैतन्य प्रकाशन
अलगुज कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
आनंदाचे निमित्त कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
आनंदोत्सव व्यक्तिचित्रणे मेनका प्रकाशन
आर्ताचे लेणे कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
आयुष्य बहरताना कथा नवचैतन्य प्रकाशन
एकांताचा डोह कथा नवचैतन्य प्रकाशन
ऐक जराना कथा नवचैतन्य प्रकाशन
कवी गोविंदाग्रज यांच्या कवितांचे निरूपण| नवचैतन्य प्रकाशन
कुणासाठी कुणीतरी कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
गरुडपंखी दिवस ललित नवचैतन्य प्रकाशन
गाणारे क्षण ललित सुरेश एजन्सी
गाणे गा रे पावसा बालकविता नवचैतन्य प्रकाशन
गाणे स्वातंत्र्याचे बालकविती नवचैतन्य प्रकाशन
घडणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शनपर नवचैतन्य प्रकाशन
चेहरा अंधाराचा कथा मंजुल प्रकाशन
चैतन्यरंग कथा नवचैतन्य आणि मंजुल प्रकाशन
जंतर मंतर पोरं बिलंदर बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन
जाणिवांच्या ज्योती सामाजिक नवचैतन्य प्रकाशन
जिवाचे आकाश ललित नवचैतन्य प्रकाशन
जिव्हाळ्याचे आरसे कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
जीवनरंग ललित नवचैतन्य प्रकाशन
जीवश्चकंठश्च!! पुलं, गदिमा साहित्य निरूपण नवचैतन्य प्रकाशन
थेंबातले आभाळ नवचैतन्य प्रकाशन
दत्ताची पालखी कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
दिलखुलास ललित नवचैतन्य प्रकाशन
देहधून कथा नवचैतन्य प्रकाशन
द्विदल कथा मेनका प्रकाशन
ध्यानस्थ कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
नाचे गणेशु कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
पद्मबंध कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
परीसस्पर्श सह्याद्री प्रकाशन
पाऊस पहिला ललित नवचैतन्य प्रकाशन
पिल्लू बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन
प्रकाशाची अक्षरे लेखसंग्रह नवचैतन्य प्रकाशन
प्रश्नपर्व वैचारिक नवचैतन्य प्रकाशन
प्रिय पपा नाटक मंजुल प्रकाशन
फुलण्यात मौज आहे बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन
बोका बालगीते नवचैतन्य प्रकाशन
भूमीचे मार्दव कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
मनाच्या मध्यरात्री कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
मनातल्या घरात ललित नवचैतन्य प्रकाशन
माझिया मना लेख नवचैतन्य प्रकाशन
मिश्किल आणि मुश्किल विनोदी नवचैतन्य प्रकाशन
मुक्तछंद मुद्रा प्रकाशन
मैत्रबन आठवणी नवचैतन्य प्रकाशन
मोठे लोक छोटे होते तेव्हा बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन
रंगमेध ललित नवचैतन्य प्रकाशन
रुजवात बालगीते नवचैतन्य प्रकाशन
रूप अरूप कादंबरी मंजुल प्रकाशन
रे जीवना! ललित नवचैतन्य प्रकाशन
विरामचिन्हे दिलीप प्रकाशन
शब्दांचा मोर भिजे कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
सातमजली नवचैतन्य प्रकाशन
सावर रे ललित लेखसंग्रह, भाग १ आणि २ नवचैतन्य प्रकाशन
सूर्य पेरणारा माणूस साप्ताहिक विवेक
स्पर्शगंध कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
हार्दिक वाचकपत्रांच्या सोबतीने केलेली शब्दयात्रा भाषाविषयक नवचैतन्य प्रकाशन
हे शहरा कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन

पुरस्कार

[संपादन]
  • मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार (२४ एप्रिल २०११)
  • सर्वोत्कृष्ट वाडम़याचा महाराष्ट्र राज्यपुरस्कार ५ वेळा
  • ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, मृत्युंजय प्रतिष्ठानचा शिवाजी सावंत पुरस्कार, अक्षर भारती पुणे यांचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचा डॉ. अ. वा. वर्टी पुरस्कार, पुणे ग्रंथालय पुणे संस्थेचा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार वगैरे.

बाह्य दुवे

[संपादन]