Jump to content

विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाषाशास्त्र - वर्गवारी

[संपादन]

कृपया सांगकाम्या मार्फत भाषाशास्त्र माहिती चौकटीतील लेख भाषाशास्त्र या वर्गात आणावेत. निनाद ०५:१२, १ ऑगस्ट २०११ (UTC)

राष्ट्रीय नव्हे...

[संपादन]

श्रावण कृष्ण द्वितीया या आणि इतर अशाच तिथींच्या पानावरील साचा पाहिला तर त्यात भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असा शब्द आढळला. वास्तविक,श्रावण कृष्ण द्वितीया ही हिंदू पंचांगातील (चांद्रमासातील) तिथी आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेत सौर कालगणनेनुसार तारखा (उदा. १७ श्रावण १९३१) असतात. शुक्ल आणि कृष्ण अशी पंधरवड्यानुसार विभागणी तिथे नसते. कृपया त्या साच्यात दुरुस्ती व्हावी ही विनंती.-मनोज ०५:२४, १ ऑगस्ट २०११ (UTC)

राष्ट्रीय शब्द गाळावा==
दिनदर्शिका हा मुख्य वर्ग, त्यानंतर हिंदू दिनदर्शिका हा उपवर्ग असावा. या उपवर्गात तामीळ दिनदर्शिका, मल्याळी दिनदर्शिका, )महाराष्ट्र-गुजराथ-कर्नाटक-आंध्र प्रदेशची)पौर्णिमान्त हिंदू दिनदर्शिका, अमान्त हिंदू दिनदर्शिका, बंगाली, राष्ट्रीय आदी दिनदर्शिका असाव्यात.

त्यानंतर, जैन दिनदर्शिका, व्यापारी दिनदर्शिका, मुसलमानी दिनदर्शिका(या दोन किंवा अधिक आहेत), पारशी दिनदर्शिका(याही बहुधा दोन असाव्यात), ग्रेगरी दिनदर्शिका, माया दिनदर्शिका वगैरे उपवर्ग असावेत. हिंदू पंचांगाला राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणणे खरोखरच अयोग्य आहे....J ०७:४१, १ ऑगस्ट २०११ (UTC)

श्रावण कृष्ण द्वितीया येथे मला भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असा शब्द आढळला नाही. गाळला आहे का? इतिहासात तशी नोंदही दिसली नाही. जे रावांशी बर्‍यापैकी सहमत. इतर भाषांच्या विकीवर हे कसे होते आहे? निनाद २३:५२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका शब्दसमूह साचा:भारतीय दिनदर्शिका महिना येथे आढळला.विशेष:येथे_काय_जोडले_आहे/साचा:भारतीय_दिनदर्शिका_महिना येथील पाने त्यास जोडली आहेत म्हणजे त्या पानांवर ते शब्द दिसतात.
भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका शब्दसमूह वर्ग:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका या वर्गीकरणात आढळला, साचा:हिंदू कालमापनच वर्गीकरण वर्ग:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका या वर्गातही झालेल दिसत अर्थात ते नोइन्क्लूड गटात झालेले वर्गीकरण असल्यामुळे इतर पुढच्या साचा:हिंदू कालमापन जिथे लावला आहे तिथे ते वर्गीकरण जात नाही.
मी वर जमेल ती माहिती शोधून दिली पण कालगणना प्रकरण मला नेहमीच पुरेसे न समजणारे आहे त्यामुळे चुकभूल देणे घेणे. अर्थात साचे वर्गीकरणे आणि त्यातही कालगणना प्रकरण शोधणे भलते क्लिष्ट आहे ,त्यामुळे मनोज आणि इतर सदस्यांनीही शक्यतो नेमक्या पानाचा दुवा दिला तर नेमके काय अभिप्रेत आहे हे लक्षात येणे इतर मंडळींना सोपे जाईल.माहितगार ०६:४८, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
माहितगार जी, धन्यवाद. तुम्ही जी माहिती शोधून दिलीत त्याच पानांमध्ये दुरुस्तीची जागा दडली आहे, हे निश्चित. मात्र साचे दुरुस्त कसे करावे याचे ज्ञान माझ्याकडेही नसल्याने मी हा संदेश अखेर निरूपायाने येथे लिहीला. हे क्लिष्ट काम कधीतरी करायलाच हवे. मराठीत कुणी नसेल तर परभाषांच्या विकितून मदत मिळू शकते काय. किंवा साचा दुरुस्त करण्याऐवजी एक नवा साचा तयार करून तो या सर्व जुन्या जागी रिप्लेस करणे कितपत व्यवहार्य आहे, तेही सांगावे.-मनोज २१:४६, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
जे काम माझ्याकरता क्लिष्ट आहे ते इतरांना क्लिष्ट असेल असे नाही. भारतीय महिन्ने आणि तिथ्यांबद्दलचे साचे आहेत अद्यापतरी मुख्पृष्ठावर नाहीत तेव्हा तुम्ही सुद्धा बिनधास्त करून पहा.परभाषी विकिपीडियाव्ररून मदत घेण्यास हरकत नाही पण साचांवर काम करणारी दीन विशेष वर सध्या बरीच मंडळी काम करण्यात उत्सूक आहेत आणि लक्षही घालत आहेत माहितगार २२:३७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

चित्र संचिका चढविण्यासाठी..

[संपादन]

मला असे वाटते की सर्व प्रकारचे लिखाण वा चित्र संचिका चढविण्यासाठी चावडीवर चर्चा करुन नंतरच ते पूर्णत्वास न्यावे असे मला आता वाटायला लागले आहे. नाहीतर माझ्यावर बंदी येण्याची शक्यता येईल अशी माझी धारणा होऊ लागली आहे. मला वाटते सर्वच्या सर्व प्रताधिकारित संचिका असलेल्या संचिका मी चढविलेल्या संचिका ज्या तत्परतेने काढल्या गेल्या त्याच तत्परतेने काढण्यात याव्या. या बाबत जाणकारांचे मार्गदर्शन लाभावे ही आशा. माझी भूमिका चुकीची ही असू शकते.

Dr.sachin23 १६:५०, २८ जुलै २०११ (UTC)

डॉ.सचिन,मराठी विकिपीडियाच्या 'मुक्तता' या मुल्या बद्दल मी नेहमीच जागरूक रहात आलो आहे. आणि अत्यंत टोकाची परिस्थिती असल्या शिवाय अद्याप कुणावरही बंदी आणली गेलेली नाही.तुमची काल चढवलेली छायाचित्रे तुम्ही लावलेल्या पानकाढा विनंती नंतर वगळली, अर्थात प्रताधिकाराची शंका असलेला मजकुर वगळताना प्रचालकांनी पानकाढा विनंतीची प्रतिक्षा करण्याची आवश्यकता आहे असे नाही.
प्रताधिकारांबाबत उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सदस्यांची संपादकांची स्वतःची असते.
विकिपीडिया प्रताधिकारीत मजकुर वगळण्याचे सुचवते कारण विकिपीडियावर विश्वास ठेवून तीसर्‍या व्यक्तीकडून तो मजकूर इतरत्र वापरल्या जाण्यात खंड पडतो.प्रचालक सुद्धा स्वयंसेवी काम करत आहेत आणि काय आणि केव्हा पर्यंत वगळावे असे त्यांच्यावर बंधन ना होते ना असेल. उद्द्या कदाचित तुम्हीही प्रचालक व्हाल (आणि व्हावे ही सदिच्छा) आणि ह्या भूमिकेचे महत्व काय होते ते लक्षात येईल.
प्रताधिकार सजगते बाबत साईट नोटीस वरून संदेश देणे सदस्यांच्या आणि छायाचित्रांच्या चावडीवर लिहिणे करून सारे झाले मी मागे तुम्हाला म्हणालो पण आहे की तुम्हीच नाही तर इतरही सदस्य हा विषय आवश्यक गंभीरतेने हाताळताना दिसत नाहीत. न पेक्षा एक दिवस संचिका चढवण्याची सुविधाच बंद करण्याची वेळ मराठी विकिपीडियावर नाही आली म्हणजे मिळवले.
प्रताधिकार मुक्त नसलेल्या अथवा तसे स्पष्ट नमुद न केलेल्या संचिकाची संख्या बॉटलावून वगळण्या एवढी मोठी आहे ते काम प्रचालकांच्या सवडीनुसारच होईल.एवीतेवी माझा दहा विस संचिका सोडून बाकी सगळ्या लवकरच वगळण्याचा मनोदय आहे तसे एकदा केले म्हणजे "हि पहा वगळलेल्या तीन हजाराहून अधिक संचिकांची यादी आता तरी संचिका चढवता ना प्रताधिकारमुक्त असल्याचे स्पष्ट नमुद करा" असे वाक्य संचिका चढवण्याच्या पानावर नमुद करता येईल.

माहितगार ०५:५५, २९ जुलै २०११ (UTC)

उगाच मधे येतो - मी चढवलेल्या सर्व संचिका या प्राताधिकार रहीतच आहेत. त्यांना त्यानुसारच हाताळले जावे ही विनंती! निनाद ०६:०२, २९ जुलै २०११ (UTC)
मुळीच नाही मधे आल्या बद्दल धन्यवाद, तुमच्या अलिकडच्या संचिकांवर प्रताधिकारमुक्त असल्याची नोंद केली आहेत या बद्दल धन्यवाद.केवळ तुम्हीच नव्हे इतरही काही सदस्य आहेत ज्यांनी चित्र प्र्ताधिकार मुक्त असल्याची नोंद इतरत्र केली आहे.यातली एक गोम अशी लक्षात घेतली पाहीजे ती अशी की लेखी पुरावा असल्या शिवाय इतर लोक तुमच्या वतीने चित्र प्रताधिकार मुक्त असल्याचे तुम्ही चढवलेल्या चित्रात नोंदवू शकत नाहीत तसे करणे त्यांच्या करता कायद्याची उल्लंघनाची जबाब्दारी स्वतःच्या गळ्यात घेतल्या सारखे होते.
समजा मला तुमचे नाव आणि तुमची छायाचित्रे प्रताधिकारमुक्त असल्याचे तुम्ही म्हणाल्याचे लक्षात आहे म्हणून मी तुमी चढवलेली आणि छायाचित्राच्या नोंदीत तशी नोंदनसूनही चित्रे वगळणार नाही पण सहा महिन्यानी कुणी एक नवे प्रचालक आले आणि त्यांनी हि चर्चा वाचली असेल असे नव्हे आणि त्यांच्या कडून अशी चित्रे वगळली जाण्याची शक्यता उद्भवू शकते त्यामुळे केवळ तुम्हीच नाही सर्वांनीच आपापल्या मागे चढवलेल्या सर्व संचिका तपासून पहाण्याची आणि प्रताधिकार मुक्त असल्याची कॉमेंट टाकण्याची अथवा पान काढा विनंती टाकण्याचे गरजेचे आहे.
२००५पासूनच्या चढवल्या गेलेल्या संचिका तपासल्या तर अगदी साध्या सदस्यांपासून ते पुढेचालून प्रचालक पदी आलेल्या आम्हा सर्वांनी चढवलेल्या छायाचित्रात प्रताधिकार मुक्ततेच्या नोंदींची अथवा चित्र वगळले जाण्याची गरज आहे.
डॉ.सचिन सहीत कुणाही सदस्याला वेगळे काढून हेत्पुरस्सर चित्रे/लेखन वगळण्याचा हा कार्यक्रम चालवत नाही आहे.कायद्दाच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. विकिपीडियावर ज्ञान मोफत दिल जात हे सलणारी मंडळीही समाजात असणार इतर संकेतस्थळावरील प्रताधिकार उल्लंघनाबद्दल ते दुर्लक्ष करतील पण विकिपीडीया सारख्या प्रकल्पावर डोळा ठेवला जाईल याचा त्रास संबधीत सदस्यास तर होईलच पण विकिपीडिया विषयी सहानूभूती बाळगून नवीन सदस्य मिळवण्याच्या प्रय्त्नात असलेल्या मंडळींपासून ते विकिपीडिया मोफत ठेवण्याकरीता देणगीनिधी मिळवण्याच्या मोहीम राबवणार्‍यांपुढे आपण निश्कारण समस्या निर्माण करत नाही आहोत ना याचा सर्व सदस्यांनी साकल्याने विचार करण्याची गरज आहे माहितगार ०६:३१, २९ जुलै २०११ (UTC)


जमेचे राजकारण

[संपादन]

मला असे वाटते कि हे काढा - ते काढा, माझे -तुझे करण्या पेक्षा सदस्यांनी वजवाकी पेक्षा जमेचे राजकारण करावे (फेअर टू युस).

  1. आपण प्राप्त परिस्थितीवर सर्वोत्तम तोडगा काय काढावा ?
  2. भविष्यात कमीत कमी चुका होण्यासाठी काय करावे
  3. झालेल्या चुका दुरुस्त कश्या करायच्या
  4. आणि त्या दुरुस्तीत नवीन चुका होणार तर नाही ना

यासाठी विचार करायला पाहिजे ह्यावर चिंतन करावे असे वाटते.

  • काही उपाय - आपणा कडे असलेल्या आधारभूत सुविधांमध्ये अजून बळकटी आणण्याची आज गरज आहे. सामान्य सदस्यांना प्रताधिकाराचे फारसे ज्ञान नसते त्यामुळे आपली व्यवस्थाच अशा प्रकारे असावी कि जिथे चुकांना कमीत कमी वाव मिळेल.

संचिका चढवतांना (वास्तविकतेवर आधारित फक्त उदाहरणा दाखल )

  1. सदस्याकडून प्रताधिकारा बाबतचे निवेदन घेणे (अनिवार्य)
  2. साचीकांचे दर आठवड्याला सांग्काम्या कडून सर्वेक्षण करणे
  3. त्रुटी आढळल्यास परस्पर सदस्याला सफाई देण्यासाठी निरोप/विपत्र देणे,
  4. ७ दिवसांचा कालावधी त्रुटी पूर्ततेसाठी देणे
  5. आठव्या दिवशी संचिका पुढील ७ दिवसात केव्हाही वगळल्या जाऊ शकते असे विपत्र देणे
  6. १५ व्या दिवशी संचिका वगळणे

सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने होतील अशी प्रणाली प्रस्थापित करावी.

  • फायदे
  1. कमीत कमी मनुष्य बळाचा वापर/ अंतर्भाव
  2. सर्व कामे स्वयंचलित असल्याने असे प्रश्न भविष्यात कमीत कमी उदभ्वतील
  3. नियमित काम झाल्याने अनुशेष तयार होणार नाही

कॉमन्स वर अशाच तर्हेची सुविधा अस्तित्वात आहे. तेव्हा प्रचाल्कानी केवळ एखाद्या प्रसंगावर कोणी कंठशोस केला म्हणून अथवा कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊन सर्व संचिका वगळण्या पेक्षा असलेल्या संचीकन मधून किती संचिका आपणास प्रताधिकाराच्या बगड्यातून वाचवता येतील ह्या उद्देशाने योजना आखावी हि विनंती. आपणास फेअर टू युस च्या कक्षेत काही गोष्टी आणता येतात का ते पण पाहता येईल . दुख प्रताधिकार नसलेल्या संचिका जाण्याचे नाही तर काही वास्तविक संचिका चुकेने गेल्या तरचे आहे . ( प्रतात्धीकरीत संचिका चढवल्यास चढवणारा जबाबदार आहे विपी नाही, पण प्रताधिकार मुक्त संचिका वगळल्या गेल्या तर मात्र त्यास आपणच जबादार राहू ) २००५ पासूनचा अनुशेष बाकी आहे तर अजूनही काही काळ थांबता येईल पण पूर्ण विस्तार अधिक विकास आराखडा तयार करूनच निर्णय घ्यावा असे वाटते. राहुल देशमुख १०:०४, २९ जुलै २०११ (UTC)

राहुल, एका अत्यंत चांगल्या पोस्टबद्दल तुम्हाला धन्यवादच दिले पाहिजेत. आपल्या या सूचनांचे स्वागतच व्हावे. अमलबजावणीत मात्र एक छोटीशी शंका जाणवते. ती ही की, विकिपीडियासारख्या सर्वजण स्वयंसेवी पद्धतीने कार्य करीत असलेल्या ठिकाणी या पद्धतीचा आखीव रेखीव पद्धतीचा रोडमॅप कितपत यशस्वी होईल. यापूर्वीही काही ध्येये प्रचालकांनी ठेवली होती. ध्येये उत्तम होती, पण तरीही ती पूर्ण झाली नाहीत. वरच्या उपायांचा आग्रह धरतानाच स्वयंसेवी कार्येही यशस्वी होतील, असे काही मॉडेल आहे काय याचा तपास सुरु रहावा असे आपल्याला आणि इतर सर्व विकिकरांना नम्र आवाहन. -मनोज १२:५२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
राहुल प्रतिसाद खरच छान आहे या बाबीशी सहमत.अर्थात दोन बाबी एकतर ऊचितवापर फेअर यूज या तत्वाचा उपयोग भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार या घडीला विकिपीडियावर करता येत नाही असे माझे मत राहीले आहे जे आतापर्यंत व्यवस्थीतपणे खोडल गेल नाही आहे (भारतीय कॉपीराईट काय्द्यात काही दुरूस्त्या प्रस्तावीत आहेत असे ऐकुन आहे पण कोअन्ताही कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजूरी आणि राश्ट्रपतींची सही होत नाही तो पर्यंत ग्राह्य होत नाही तो पर्यंत आज हा कायदा असा आहे आपल्याला आजच्या घडीला तो तसाच स्विकारावा लागतो.) .दुसरे असे कि कॉमन्स प्रमाणे संचिका चढवतानाच अनिवार्य पणे लायसन्स निवडायला लावण्याच्या संदर्भाने अल्पसे काम सुरूही केले पण त्यात फेअर यूज तत्वावर संचिका चढवणे प्रतिबंधीत करण्याच्या दृश्टीने व्यापक सहमती हवे त्याशिवाय ते काम तांत्रीक कारणाने पुढे नेता येत नाही आहे हे काम करण्याकरता हातात घेतल्या नंतर लक्षात येईलच.
दुसरे प्रताधिकार संबधीच्या कायद्यांबद्दलचे लेखही बनवण्यात सहभागाची आवश्यकता आहे हे एखाद व्यक्तीचे काम नाही.
काही कामे स्वयंचलित केली तरी काही गोष्टींवर प्रत्यक्ष मानवी निर्णयाचीच आवश्यकता लागते त्या दृष्टीने पकॉपीराईट काय्द्याच्या खाचा खोचा अधिक सदस्यांनी माहिती गरून घेणे गरजेचे आहे माहितगार १४:२०, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

डॉ. सचिन यांना विनंती

[संपादन]

डॉ. सचिन तुमच्या विकिपीडियावरील मोलाच्या सहभागाबद्दल आदर बाळगूनही मला गेल्या दोन प्रसंगांतील तुमच्या टिप्पणीमुळे निराशा वाटली. मागच्या प्रसंगात तुम्ही बार्नस्टार/तत्सम गौरव देण्याच्या रीतीवरून काहीसा गैरसमज करून घेतलात असे माझे निरीक्षण आहे. येथील सदस्य आपापले कामधंदे व प्रापंचिक जबाबदार्‍या सांभाळून कामे करत असतात आणि त्यातही आशय समॄद्धी व संबंधित प्रशासकीय कामांना कळत-नकळतपणे अधिक प्राधान्य मिळते. पण त्याचा अर्थ येथील सदस्यांना अन्य सदस्यांच्या सहभागाची कदर करावीशी वाटत नाही, असा काढला जाणे हे मनातील गैरसमजाचे निदर्शक वाटते.

विद्यमान प्रसंगातही प्रताधिकारित संचिकांच्या समस्येवरून तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेत आहात की काय, अशी शंका वाटते. प्रत्येक संचिकेबद्दल चावडीवर चर्चा घडवावी अशी अपेक्षा नाहीच्चे मुळी. विकिपीडियावरील धोरणे व मूल्ये यांबद्दल येथील अन्य अनुभवी सदस्य इतरांना सल्ले/सूचना देतच असतात. तसेच प्रत्येक सदस्यानेही आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल मराठी विकिपीडियावरील अन्य सदस्यांना अथवा चावडीवर माहिती विचारून किंवा वेळप्रसंगी इंग्लिश विकिपीडियावर तत्संबंधित माहिती शोधून गोष्टी जाणून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहेच. प्रताधिकार या मुद्द्याबद्दल विकिमीडिया फाउंडेशन अगदी शुद्ध धोरण बाळगत असेल, तर त्याच्या येथील एखाद्या सदस्याने केलेल्या अंमलबजावणीवरून आपल्यावर बंदी घातली जाण्याविषयीची भीती व्यक्त करणे अवास्तव वाटते.

तस्मात विकिपीडिया:पाच आधारस्तंभ या पानावर वर्णिलेल्या चौथ्या आधारतत्वातील एका वाक्यांशाची आठवण येते : ".. आणि इतर सदस्यही भल्या हेतूनेच विकिपीडियावर सामील होतात, असे गृहित धरा."

असो. मला तुमच्या मनात गैरसमज डोकावत असल्याची शंका वाटल्याने मी मनमोकळेपणाने लिहिले आहे. आपण यातून प्रामाणिक आणि निका अर्थ शोधाल, अशी आशा बाळगतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:२७, ३० जुलै २०११ (UTC)

<<विकिपीडिया मोफत ठेवण्याकरीता देणगीनिधी मिळवण्याच्या मोहीम राबवणार्‍यांपुढे आपण निश्कारण समस्या निर्माण करत नाही आहोत ना>>
<< न पेक्षा एक दिवस संचिका चढवण्याची सुविधाच बंद करण्याची वेळ मराठी विकिपीडियावर नाही आली म्हणजे मिळवले.>> माझ्यामुळे इतरांना त्रास संभावित आहे असे मला वाटते. माझ्या चुकीच्या कामामुळे इतरांना अडचण नको असे मला वाटते. चुकीचे काम करण्यापेक्षा मी काम नाही केले तर कुणाला ही त्रास संभावनार नाही.
डॉ.सचिन मला आपल्याबद्दल आणि आपण आत्तापर्यंत केलेल्या कामा बद्दल आदरच आहे.एक एक सक्रीय सदस्य जोडताना आपण सर्वच झटतो हे आपण पहात आला आहात. जसा तुम्हाला कुणाबद्दल व्यक्तिगत आकस नाही तसाच इतर कुणालाही तुमच्या बद्दल व्यक्तिगत आकस नाही त्यामुळे वरील वीषयावरून स्वतःही दोष देऊ नये ही नम्र विनंती.
एकुणच प्रताधिकाराच्या विषयावर मी वेळोवेळी लिहीत आलो आहे , कायद्याचा विषय आहे त्यास घाईने निष्कर्षाप्रत न येता गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे, या निमीत्ताने विषय ऐरणीवर येऊन उपयूक्त चर्चा घडावी या दृष्टीने काही अधिक उणे लिहिले असेल तरी हलके घ्यावे व्यक्तीगत मनाला लावून न घेता मुख्य उद्देश असलेल्या प्रताधिकार विषयावरील चर्चेत आपला सहभाग नोंदवत रहाल असा विश्वास वाटतो.माहितगार १५:१४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
<<रीतीवरून काहीसा गैरसमज करून घेतलात असे माझे निरीक्षण आहे. येथील सदस्य आपापले कामधंदे व प्रापंचिक जबाबदार्‍या सांभाळून कामे करत असतात>> (एखादा मुद्दा किंवा मत दामटण्यासाठी वादंग निर्माण करून विकिपीडिया ढवळून काढू नका; भल्या हेतूने वागा आणि इतर सदस्यही भल्या हेतूनेच विकिपीडियावर सामील होतात, असे गृहित धरा. स्वागतशील आणि दिलखुलास राहा.) आपल्याला वाटले असा माझा असा हेतू नाही, आणि नव्हताही. तुम्हाला भाषेमुळे जर दुखावले गेले असेल तर क्षमस्व...!!! इंग्रजी विपी वर असलेल्या 'फेअर टू युज' संचिका मराठीवर का रुचत नाही हे उमगले नाही. माझा कोणा एकासाठी आकसाने लिहिले होते असे समजु नका. सचिन १४:३९, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
डॉ.सचिन तुम्ही फेअर टू यूज विषयावरील चर्चेस सुरवात केलीत या बद्दल धन्यवाद.माझी इच्छा आहे की अधिकात अधीक मंडळींनी या चर्चेत सहभागी व्हावे. घटकाभर असे गृहीत धरू की 'फेअर टू युज' संचिका विकिपीडियावर वापरणे भारतीय काय्द्यानुसार व्हॅलीड आहे. आता मला कुणी सांगेल काय 'फेअर टू युज' ची व्याप्ती नेमकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते ?माहितगार १५:२६, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
'फेअर टू युज' वापरणे, यावर http://www.copyright.gov/fls/fl102.html नुसार Section 107 contains a list of the various purposes for which the reproduction of a particular work may be considered fair, such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Section 107 also sets out four factors to be considered in determining whether or not a particular use is fair:1. The purpose and character of the use, including whether such use is of commercial nature or is for nonprofit educational purposes 2. The nature of the copyrighted work 3. The amount and substantiality of the portion used in relation to the copyrighted work as a whole 4. The effect of the use upon the potential market for, or value of, the copyrighted work. विपी इंग्रजीवर फेअर-टु-युज मध्ये नॉन प्रॉफिट म्हणून संबोधलेले दिसते. मला यात काही फार कळते असे काही नाही सचिन ०३:३९, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
मी तेच म्हणतो आहे डॉ.सचिन मी विकिपीडियावार मागे लावलेल्या उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय ? या चर्चेस साधा एक प्रतिसाद देखिल आला नाही.आता तुम्ही पुन्हा एकदा आमेरीकन काय्द्याचा संदर्भ दिला आहे.
समजा उद्या तुम्हाला अथवा किंवा अजून xyz व्यक्तीला भारतीय न्यायालयात जाऊन उभ राहायला लागल तर तुम्ही-तुमचे वकील आमेरीकन कायद्याचे संदर्भ देणार आहात काय ? प्रतिपक्षाचा वकील काय म्हणेल ? महाशय या क्षणी तुम्ही भारताचे नागरीक आहात का याच्याशी सुद्धा कर्तव्य नाही या क्षणी तुम्ही भारतीय न्यायालयात उभे आहात, भारताचा कायदा हे अस सांगतो, तुम्ही भारतीय कायदा मोडला आहे त्यामुळे माझ्या अशिलाच नुकसान झाल आहे असा माझ्या अशिलाचा दावा आहे नुकसान भरपाईची रक्कम एवढी होते कारावास एवढ्या दिवसांचा आहे.आता पुढे बोला .
फॉर्यूनेटली अथवा अनफॉर्च्यूनेटली इतर गंभिर तरतुदींनाही समोर जाव लागू शकत म्हणून भारतीय काय्द्याचा संदर्भ आणि भारतीय वकीलाचा सल्ला घ्यामाहितगार ०६:२३, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
मला एक लक्षात येत नाही, विपी करीता कोणते कायदे लागु होतील, रागाऊ नका अमेरिकन? ब्रिटीश? भारतीय? http://copyright.gov.in/DocumentsSTUDY%20ON%20COPYRIGHT%20PIRACY%20IN%20INDIA.pdf या पानावर असलेल्या फेअर युज मध्ये म्हटले आहे ...... In order to strike a balance between the society's need for access to knowledge and the need to rewarding creators, limited uses of copyright protected works are permitted without authors consent. These are called `fair use' of copyright. Section 52 of Indian Copyright Act permits certain activities which do not amount to infringement. Important in this `exception list' are reproduction of literary, dramatic, musical or artistic works for educational purposes, e.g. research, review etc., and reporting in newspapers, magazines and periodicals etc. मग इथे असा प्रश्न येईल की फक्त चित्रेच काय एखादा परिच्छेद घेईन त्याच्या नावावर त्याचे कॉपीराईटस घेतले व आपल्या कोर्टात खेचले तर काय होईल? या परिच्छेदात वृत्तपत्रे, नियतकालिके नॉन प्रॉफिट असे कुठे ही उल्लीखित नाही. सचिन २१:५७, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

>>>मला एक लक्षात येत नाही, विपी करीता कोणते कायदे लागु होतील, रागाऊ नका अमेरिकन? ब्रिटीश? भारतीय?

विकिपीडियाला कुठला कायदा लागू होतो हा नंतरचा प्रश्न आहे.उदाहरणार्थ समजा तुम्ही एका भारतात प्रकाशित प्रताधिकारीत पुस्तकातली माहिती लेखकाच्या/छायाचित्रकाराची परवानगी न घेता दैनिक न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लेख लिहून छापून घेता. यात दैनिक न्यूयॉर्क टाईम्सला कायदे कुठले लागू होतात हा नंतरचा प्रश्न आहे.भारतात प्रकाशित प्रताधिकारीत पुस्तकाची अनधिकृत नक्कल झाली भारतीय हद्दीतून झाली अनधिकृत काम करणारी व्यक्ती मला भारतात उपलब्ध आहे मी खटला चालवण्याची परवानगी भारतीय न्यायालयात मागणार चूक तुमची असेल तर भारतीय न्यायालय तुम्हाला दंड ठोकणार. हा हिशेब साधा सरळ आहे यात मनात शंका ठेवण्या सारखे काही नाही माहितगार १७:३५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)


>>>आधी आपली कायदा कुठला लागू होतो हि शंका वरच्या उत्तराने पूर्ण निस्तरली असेल तर पुढे सेक्शन ५२ आधी येथे मूळ कायद्याच्या पानावर पूर्ण वाचून घ्या मग पुढील शंकांना उत्तरे देतो.माहितगार १८:१२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)



>>नॉन प्रॉफिट आणि एजूकेशनल

हे शब्द दिसतो तेवढा सरळपणे विकिपीडीयास लावता येत नाही, नाही तर विकिमीडिया कॉमन्सवर सुद्धा फेअर यूज संचिका स्विकारल्या गेल्या असत्या.आपण समजण्याकरतअ सोपे जावे म्हणून पुन्हा एकदा अभिरूप कोर्टात जाऊया प्रतिपक्षाचा वकील विकिमीडिया फाऊंडेशनकडून स्टेटमेंट मागवेल तुमचे वेबसाईट सध्या जाहीराती घेत नाही प्रॉफीट घेत नाही मान्य भविष्यातही न घेण्याचे वचन दिले आहे का ? तुमचे वेबसाईट स्प्ष्टपणे म्हणते की आम्ही भविष्यात जाहीराती स्विकारणारच नाही असे नाही.(पुढे कायद्याचा किस) .तुमचे वेबसाईट एजुकेशनल शिवाय इतर व्यक्तींना बघता येणार नाही अशी तुमच्या वेबसाईट मध्ये काय व्यवस्था आहे ? एवढेच नाही तर तुमचे वेबसाईट त्यावर उपलब्ध माहिती इतरांना कमर्शियल यूजकरताही वापरता येते आणि नॉन एजूकेशनल परपजेस करता सुद्धा कमर्शियली वितरीत करण्याची इतरांना आता सुद्धा मुभा देते (पुढे कायद्याचा किसाचा अजून एक मोठा ढिगारा). आणि समजा नॉनप्रॉफीट आहात सुद्धा तुम्हाला भारतीय कायद्याच्या या नियमांचे झालेले उल्लंघन कसे

भरून निघते? माहितगार ०६:४०, ६ ऑगस्ट २०११ (UTC)


प्रकल्प

[संपादन]

सध्या अनेक सदस्य प्रकल्प सुरू करण्याबाबत तसेच असलेले प्रकल्प वृद्धिंगत करण्याबाबत उत्साहाने चर्चा करीत आहेत. ही चर्चा अनेक सदस्यांच्या चर्चा पानांवर, चावडीवर होत असल्याने विस्कळीत झालेली आहे. याचे सुसूत्रीकरण व्हावे म्हणून चावडीवरून आधीपासूनच असलेल्या विकिपीडिया:प्रकल्प या पानाकडे चित्रदुवा दिलेला आहे.

प्रकल्पांबाबतची चर्चा येथे नोंदवावी. गरज भासल्यास उपपाने तयार करावी व मध्यवर्ती चावडीवर त्याची (छोटी) जाहिरात करावी. विशिष्ट सदस्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या चर्चापानावर विकिपीडिया:प्रकल्प किंवा त्याच्या उपपानाचा दुवा द्यावा.

आशा आहे याने असलेल्या व नवीन प्रकल्पांना नवीन चालना मिळेल.

अभय नातू १७:२५, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

अशक्त अतिभार

[संपादन]

गूगलवरून शोध घेऊन तुमच्या वेबसाईटवरच्या "अशक्त अतिभार" नावाच्या लेखावर केवळ कुतुहला पोटी पोहोचलो. तुमच्या शोधयंत्रात शोध घेऊन पाहीला पण कोणत्याही अर्थाची माहिती मिळाली नाही. अशा न कळलेल्या शब्द समूहांचे इंग्रजी प्रतिशब्द शोधण्याची काही सोय उपलब्ध आहे काय ? आपला आयुष्यमान भव १०:५३, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

मुखपृष्ठ संपादन

[संपादन]

मला मुखपृष्ठ संपादनाची परवानगी नाही असे सांगणारा एक संदेश मी वाचला. असे का, याचे उत्तर मात्र तेथे नाही. तसेच विकिपीडियावर मुखपृष्ठ संपादनाला कुणाला परवानगी आहे याचाही काहीच उल्लेख नाही. ही गोपनीयता कशासाठी? मला मुखपृष्ठ संपादित करावे असे वाटत असेल तर मी कुणाचे पाय धरावेत? बरे, ते धरूनही काम होईल याची शाश्वती नाहीच. (उदा. हिंदू पंचागाऐवजी राष्ट्रीय दिनदर्शिकेचा उल्लेख सुधारावा यास्वरूपाचा संदेश मी चावडीवर लिहीला कारण मी स्वतः ते करू शकत नाही. पण ते झाले नाही.) एका सदस्याने मला दिनविशेषवर काम करण्यासाठी बोलावले. पण दिनविशेष जेथे दिसते तीच मुखपृष्ठाची जागा जर संपादित करता येत नसेल तर काम करणार कसे? मला इथे चावडीवर यांची उत्तरे नकोत. त्यापेक्षा संपादनाची परवानगी नाही असे सांगणारा संदेशच परिपूर्ण करा, म्हणजे प्रत्येक परवानगी नसलेल्याला प्रत्येकाला आपण लेसर (Lesser)विकिमिडियन्स का आहोत हे कळेल तरी. .-मनोज २२:००, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

तुमच्या लिहिण्यात खोचकपणा आहे का न्यूनगंड (गोपनीयता, लेसर विकिमीडियन, इ.) याचे विश्लेषण न करता लिहितो. चावडीवर उत्तरे तुम्हाला नको असली तरी ती जगजाहीर व्हावी म्हणून येथेच लिहितो
मुखपृष्ठ हे इतर कोणत्याही सुरक्षित पानाप्रमाणे फक्त प्रचालकांना संपादित करता येते. याची दोन मुख्य कारणे आहेत.
१. मुखपृष्ठ हे high traffic पान असल्याने यावरील चुका लगेच मोठ्या संख्येने वाचकांना दिसतात. नवीन सदस्यांकडून चुका होण्याचा संभव जास्त असतो.
२. मुखपृष्ठाची रचना अनेक साचे वापरून केलेली आहे. त्यातील काही साचे क्लिष्ट आहेत आणि त्यातील बदल साचा जतन केल्याशिवाय दिसत नाही.
मुखपृष्ठ संपादन करण्याची परवानगी कोणाकोणाला आहे याचा उल्लेख कोठे पाहिजे. तुम्हाला संपादन करा हा दुवा दिसत आहे का? बहुधा दिसत नसावा.
सूचना, विनंती केल्यावर काम होईलच याची शाश्वती देण्यासाठी हे व्यावसायिक संकेतस्थळ नाही. किंबहुना अशा संकेतस्थळांवरही सूचना देउन, पैसे देउनही काम होईलच याचीही शाश्वती नसते....
जर तुम्ही काही काळ विकिपीडियावर घालवला असेल व त्याच्या संरचनेचा थोडासा अभ्यास असेल तर तुमच्या लक्षात येईल की --
  • मुखपृष्ठ/धूळपाटी आणि त्याची अनेक उपपाने असुरक्षितच आहेत. यावर तुम्हाला पाहिजे ते प्रयोग करुन पहा.
  • गरज भासल्यास मुखपृष्ठाच्या स्रोत पहा दुव्यावरुन स्रोत तेथे हलवून मग प्रयोग करुन पहा.
  • मुखपृष्ठ साच्यांनी बनलेले असल्यामुळे एखाद्या विशिष्ट विभागात बदल करावयाचा असल्यास फक्त तो-तो साचा बदलल्यासही काम होते.
  • हे साचे बरेचसे असुरक्षित आहेत. आणि सुरक्षित असल्यास कोणत्याही प्रचालकास विनंती केल्यास फक्त तेवढा साचा तात्पुरता असुरक्षित करता येतो. असे केल्याने मुखपृष्टाचा चेहरा बिघडण्याचा धोका कमी होतो.
अभय नातू २२:२६, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
ता.क. काही काळापूर्वी माहितगारांनी विश्वासू सदस्य या नावाची एक कॅटेगरी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या कॅटेगरीतील सदस्य प्रचालक नसले तरी अनेक महिने, वर्षे येथे कार्यरत असतील आणि त्यांना विकिसिंटॅक्सची चांगली माहीती असेल असे अपेक्षित होते. असे सदस्य बव्हंश पानांचे अनिर्बंध संपादन करू शकतील अशी सोय करणेही अपेक्षित होते. कदाचित परत त्यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे.
एकीकडे बिनधास्त बदल करा, विकिपीडियात आधीच्या सर्व आवृत्त्या जतन केल्या जातात अशा स्वरूपाच्या सूचना विकिपीडियांभर जागोजाग विखुरलेल्या, दुसरीकडे मराठी मुखपृष्ठाबाबत (किंवा तत्सम पानांबाबत) चालकांमध्येच अशी बिघडण्याची भिती. काय खोटे काय खरे, कुणास ठाऊक.-मनोज २३:१५, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
ह्ममम...मुखपृष्ठ आणित तत्सम पाने ही शंभराहून कमी आहेत. मराठी विकिपीडियावर एकूण ९०,०००पेक्षा जास्त पाने आहेत. सुरक्षित पानांपैकी प्रत्येक पान अन् पान सुरक्षित करण्यामागे कारणे आहेत. आत्तापर्यंत प्रचालकांच्या मते (आणि कृतीतही) सुरक्षित करणे हा शेवटचाच उपाय ठरलेला आहे. असे असताही मुखपृष्ठ बदलण्यासाठीचे उपाय वर लिहिले आहेत. यात खरे-खोटे ठरवण्याजोगे काही असल्यास जरुर ठरवून टाका.
अभय नातू २३:३३, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
ता.क. फक्त ६३ पाने पूर्ण सुरक्षित (फक्त प्रचालक ज्यात बदल करू शकतात अशी) आहेत.
१)या सर्व सुरक्षित पानांवर संदेश येताना तुम्हाला संपादन करण्याची परवानगी नाही याचसोबत फक्त प्रचालक यात बदल करू शकतात हे वाक्य यायला हवे, म्हणजे संबंधित सदस्य एखाद्या किंवा अनेक प्रचालकांना आपल्या विनंती, सूचना कळवू शकतील. फक्त तुम्हाला परवानगी नाही असे संदेश दिसणे अवमानास्पद वाटू शकते, शिवाय त्यात उपायाचा निर्देश नाही. त्यामुळे (खोचक वैगरे)प्रतिक्रिया येऊ शकतात. (२) माझ्या प्रतिक्रियेतला खोचकपणा व्यवस्थेसाठी आहे आणि असेल, मात्र त्याला उत्तर व्यक्तिकेंद्रित टिकेने मिळते ( उदा. तुमच्या लिहिण्यात खोचकपणा आहे का न्यूनगंड... याचे विश्लेषण न करता लिहितो) हा फरक कृपया लक्षात घेतला गेला पाहिजे. मराठी विकिवर एकापेक्षा अधिक वेळेला हे होते आहे आणि संयमाचा बांधही किती काळ टिकावा याला मर्यादा आहेत. -मनोज ०५:०८, ५ ऑगस्ट २०११ (UTC)
मनोज, इथे तुम्ही जे मुद्दा उपस्थित केला आहे तो एकच असला तरी त्यास एका पेक्षा अधिक पदर(बाजू) आहेत, आणि त्यातील तुम्ही दोघेही मांडू पहात असलेल्या काही गोष्टीत तथ्य आहे नाही असे नाही.मी एक-एककरून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
मुखपृष्ठाच काम कोण-कोणत्या पानांवरून होत याची माहिती विकिपीडिया:निर्वाह येथे आहे.तीथेच कोणती कामे प्रचालकांच्या आखत्यारीत येतात आणि कुठे होतात याचेही दुवे आहेत.प्रचालकांकडून नेमका कुठे आणि काय बदल करून हवा आहे ते विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे नमूद करता येते.अर्थात ज्यापानवर बदल करून हवा आहे त्याचा नेमका दुवा नमुद केला असल्यास प्रचालकांचे काम सुकर होते.
मुखपृष्ठाबद्दल बोलावयाचे झाले तर मागील काही वर्षापूर्वी इंग्रजी विकिपीडिया मुखपृष्ठावर अत्यंत अवघड उत्पात करून दाखवण्याच्या एका विशिष्ट घटने नंतर मुखपृष्ठ आणि त्या पर्यंत पोहोचणारी सारी पाने आणी critical पाने सुरक्षीत करण्याची प्रथा सुरू झाली.इंग्रजी विकिपीडियावर मुखपृष्ठ सदर इत्यादी पानांचे मुखपृष्ठावरील काम संपल्यानंतर त्यांना पुन्हा मुक्त (असुरक्षीत) स्थितीत आणण्याची प्रथा आहे.या बाबत मराठी विकिपीडिया तीन ठिकाणी वेगळा राहीला आहे पहिले मुखपृष्ठापर्यंत पोहोचणारी सारी पाने सुरक्षीत केली जात नाहीत कारण जसा इतर संपादनात मराठी विकिपीडियावर मनुष्यबळाचा अभाव आहे तो किंबहूना प्रचालकीय पातळीवरही आहे.याचाच अर्थ अद्यापतरी मुखपृष्ठापर्यंत पोहोचणार्‍या बर्‍याच पानांपर्यंत मराठी विकिपीडियान पोहोचू शकतात फक्त थोड्या अधिक शोधाशोधीची गरज आहे.
आता हि आणि अजून काही माहिती तुम्हाला/इतर सदस्यांना व्यवस्थितपणे मिळण्यात अडचण जाते आहे काय तर याचे उत्तर होकारार्थी आहे याचे कारण मराठी विकिपीडियावरील सहाय्य पानांची आणि संबधीत आपोआप मिळणार्‍या संदेशांची केवळ पहिल्या स्तराची उपलब्धता आहे,पुढचे स्तर उभेकरण्याकरीता सदस्यांनी पुढाकार आणि सहभाग घेण्याची गरज आहे.
मराठी विकिपीडियावर कोणती पाने सुरक्षीत आहेत आणि त्यांची सुरक्षा पातळी काय आहे आणि संबंधीत सूचना यात जशी गोची कमी प्रचालक माणूस बळा मुळे होते तशी ती प्रचालकांनाही एका पान सुरक्षीत झालेकी त्या पानाची सुरक्षा पातळी काय आहे हे संबधीत पानावरून खुद्द प्रचालकांनाही साईन आऊट करून पाहील्या शिवाय कळणार नाही अशी काहिशी गोची विकि सॉफ्टवेअर प्रणालीतपण आहे त्याकरता आजतरी आपण संवाद साधता आहात तसा सदस्यांनी संवाद साधण्याची गरज आहे.
मराठी विकिपीडियावर वाचकांकरीता चांगल्या स्थितितील वाचनीय मजकूराची कमतरता असल्यामुळे मुखपृष्ठावरील मासिक सदर होऊन गेलेली लेखपाने अनामिक आणि नवागत सदस्यांपासून अर्धसुरक्षीत ठेवली जातात त्यावर अर्धसुरक्षीतचा साचा लावण्याची गरज आहे अर्थात हे काम कोणतेही सदस्य करू शकले पाहिजेत त्याकरता त्यांनी प्रचालक असले पाहिजे असे नाही पण विकि सॉफ्टवेअर याबबतीतही त्यांची सुद्धा थोडी गोची करतेच तुम्ही प्रचालक नसला तरी सदस्य म्हणून प्रवेश केल्या नंतर सामान्य लेख पानातला आणि अर्धसुरक्षीत पानातला फरक सरळ लेख पानावरून तुम्हाला लक्षात येण्याचा कोणताही मार्ग नाही.याचा त्रास काही वेळा तुम्ही साईन-ईन केलेले नसते किंवा नकळत साईन-आऊट झालेले असता तेव्हा होतो आणि अर्थात अनामिक आणि नवागत सदस्यांची सुद्धा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गोची होत रहाते. याकरिता सध्यातरी विशेष:सुरक्षित_पाने यादीत पाहून अर्धसुरक्षीत पानांवर {{अर्धसुरक्षीत}} हा साचा लावण्याशिवाय पर्याय नाही.
माहितगार १०:२३, ५ ऑगस्ट २०११ (UTC)


  • yethe vadavadihi hote tar?
वाद नाही, संवादच आहे. मराठी भाषा आणि व्यक्तिवैशिष्ट्यानुसार कधीकधी तो जरा जास्तच स्पष्टपणे होतो, इतकेच. -०५:५७, ५ ऑगस्ट २०११ (UTC)
मनोज,
१. तुमची सूचना रास्त आहे. त्याप्रमाणे बदल केला गेला पाहिजे.
२. खोचकपणाने न लिहिता जर व्यवस्थित सूचना केलीत (वरीलप्रमाणे) तर पुढचे तंटे होण्याचा प्रश्नच येत नाही. मूळ सूचना जर का प्रामाणिकपणे लिहिली गेली तर त्यास अधिक चांगले उत्तर मिळेल.
३. संयमाचा बांध तुमचा नाही, प्रचालकांचा मोडण्यास आलेला आहे. तुम्ही अशाप्रकारे लिहिण्याची ही पहिली वेळ नाही. प्रचालक तुमच्यासारख्या असंख्य खोचक व्यक्तींना उत्तरे देत असतात. काही मंडळी पार उद्धटपणाही दाखवतात. संयम कोणाचा राखला जात असेल तर तो प्रचालकांचा आहे. आपण खोचक लिहिले तर ते व्यवस्थेसाठी आणि इतरांनी लिहिले तर ते व्यक्तिशः हा तुमचा युक्तिवाद दुबळा आहे.
४. मी स्वतः आणि इतर प्रचालक रोज अनेक लोकांशी संवाद सांधतात. ९०% लोकांशी वाद होत नाहीत याचे कारण त्यांची प्रश्न मांडण्याची रीत सदाशिवपेठी नसते.
असो. तुम्ही येथे करीत असलेले योगदान हे नक्कीच स्पृहणीय आहे आणि तिरक्या शब्दात टीका/सूचना न करता तुम्ही तुमची मते मांडाल ही आशा/अपेक्षा आहे.
क.लो.न.त.वृ.क.
अभय नातू १०:०८, ५ ऑगस्ट २०११ (UTC)

अभय,

आपल्या वरच्या मुद्द्यांविषयी माझी मते त्याच क्रमांकविल्हे वाचावीत.

१ सूचना रास्त वाटली, तसे सांगितलेत त्याबद्दल. धन्यवाद.

२. पहिल्या लिहिण्यात खोचक काही असलंच तर ते विकिपीडियाच्या व्यवस्थेला उद्देशून लिहीलं आहे, तु्म्हाला उद्देशून नाही. त्याचा तुम्ही एकटेच का त्रास करून घेताय जगात अशा इतरही अनेक व्यवस्थांमध्ये (उदा. देशातली लोकशाही, सत्तारूढ सरकारे, विशीष्ट पक्ष-संघटना इ.इ.) दोष किंवा त्रुटींवर वक्रोक्ती, उपाहास या मार्गाने टिप्पणी इथे आपल्यापैकी, आणि बाहेर जगातही अनेकजण वेळोवेळी करतात. तो समाजमान्य मार्ग आहे. तोच मार्ग विकिपीडियासाठी वापरला तर काही बिघडत नाही. विकिपीडियाच्या ध्येयधोरणांत तसं लिहिलेलं असेल तर त्याची लिंक द्या. वाचून मग थांबवतो.

वक्रोक्तीला वक्रोक्तीने उत्तर द्यायचे ही सुद्धा जगन्मान्य रीतच आहे. असे केल्यावर तुमची कशी चिडचिड झाली? विकिपीडियाच्या ध्येयधोरणात आहे म्हणून तिरकस लिहू नये असे माझे म्हणणे नाहीच. येथे घरचे खाउन लश्करच्या भाजणारे (मी एकटाच नव्हे) असताना उगाच वाकड्यात शिरुन लिहिल्यावरही काम होईलच याची शाश्वती नाही असे लिहून लिहिल्यावर तसे झालेच पाहिजे अशा डिमांड्स नोंदवणे हे रास्त नाही किंवा सभ्यपणाला धरुन नाही असे माझे मत असल्याने मी तसल्या वक्रोक्तीला वक्रोक्तीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मला वाटते तो तुम्हाला भलताच झोंबला.

3.संयमाचा बांध सुटतो असे वाटले तरी उत्तर द्या, असे विकि प्रचालकांवर बंधन आहे काय? तसे नसेल आणि स्वतःचा बांध सुटतोय असे वाटलेच, तर स्वतः थांबून इतर प्रचालकांना उत्तर देण्याची संधी देता येऊ शकते (हा आपला माझा मदतीचा प्रयत्न. असेच करा, असा आग्रह अजिबात नाही) व्यवस्थेबद्दल तिरकस लिहायची माझी कितवी वेळ आहे याचा मी हिशेब ठेवलेला नाही. व्यक्तिबद्दल मात्र मी कधीही प्रारंभालाच तिरकस लिहीले असे येथे घडलेलं नाही. त्यामुळे खोचक व्यक्तिंना हा शब्दप्रयोग माझ्याबद्दल मराठी विकिपीडियाच्या प्रशासकांनी (म्हणजे तुम्ही) चावडीवर जाहीर रितीने केल्याचा मी जाहीर निषेध करतो. विकिपीडियाबद्दल तिरकस लिहून दोषदर्शन करू नये असं विकिपीडियानं ठरवलेले धोरण असेल तर त्याची कृपया लिंक द्या. ती वाचून तसे लिहिण्याचे थांबवतो. बाकी माझा युक्तिवाद दुबळा आहे का भक्कम याचा न्यायनिवाडा करण्यासाठी इथे कुणी बसले आहे, अशी माझी कल्पना नाही. तशा न्यायनिवाड्याची व्यवस्था असल्यास त्याचीही कृपया लिंक द्यावी. ते वाचून माझे (हेही) विधान मी मागे घ्यायचे किंवा कसे हे ठरवतो.

तुम्हाला पाहिजे असल्यास तुमच्या वक्रोक्ती मी शोधून देऊ शकतो. असल्या टुकार कामात (तुम्ही टुकार नव्हे, तुमचे खोचक लिखाण शोधणे हे काम टुकार) वेळ घालवण्यात मला मुळीच रस नाही. तुमचा युक्तिवाद दुबळा आहे हे माझे रुलिंग (व्यक्तिशः, प्रचालक म्हणून नव्हे) आहे. पसंत नसल्यास वाट्टेल त्या न्यायसंस्थेकडून खातरजमा करुन घ्यावी.

४. विकिपीडियाची चर्चापाने आणि चावडीवरचे सूचनालेखन ठराविक शैलीतच व्हावे याची काही शैलीपुस्तिका लागू आहे काय? असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी. त्यात माझे इथले लेखन कसे बसत नाही याचेही कृपया मार्गदर्शन करावे. तसे केल्यास यापुढे मी स्वतःला सुधारून घेऊ शकेन. बाय द वे, आपण विशेषण म्हणून वापरलेली ही कुठली सदाशिवपेठ? माझ्या माहितीत एक सदाशिवपेठ आहे, तेथे सभ्य, सुसंस्कृत आणि सरळ बोलणारे, इतरांना नीट समजून घेणारे, व्यवस्था सुधारण्यासाठी धडपडणारे, प्रामाणिक सूचना करणारे लोक बहुसंख्येने राहातात अशी माझी माहिती आहे. ही सगळी वैशिष्ट्ये माझ्या लेखनात तुम्हाला आढळली, असेच आपल्याला या विशेषणातून सुचवायचे आहे काय? तसे असेल तर या गौरवाबद्दल धन्यवाद.

सदाशिवपेठी हे विशेषण तुम्हाला कळेलेले नाही...वाया गेले. असो. काही बिघडले नाही.

इतके लिहील्यावरही माझे इथले (एकूण) योगदान आपल्याला स्पृहणीय वाटते याचा मला आनंदच आहे (आनंद आहे या वाक्प्रचारात सामान्यतः आढळणारी खोच आणि तिरकेपणा येथे अजिबात नाही, विश्वास ठेवा.):)

क.लो.न.त.वृ.क. याचा प्रमाण मराठीतला लॉंगफॉर्म जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे तोवर त्यावर काही प्रतिक्रिया नाही.- मनोज १२:०२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

'ता.क.' नव्या सदस्यांसाठी आणि मजकुराच्या विकीमांडणी किंवा विकिसंपादनाशी फारसा परिचय नसलेल्यांसाठी: माझ्या मूळ मजकूरात वर काही परिच्छेद हेतुतः घुसडण्यात आले आहेत.तुमचा विकिकरणाशी परिचय नसेल तर तुम्हाला ते परिच्छेद परस्परविरोधी वाटू शकतात आणि सर्वच मजकूर मी एकट्याने म्हणजे मनोज यांनी एकट्यानेच असा परस्परविरोधी लिहीला आहे, अशी तुम्हाला शंका येऊ शकते. ते तसे नाही. वरील मजकुरात जेथे जास्त समास (मार्जिन) सुटल्यासारखे परिच्छेद दिसतात ते नंतर संपादन करून घुसडण्यात आले आहेत. आता ज्यांनी कुणी अशी बुचकळ्यात टाकणारी पद्धत वापरली, त्यांनी तसे का केले असावे याचा अंदाज करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवतो.(कारण मी काही लिहीन तर निष्कारण वाद वाढत जाईल.)आपण समजून घ्याल, ही अपेक्षा.धन्यवाद.-मनोज २०:१५, ८ ऑगस्ट २०११ (UTC)


व्यवहारात वापरायचे प्रमाण मराठी कोठे ठरवतात? प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नाही.
असो, आता ही खिटखिट माझ्याकडून तरी थांबवतो.
कळावे, लोभ असावा, नसला तर वृद्धिंगत करावा.
अभय नातू १५:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

बाय-द-वे, सदाशिवपेठी म्हणून जनरलायझेशन करून सदाशिव पेठ, पुणे येथील व्यक्तींची बदनामी करू नये, असे या सदाशिवपेठकर विकिपीडियनाकडून आग्रहाचे आवाहन :) असो. थंड घ्या. मनोज, मराठी विकिपीडीयाला सकारात्मक टीका नवी नाही. आपण सर्वजण मिळून जेवढ्या चांगल्या गोष्टी घडवू शकतो, ते घडवण्यावर लक्ष एकवटणे महत्त्वाचे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५३, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

नसलेली गोष्ट कशी वृद्धिंगत होणार?

[संपादन]

>>नसला तर वृद्धिंगत करावा<< हे कसे शक्य आहे? जी गोष्ट मुळातच नाही ती कशी वाढणार? शून्याला कितीनेही गुणिले तरी निकाल शून्यच असणार. ...J १०:३४, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

हा हा हा, जे.-मनोज २०:३०, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

जे,

माझ्या अभ्यासात शून्य ही फक्त एक संकल्पना आहे. Absolute शून्य हे अनंताप्रमाणेच (Infinity) शोधणे, सापडणे अशक्य आहे (बव्हंश बाबतीत) असे आलेले आहे. त्यामुळे शून्याचा अर्थ लिमिट टेंडिंग टू झीरो असाच गृहित असतो. आता मनोज यांना माझ्याबद्दल किंचित, कणमात्र तरी लोभ असेलच अशी माझी आशा आहे, तरी नसला तर याचा अर्थ शून्याच्या अगदी जवळ असलेला असा घ्यावा.

असो...हलकेच घ्या.

अभय नातू ०१:३६, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

संदेशबदल

[संपादन]

वर मनोज यांनी सुचवलेला बदल करण्यास गेले असता "तुम्हाला संपादन करण्याची परवानगी नाही" असा संदेश विशेष:सर्व निरोप येथे सापडला नाही. अधिक शोधाशोध करण्याआधी हा संदेश कोठे define केला आहे तुम्हा कोणास (प्रचालकांना माहिती असण्याची जास्त शक्यता) हे माहिती असल्यास कळवावे म्हणजे लगेच इच्छित बदल करता येतील.

अभय नातू १०:१८, ५ ऑगस्ट २०११ (UTC)

मीही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून तपासले मलाही संदेश आढळला नाही.संदेश खुप जास्त (साचा)संदेशांचा मिळून बनला असेल तरी शोधणे कटकटीचे ठरू शकते.ट्रांसलेट विकि शोधाशोध आणि/अथवा मेटावर चौकशी करावयास लागेल असे दिसते माहितगार ११:१९, ५ ऑगस्ट २०११ (UTC)
मला या चर्चेत पडायची फारशी इच्छा नाही. वरील संदेश मुखपृष्ठाच्या "स्रोत" मध्ये मला सापडला. तो आहे असा खाली लिहिला आहे......
स्रोत पहा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ चा
येथे जा: सुचालन, शोधयंत्र
तुम्हाला हे पान संपादा ची परवानगी नाही, खालील कारणासाठी:
हे पान बदल होऊ नयेत म्हणुन सुरक्षित केले आहे.
तुम्ही या पानाचा स्रोत पाहू शकता व प्रत करू शकता: ....मंदार कुलकर्णी १८:१२, ५ ऑगस्ट २०११ (UTC)
मंदार हे नोंदवल्याबद्दल धन्यवाद, असे संदेश प्रचालकांना ज्य त्या पानात बदलता येत नाहीत साचा नामविश्वा प्रमाणेच काम करणारे मिडियाविकी नामविश्व आहे त्यातील संबधीत साचा/साचे आढळत नाही आहे .विशेष:सर्व निरोप येथे हि पाच हजार पेक्षा अधिक संदेशांची यादी आहे त्यातून नेमका बदलावयाचा साचा शोधून हवा आहे.माहितगार ०५:४२, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
मला वाटते ट्रांसलेटविकिवर असावा, पण तेथेही मला आढळला नाही. कोणास सापडल्यास येथे कळवावे.
अभय नातू १५:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
धन्यवाद मंदार, तुमच्या शेवटच्या तीनओळीतलाच संदेश मला दिसत होता.- मनोज १०:४५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
असंबधीत संदेश आढळेपर्यंत हे काम पेंडीगला पडेल असे दिसते तेव्हा, अर्काईव्हींग करताना यातील सुयोग्य(आवश्यक तेवढा) भाग प्रचालकांना निवेदन चावडीवर न्यावा.माहितगार ०६:१४, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
मित्र मंडळी ट्रांसलेटविकिवर तुम्हाला $2 ची परवानगी नाही, खालील कारणांसाठी: + हे पान संपादा या दोन संदेशांच एकत्रिकरण होऊन तुम्हाला हे पान संपादा ची परवानगी नाही, खालील कारणासाठी: हे एकत्रित वाक्य बनत आहे. मित्रांनो ट्रांसलेटविकिवर मिडियाविकि संदेशांचे अनुवाद करणे आणि सुधारणा करणे या करिता प्रचालकपद असण्याची आवश्यकता नाही, अर्थात अनुवाद/संपादन करू देण्याची परवानगी मागण्या॰इ फॉर्मॅलिटी आहे ती तिथेच करावी लागते. एकुण प्रोसेस लक्षात यावी म्ह्णजे आपल्या नंतरच्या सदस्यांना मार्गदर्शन करणे सोपे जाईल या दृष्टीने सदर दुरुस्ती स्वतः करण्याचे टाळतो आहे सध्याच्या नवीन संपादक फळी पैकी प्रत्येकाने ट्रांसलेट विकिवर पुढाकार घेऊन सध्याच्या अनुवादातील ५० -५० तरी संदेश तपासून आवश्यक तेथे सुधारणा कराव्यात हि विनंती माहितगार १८:३९, २९ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रचालकानी सबुरीने घ्यावे

[संपादन]

सर्व पक्षाचे म्हणणे अगदी बरोबर आहे....पण, काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे सदस्यांमध्ये चिडचिड होणे स्वाभाविकच आहे.तरी प्रचालाकानी अज्ञानाने/अवधानाने त्यावर भाष्य करणे कितपत योग्य आहे हे देव जाणे.!! प्रत्येक सदस्याला येणाऱ्या अडचणीचे समाधान खोचक शब्धात करू नये कारण आपल्याला इथे अजून बरेच काम करायचे आहे आणि करवून घायचे आहे त्यासाठी मनुष्या बाळाची आवशक्यता आहे.

आसो, मराठीसाठी चाललेले हि धडपड बघून खूप बरे वाटले. आपल्यात वाद - सुसंवाद होतच राहतील. आपण सर्वजण निस्वार्थपणे काम करत आहात आणि हाच फरक आपल्यात आणि त्या कपटी राजकारणी मध्ये. नुसता मराठी मराठी करून त्याचे मार्केटिंग करणे कितपत योग्य ?

बाकी आपण सुज्ञ आहात !!!! सागर:मराठी सेवक १२:३२, ५ ऑगस्ट २०११ (UTC)

भाषांतर

[संपादन]

सध्या येथे इंग्लिश-मराठी भाषांतराची वाट पाहणारे ४०३ लेख आहेत. यातील काही लेखांचे भाषांतर झालेले आहे पण साचा काढायचा राहिला असण्याची शक्यता आहे. इतर काही लेखांमध्ये अगदी थोडा मजकूर भाषांतरित व्हायचा राहिला आहे.

वेळ मिळाल्यास या वर्गातील लेख चाळून तुमच्या आवडीच्या लेखाचे भाषांतर करावे व ४०३चा आकडा कमी करण्यास मदत करावी हे आवाहन.

अभय नातू २२:०१, ५ ऑगस्ट २०११ (UTC)

मला असे वाटते की हा एक प्राधान्याने करायचा प्रकल्प आहे. नवीन वाचक जर हे लेख वाचत असतील किंवा त्यांच्या नजरेस पडले तर त्यांचा नक्कीच गैर समज होऊ शकतो. आपण सर्वानीच थोडे थोडे लेख घेऊन हे पूर्ण मराठीत आणायला हवेत. जे लेख भाषांतराला फारच बोजड किंवा वैज्ञानिक असतील तर त्यातील इंग्रजी माहिती उडवून सवडीने नवीन मराठी माहिती भरावी असे वाटते. मी काम चालू केले आहे. आपण ही यात वाटा उचलावा....१९:२८, ६ ऑगस्ट २०११ (UTC)मंदार कुलकर्णी

थेट संबंध नसलेल्या साच्यांचा लेखात समावेश

[संपादन]

नमस्कार !

ज्योतिषातील ग्रह वगैरे लेखांमध्ये मुख्य विषयाशी थेट संबंध नसलेले अनेक मार्गक्रमण साचे लागलेले दिसत आहेत. उदाहरणार्थ हिंदू धर्मातील सोळ संस्कार, बारा ज्योतिर्लिंग मंदिरे, वेद वगैरे मार्गक्रमण साच्यांचा ज्योतिषातील ग्रह पानाशी काय संबंध ?! अश्या मार्गक्रमण साच्यांमुळे लेखात असंबद्ध माहितीची गिचडी होते व मुख्य लेखविषयात माहितीचा सुसूत्रपणा उरत नाही.

या विषयाशी दूरान्वयाने संबंध असलेल्या लेखांकडे वाचकाला किंवा संपादकाला आकर्षून घायचे असल्यास विकिप्रकल्प किंवा दालन चालू करावे, व त्यात संबंधित लेखांचे दुवे व चालू कामे इत्यादी गोष्टी कराव्यात. खेरीज लेखात नोंदवलेल्या वर्गात जाऊन त्या वर्गातील संबंधित विषय वाचकाला/संपादकाला दिसू शकतातच.

तूर्तास, अश्या लेखांमधून थेट संबंध नसलेले साचे लवकरात लवकर वगळावेत ही संबंधित संपादकांना विनंती. हे काम करण्यासाठी सांगकाम्या चालवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४३, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

विविध मार्गक्रमण साच्यांमुळे लेखात असंबद्ध माहितीची गिचडी होते व मुख्य लेखविषयात माहितीचा सुसूत्रपणा उरत नाही. या मताशी काहीसा सहमत आहे. हिंदू धर्म प्रकल्पावर कार्य काही काळातच सुरू होईल. याचे कार्य कसे करावे आणि कुठून सुरुवात करावी याचा गोषवारा ठरवत आहे. मात्र तरीही, ज्योतिषातील ग्रह येथून ज्योतिषातील राशी किंवा उलट असे साचे काढणे योग्य नाही. त्यांचा परस्पर संबंध दांडगा आहे. किंबहुना ते निरनिराळे असून फारसा अर्थच नाही. त्यात भारतीय महिने आहेतच या शिवाय नक्षत्र आणि पंचांगातील काही विषय हे साचे अजून यायला हवे आहेत. यथावकाश ते ही येतील. तोवर थेट संबंध नसलेले साचे, हे थेट संबंध नाही हे निश्चितपणे म्हणू शकल्यास नक्कीच काढावेत याच्या सहमत. पण थेट संबंध नसल्यासच! तोवर काढलेले साचे लावण्याचे पाहा :) निनाद ०६:५७, ६ ऑगस्ट २०११ (UTC)


हा दोष ना तुझारे ..... अपराध मीच केला ..

[संपादन]

दोन दिवस अनुपस्थित होतो तर इकडे चावडीवर बरेच फटाके फुटल्याचे दिसले, आता बरेच पाणी वाहून गेले आहे तरी...

  • खरेतर ह्या प्रसंगाला मीच कारणीभूत आहे असे मला वाटते.

मीच श्री मनोज ह्यास दिनविशेष वर काम करण्याचे निमंत्रण दिलेहोते . त्यांनीही तत्काळ होकार दिला. तदनंतर त्यांनी त्यावर काम करणे साहजिकच आहे. दिनविशेष हे मुखपृष्ठा वर दिसते आणि त्यांनी तेथे जाऊन संपादन करण्याचा प्रयत्न केला असावा आणि तेथील संदेश वाचून त्यांचा वैताग होणे स्वाभाविक आहे. मला असे वाटते कि सदर निमंत्रण देतांना मीच कामाबाबतची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात कुठेतरी कमी पडलो आणि माझ्या ह्या चुकीमुळेच पुढील अनर्थ घडला. तेव्हा मी झाल्या प्रकाराची नैतिक जबादारी स्वीकारून आपण उभयतांची माफी मागतो.

मनोज जी अभय नातू हे माणूस आहेत त्यांच्या विपी बाबतच्या प्रतीबाद्ध्तेबाबत आपलेही दुमत नसावे. तेव्हा एखादा मणुस मर मर काम करतो आणि कामाच्या दबाव खाली असतांना टीका टिपणी झाली तर त्यानाही चीड येणे हे मानव सुलभ आहे. (नातूंना विपी वर चार खून माफ ...! )

दुसरीकडे अभय आपण पण परिस्थिती सदस्याच्या भूमिकेतून पाहून प्रतिक्रिया दिली तर होणारे अनर्थ टाळता येतील असे वाटते. आपण उभयतःना हा विषय येथेच संपवण्याची नम्रविनंती. अशा वादांना अंत नसतो तो आपणच संपवायचा असतो. चावडीवर अशातर्हेचे वाद लांबवून नवीन वाचकांपुढे चावडीची प्रतिमा मलीन तर होणार नाही ना ह्याची काळजी माझ्यापेक्षा आपण दोघांनाच जास्त आहे हे मी जाणतो.

प्रस्ताव

[संपादन]

दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदार्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्यां अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून सांभाळत आहेत. वाढत्या व्यापा बरोबरच खांदे हि वाढवावे असे वाटते जेणे करून कामाचा वयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील.

माहितीगार हे कुशल संघटक आहेत, ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत, तांत्रिक तसेच धोर्णात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. तेव्हा माहितीगारांना प्रशासक पदाची अतिरिक्त जबादारी देण्याची मी अभय नातू यांना विनंती करीत आहे. माहितीगराच्या समावेशाने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल असे वाटते.
धन्यवाद ...!
राहुल देशमुख १८:१६, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
माहितीगारांना प्रशासक पदाची अतिरिक्त जबादारी देण्याची मी अभय नातू यांना विनंती करीत आहे. माहितगार तयार असल्यास माझा पाठिंबा आहे. :) निनाद ००:००, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
माहितगारांना मी मागच्याच आठवड्यात ही जबाबदारी घेण्यास सुचवले होते, तरी त्यांच्या प्रशासकपदाला माझा अर्थातच पाठिंबा आहे (सदस्य म्हणून)
वादावादीचे म्हणलात तर मी तो संपवला. यासाठी वरील उपविभाग वाचायचाच नाही असे मी ठरवले आहे म्हणजे काहीही लिहिले असले तरी त्याला उत्तर द्यावेसेच वाटणार नाही. एक-दोन आठवड्यात तो उपविभाग अडगळीच्या खोलीत गेला की मग तर विषय पारच संपला असे मला वाटेल.
अभय नातू ०१:२०, ८ ऑगस्ट २०११ (UTC)


विकिमित्रांनो, आपल्या सर्वांच्या समर्थना बद्दल धन्यवाद, पण येत्याकाळात मी काही काळ विकिरजेवर जाण्याची शक्यता आहे, काही कालावधी नंतर सुयोग्यवेळी मी स्वतःहून मी विंनंती करेन.खरेतर प्रशासंकाचे बॉट फ्लॅगदेण्याचे जे मुख्य काम आहे त्यात बारीक त्रुटी ध्यानात यावयास हव्यात,शिवाय सदस्यांचे नवीन अधिकारगटांबद्दल संकल्पने मागेकाही प्रस्ताव ठेवून समर्थन घेतले आहे त्यावरही अधिक कामकरणे संकल्पला सुकर होईल आणि इतरही अनुभवाच्या दृष्टीने संकल्पने ही जबाबदारी स्विकारावी आणि आपण सर्वजण संकल्पला आवश्यक सहकार्य आणि समर्थन देऊच. माहितगार ०५:३४, ८ ऑगस्ट २०११ (UTC)


जनादेश

[संपादन]
  • प्रिय माहितीगार यास,
मुद्दाम प्रिय लिहण्याचे प्रजोजन म्हणजे आता ह्या प्रेमापोटी घातलेल्या साकड्या तून आपली सुटका नाही. प्रशासक पदासाठी आपल्या नावाच्या माझ्या प्रस्तावाला समस्त विकिकर मंडळींनि दुजोरा दिलेला आहे. तेव्हा त्यांच्या ह्या प्रेमाचा मान राखून आपण ह्या पदाचा कार्यभार सांभाळावा. आपण याला विनती समजा अथवा ( आदेश ) जनादेश. काम करणार्‍याला पद आणि बिरुदांची आवशकता नसते हे मी जाणतो म्हणूच मी नेहमी म्हणतो "कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाल; जो पावतो तो देव" पण आपणास प्रशासक पदाचे अधिकार देत असतानाच सोबत काही जबाबदार्या आणि अपेक्षांचे ओझे पण आम्ही देत आहोत आपण त्यास योग्य न्याय द्याल ह्यातदुमत नाही. आपण संकल्पच्या नावाचा पर्यायी प्रस्ताव देऊन आपल्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. संकल्पचा वेगळा प्रस्ताव चावडीवर मांडावा आपण त्यासही मान्यता देऊ. तेव्हा आपण त्वरित कार्यभार सांभाळावा. आपणास प्रशासक म्हणूनही रजेवर जाण्यास काही हरकत नसावी.
धन्यवाद
राहुल देशमुख ०९:१०, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

अगदी, अगदी राहुल. माहितगार यांनी प्रशासक म्हणून काम करावे, या राहुल यांच्या प्रस्तावाला माझा पूर्णतः पाठिंबा आहे. माहितगार यांनी प्रशासक म्हणूनच विकिरजेवर जावे - मनोज २०:००, ८ ऑगस्ट २०११ (UTC) आणि हो संकल्प यांनीही नक्कीच प्रशासक व्हावे, खरोखर. सर्वांचाच भार हलका होईल आणि माहितगार म्हणतात ते फ्लॅगबॉट देण्याचे आणि इतर तांत्रिक कामेही अधिक गतीने होऊ शकतील. राहुल आणि माहितगार यांच्या संकल्पविषयक प्रस्तावालाही हार्दिक पाठिंबा - मनोज २०:३९, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

  • माहितगार यांच्या प्रशासकपदास माझे समर्थन आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:३३, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

विनंती

[संपादन]

मनोज जी,

मी आपणास विनंती करू इच्छितो कि मुखपृष्ठ संपादनावरुंच्या वादावरील चावडीतील लेखनास चावडीवरील अडगळीच्या खोलीत स्थानांतरीत करून ह्या प्रकरणावर पडदा पडण्यास आपण परवानगी द्यावी. वाद आणि संवाद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे आणि तेच विपिच्या जीवित असण्याचे प्रतिक पण. जर वरील विनंतीस आपली सहमती असेल तर मी सदर चर्चेचा भाग त्वरित विदागारात स्थानांतरीत करतो. अभय नातुंची ह्यास पूर्व परवानगी आहेच आसे मी गृहीत धरतो. राहुल देशमुख ०७:५७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

राहुल जी, माफ करा, पण वाद आणि संवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपले ठाम मत असेल तर मग चावडीवरून अडगळीच्या खोलीत जात असलेल्या मजकुराची रांग (क्यू) का मोडावी? सदर चर्चेचा भाग अडगळीच्या खोलीत स्थलांतरित करण्याची घाई करू नये. चावडीवर यापेक्षाही जुना मजकूर आहे तो आधी जाऊ द्यावा नंतर या मजकुराचा नैसर्गिकरित्या विदागारात जाण्याचा क्रम येईल तेंव्हा हाही मजकूर जाईलच, त्यावेळी तो थांबवण्याचेही कारण नाही (पण ते त्यावेळी.)आता केवळ वाद दिसतो म्हणून अडगळीत टाकावा, याला मी अनुकूल नाही.-मनोज २०:२७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

ता.क.- वेळात वेळ काढून एकदा इथल्या अडगळीच्या खोल्यांमधून जरुर फिरून या.:)- मनोज २१:२०, ८ ऑगस्ट २०११ (UTC)


प्रशासक-प्रचालक काही समज गैरसमज

[संपादन]
अभय नातूंची माफी मागून एक नमूद करावस वाटतकी प्रशासक आणि मूळ वापरला गेलेला Bureaucrat हे दोन्ही शब्द विनाकारण सदस्यांमध्ये त्या पदात फार विशेष कार्य आणि अधिकार असल्याची साफ चूकीची समजूत होण्यास कारणीभूत होताना दिसतात.सुरवातीस प्रबंधक शब्द वापरण्याचे टाळून प्राचालक आणि Bureaucrat च्या पुढची पायरी सुद्धा प्रतिपालक स्टूअर्ड अशी आहे आणि Sysop प्रचालक Steward प्रतिपालक हे शब्द नेहमीच्या उपयोगातले नसले तरी कार्यक्षेत्राच्या व्याप्ती बद्दलचे चुकीचे अर्थ पसरवत नाहीत Bureaucrat--प्रशासक शब्द विनाकारण तिथे खूप काही विशेष अधिकार किंवा जबाबदारी आहेत असा उगाचच गैर समज पसरवतो अस माझ व्यक्तीगत मत आहे. सदस्य मंडळी Bureaucratबद्दल en:Wikipedia:Bureaucrats इथे अधिक माहिती वाचून अधिक चपखल शब्द सुचल्यास विचार करा.
Bureaucrat हे पद बॉट्स ना बॉटफ्लॅग देण्याच कार्य आणि तुमच्या सदस्य खात्याच नाव बदलून हव आहे अशी कामे (हि कामे जबाबदारीची असली तरी एका अर्थाने किरकोळ आहेत अर्थात बॉटफ्लॅग देण्यापूर्वी बॉटचा करावा लागणारा अभ्यासहे अत्यंत वेळखाउ आणि मेहनतीच काम आहे यात शंका नाही) स्वतंत्रपणे बजावत बाकी इतर प्रचालकांची नेमणूक हे काम स्वतंत्रपणे करण्याच नाही तुम्ही सांग म्हणजे मी करतो या गटात येत.प्रतिपालक मंडळीतर मेटावर असतात तुमच्याकडे एकदा ब्युरोक्रॅट आहेत म्हटल्यावर सहसा तुमच्याकडे बघत पण नाहीत.
प्रचालकही केवळ इमर्जंसीत स्वतंत्रपणे निर्णय घेतो अथवा एखादा वाद झाला तर तो होऊन गेल्यावर अगदी बहूमताच्या विरूद्धची बाजू घेण्याचही स्वातंत्र्य प्रचालकास आहे नाही अस नाही पण तो अपवादच आहे. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याची अमलबजावणी एवढच प्रचालकाच काम आहे.
तेव्हा एखाद काम प्रचालकांकडून करून हव असेलतर एक प्रस्ताव मांडा बाकीच्या मंडळींच अनुमोदन घ्या आणि काय जो सहमतीचा अंतीम निर्णय असेल तर प्रचालकांना कळवा. हां प्रचालक अशावेळी एखाद्या ठिआकाणी चर्चा करताना किंवा मत नोंदवताना आढळले तर ते एक सामान्य सदस्य या नात्यानेच करत असतात. एखाद्या वादाचा निर्णय नाहीच होऊ शकला तरी सहसा जाणत्यापैकी कुणीही प्रचालक नसलेली व्यक्ती पण अंतरीम बाजू घेऊ शकते आणि त्याची अमलबजावणी प्रचालकांनी करणे अभिप्रेत आहे.
आणि हि सगळीच पद सदस्य समूदायानी सहमतीनी सांगीतल्या नंतर काम करण्याची आहेत. अशात एक स्टूअर्ड मराठी विकिपीडियावर आमंत्रण नसताना डोकावून गेला मीच उलटा मेटावर जाउन त्याला आमच्या आमंत्रणाशिवाय का दखल दिली या बद्दल रागवून आलो अर्थात या गोष्टीची आपल्यापैकी कुणाला कल्पना असण्याची शक्यता कमी आहे.
सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्हाला अगदी मुखपृष्ठाच संरक्षण कवच काढून हव असेलतर चावडीवर प्रस्ताव ठेवा सर्व सदस्यांची सहमती मिळवा प्रचालक म्हणून त्याची अमल बजावणी आम्ही करू.यात अंतीम नाही पण आतापुरता शेवटचा अजून पैलू लक्षात घ्या की एखाद्या लेखाच नाव बदलण्याबद्द्ल सर्वात एखाद्या प्रस्तावावर सहमती झाली तर लेखाच्या नावाच स्थानांतरण करण्याकरता प्रचालक लागत नाही.जिथे प्रचालक लागत नाही तुमची आपाप्सात सहमती आहे त्या गोष्टी प्रचालकांना निवेदनच्या चावडीवर जाण्याची सुद्धा गरज नाही,
ज्याकामाकरता प्रचालकांपर्यंत जाण्याची गरज नाही किंवा गेलात पण इतर सदस्यांची सहमती घेतलेली नसेल आणि प्रचालक ढिम्म हलले नाही तर उगाचच मनात राग बाळगू नका कदाचीत ते काम तुमच्या स्वतःच्या अखत्यारीत आहे हे ल्क्षात घ्या.
माहितगार २१:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi चावडी,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.


But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

As you are part of WikiMedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


Please forward to relevant folks in the community. If you want the bot to do the job please sign up at [१] --Naveenpf ०५:२५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

दर सक्रिय सदस्यामागील लेखसंख्या - विकिपीडियांची तुलना

[संपादन]

हिंदी विकिपीडिया १ लाख लेखसंख्येच्या उंबरठ्यावर पोचल्याच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी लेखसंख्या, कुपोषित लेख(किंवा एकही वाक्य न लिहिले गेलेले बगला-वर-करू लेख), आशयघनता यांविषयी थोडक्यात चर्चा झाली होती. तोच धागा पकडून आशयसंपन्न म्हणून गणल्या गेलेल्या विकिपीडियांची आणि काही आशियाई व भारतीय भाषी विकिपीडियांची सदस्यामागील लेखसंख्या या निकषाबद्दल तुलना केली (तसेच स्वाहिली या एका आफ्रिकी भाषेचाही अंतर्भाव समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक प्रगती आणि विकिपीडियाची परिणामकारकता जोखण्याच्या उद्देशाने केला आहे). या तौलनिक अभ्यासात एखाद्या विकिपीडियावर दर महिन्यात पाचाहून अधिक संपादने करण्याचा किमान निकष लावून सक्रिय सदस्यांची संख्या गणली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्या विकिपीडियावरील सक्रिय सदस्यसंख्येची सरासरी काढून ती या अभ्यासात नोंदवली आहे. त्या-त्या विकिपीडियांवरील मुख्य नामविश्वातील लेखसंख्या आणि उपरिनिर्दिष्ट सक्रियसदस्यसंख्या यांचे गुणोत्तर काढून खालील सारणीत मांडले आहे :

भाषी विकिपीडिया लेखसंख्या गेल्या ६ महिन्यातील सरासरी सक्रिय सदस्यसंख्या (मासिक ५ संपादनांची किमान सरासरी ओलांडणारी) सक्रिय सदस्यावरील लेखसंख्येचा बोजा (पूर्णांकी)
मराठी विकिपीडिया ३४,३३८ २७.३३ १,२५६
इंग्लिश विकिपीडिया ३७,०३,६९३ ३७,२१६.६६ १००
जर्मन विकिपीडिया १२,६९,२३३ ७१३६.३३ १७८
जपानी विकिपीडिया ७,६१,६९५ १९६९ ३८७
पूथोंग्-ह्वा चिनी (zh) विकिपीडिया ३,६८,३७७ १६९३.३३ २१८
अरबी विकिपीडिया १,५४,२८५ ४६२.५ ३३४
इंडोनेशियन विकिपीडिया १,६९,८०५ ३४७.३३ ४८९
थाई विकिपीडिया ६८,३१७ २८८ २३७
मल्याळम विकिपीडिया १९,०३५ ८३.५ २२८
तमिळ विकिपीडिया ३५,०६० ६६.६६ ५२६
बांग्ला विकिपीडिया २२,२१७ ४४ ५०५
हिंदी विकिपीडिया ९९,४७४ ५०.८३ १९५७
स्वाहिली विकिपीडिया २१,६८५ १०.३३ २०९९

या अभ्यासानुसार हिंदी विकिपीडिया व स्वाहिली विकिपीडियावरील दर सक्रिय सदस्याच्या खांद्यांवर ~२००० लेखांचा बोजा आहे. मराठी विकिपीडियावरही दर सक्रिय सदस्यावर ~१२०० लेखांचा पसारा सांभाळायची जबाबदारी आहे. याच्या तुलनेत बांग्ला व तमिळ विकिपीडियांवर दर सक्रिय सदस्याला मध्यम प्रतीचा ताण पडतोय, असे दिसते. जे विकिपीडिया आशयघन आहेत - उदा., इंग्लिश जर्मन, पूथोंग्-ह्वा चिनी, थाई इत्यादी - त्यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या सदस्यांवर तुलनेने हलका भार असण्यात दडले असावे. इंडोनेशियन, अरबी, मल्याळम इत्यादी आशियाई/भारतीय विकिपीडियांचीही वाटचाल दरडोई पसारा आटोपशीर असल्यामुळे दर्जेदार पद्धतीने होत असल्याचे चित्र आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१९, ७ ऑगस्ट २०११ (UTC)


अतिशय चांगला अभ्यास आहे. सक्रीय सदस्य वाढवणे आणि पुढे जाऊन ते टिकवणे यासाठी काय काय करता येईल याची चर्चा या निमित्ताने करूया...मंदार कुलकर्णी ०४:२०, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
संकल्प, अत्यंत माहितीपूर्ण आकडेवारी आहे. इंग्रजी विकिपीडियाची सक्रीय सदस्य संख्या प्रमाण आदर्श मानने तर, याचाच एक अर्थ महिन्याकाठी सक्रीय सदस्य संख्या लेखसंख्येच्या एक टक्के भरावयास हवी म्हणजे आपल्याकडे साधारणतः ३५० सक्रीय संपादकांची संख्या हवी. म्हणजे सक्रीय सदस्यांचे प्रमाण साधारणतः सध्याच्या दहापट तरी हवे माहितगार ०६:१४, ७ ऑगस्ट २०११ (UTC)


  • कार्य विरुद्ध कार्यकर्ते
पुढील चर्चेचा टप्पा साधण्याच्या दृष्टीने चर्चा येथेच नवीन विभागात स्थानांतरीत

समजले नाही

[संपादन]

एकदा लेख पूर्णपणे लिहून झाला की त्याचा बोजा कसा काय पडू शकतो? बोजा हा फक्त, जे लेख अजून लिहिले गेले नाहीत किंवा अपूर्ण आहेत त्यांचाच पडायला पाहिजे. त्यामुळे (एकूण लेखसंख्या):(सक्रिय सदस्य) असे गुणोत्तर काढणे अनाकलनीय आहे....J १०:१०, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

  • जे आपण म्हणता ते बरोबरच आहे.
हि केवळ दरडोई लेख संख्या म्हणावयास हवी परतू जीवित विश्वकोशात जुन्या लीखांचे संगोपन, उप डेट, संवर्धन आदी गोष्ठी भविष्यातही काही प्रमाणात कराव्या लागत असल्याने त्यांना गृहीत धरण्याचा संकल्पचा प्रयत्न कदाचित असावा. राहुल देशमुख १०:२३, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
एखादा लेख ज्ञानकोशात पूर्ण होऊ शकतो, हे विधान मला मौजेचे वाटते :D. खरे पाहता ज्ञान जसे अनंत, तसाच ज्ञानकोश प्रकल्प कायम अपूर्णच असतो. अगदी सुदृढ व आशयसंपन्न असलेल्या लेखांमध्येही काही नवी भर, दुरुस्त्या, पुनर्मांडणी, चित्रे/आकृत्या/नकाशे यांच्यामधील बदल, साच्यांमधील बदल किंवा दुरुस्त्या संभाव्य उत्पात/अविश्वकोशीय मजकूर/शुद्धलेखनाच्या चुका इत्यादी पैलूंवरील गस्त व पहारा या क्रिया अखंड चालू राहतात. थोडक्यात एखाद्या लेखाची निर्मिती झाली, की तेथपासून ज्ञानकोश प्रकल्पाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने तो लेख जबाबदारीचा (लायॅबिलिटीचा) हिस्सा होतो. आणि विकिपीडियाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सर्व सदस्यांवर व त्यातही सक्रिय असणार्‍या समुदायावर येऊन पडत असल्यामुळे वरील अभ्यासात एकूण लेखसंख्या व सक्रिय सदस्यसंख्या (म्हणजे दरमहा पाचाहून अधिक संपादने करणार्‍या सदस्यांची सरासरी संख्या) यांचे गुणोत्तर काढले आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१९, ७ ऑगस्ट २०११ (UTC)


संकल्प,
नेहमीप्रमाणे छान अभ्यास करुन आकडे मांडलेस. धन्यवाद.
ज्ञानकोशात लेख कधीच पूर्ण होत नाहीत हे अगदी बरोबर आहे, विशेषतः विकिपीडियासारख्या ऑनलाइन कोशासाठी. जुन्या कोशांमध्ये त्या त्या वर्षाची (किंवा दशकाची) आवृत्ती एकदा छापखान्यात गेली, की संपादक (कदाचित, थोडावेळ का होईना) हुश्श म्हणून त्यापासून हात धूत असतील (आणि मग पुढील आवृत्तीच्या तयारीस लागत असतील), पण आपल्यापुढे आव्हान आहे ते माहिती पुरवण्याचे आणि ती अपटुडेट[मराठी शब्द सुचवा] ठेवण्याचे. सचिन तेंडुलकरबद्दलचा लेख याचे नेमके उदाहरण आहे. अनेक महिने हा लेख चांगल्यापैकी सुदृढ आणि सुबक झालेला आहे पण त्याला मुखपृष्ठ सदर करण्यासाठी अजूनही मी कचरतो, कारण त्यातील माहिती (जवळजवळ) रोज बदलत राहते आणि वाचकांना जुनी/चुकीची माहिती मिळण्याचा संभव वाढतो.
असो, सदस्यसंख्या गेल्या वर्षभरात वाढत आहे आणि सक्रीय सदस्यांची संख्याही फेब्रुवारीतील १०० पासून आता १४०-१५०च्या दरम्यान झालेली आहे. आशा आहे अधिकाधिक सदस्य सक्रीय होतील आणि वरील आकडेवारी थोडीशी सुसह्य होईल.
अभय नातू ०१:०१, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
अभय निराश होऊन नये आशा ठेवावी ही चांगली गोष्ट आहे. मराठी विकिपीडियाचे मुल्यांकन आणि विश्लेषण अधिक सखोल होण्यास वाव आहे असे वाटते . १०० ते १४० म्हणजे वर्षाभरातली वाढ चाळीसने झाली पण एक तर आधीच्या शंभरातली मोठी बॅच गेल्यात जमा धरावी लागते त्यातील मोजकीच मंडळी परतून येतात बरे ४०ची वर्षाकाठी वाढ बाराने भागले तर महिना काठी ४ पण भरत नाही ,एक फळी गेल्यावर तेवढीच नवी फळी येते हा आशा दायक भाग असला तरी खरेच समाधानकारक म्हणता येईल का या बद्दल मी साशंक आहे.
मी केवळ २७ संपादक गुणीले ५ संपादने असा गुणाकार केला तर केवळ ५संपादनानी गुणाकार केला तर त्यांची अवघी बेरीज १२५ भरावी यातील बरीच संपादने चुकीची आणि तेवढाच भाग ती उलटवण्याकरता केलेला असतो, असमाधानककतेची बाब इथेच संपत नाही महिन्याकाठी मोजके सदस्य शंभरापूढची संपादन संख्या गाठतात काही संपादक कमी संपादनांअध्ये भरपूर लेखन करतात नाही असे नाही म्हणून काहीतरी रंग भरतो.पण मराठी विकिपीडियाचे आपण तुम्ही मी संकल्प हि दुसरी फळी २००५ मध्ये आल्या पासूनचा काळ मोजला तर तो चक्क सहा वर्षांचा भरतो तुम्ही मी संकल्प जे डॉन हि मंडळी कंटीन्यूअस आहोत पण आपलाही बराचसा वेळ/संपादने हा अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह स्वरूपाची राहीली आहेत कंटेंट मध्ये आपण भर घातली नाही असे नाही इतरांच्या मानाने ती तरीही उजवी ठरते , अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह भाग कमी महत्वाचा असे नाही पण यात कंटेंट मध्ये पडणारी भर तशी मर्यादीत ठरते हे स्वयंमूल्यांकनाच्या दृष्टीने स्विकारावयास हवे . आणि मग सहावर्षांच्या कष्टाच्या पार्श्वभूमीवर आपण जिथे अस्सावयास होतो तीथे आहोत का तर हाताशी काहीसे असमाधान येते असे वाटते माहितगार ०९:०७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
माहितगार,
१०० ते १४० हे पाच-साडेपाच महिन्यातील प्रगती आहे. याला कारणे आपली पहिली संपादनेथॉन, ब्लॉग वरील जाहिराती तसेच इतर अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रम आहे असे मी समजतो. पूर्वीपेक्षा ४० टक्के जास्त संपादक येथे महिन्याकाठी एकतरी संपादन करतात (सांगकामे धरुन) ही माझ्यामते प्रगतीच आहे. समाधानकारक? नक्कीच नाही. पुरेशी? नाहीच नाही. परंतु गेल्या काही महिन्यात आपण जे काही उपक्रम चालवलेले आहेत (उदा. संकल्पचे ऑनलाइन प्रयत्न, माहितगारांच्या फेसबूक नोंदी, इ), त्याने फरक पडतो आहे असे दिसते.
काही मंडळी का येथे टिकते व काही का टिकत नाहीत याचा अभ्यास पाहिजे यात दुमत नाही. दुर्दैवाने गायब झालेल्या कंपूला संपर्क करण्याचे साधन माझ्या माहितीत नाही. असे मिळाल्यास त्यांचे मत घेता येईल आणि येथील अवगुण दूर करता येतील.
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह वि. कंटेंट मधील संपादने यावरही आकडेवारी उपलब्ध आहे.मराठी विकिपीडियाबद्दल आकडेवारीतील योगदानाचे पृथक्करण याशिवाय लेखांमध्येही केलेल्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह (आंतरविकि दुवे, साचे, इ) बदलांनी कंटेंट थेट वाढत नसला तरी त्यामुळे तोच लेख त्यानंतर बघणार्‍या संपादकाचे काम सोपे होते त्यामुळे ते बदल वाया आहेत असे तर नाहीच उलटपक्षी हे बदल बरेचदा थेट कंटेंटपेक्षा जास्त उपयोगी ठरतात.
सहा वर्षांनी पाहिजे तेथे नाही आहोत हे काही अंशी बरोबर आहे. पण हा प्रकल्प दोन-चार लोकांचा नाही. इतर लोकांचा सहभाग अपेक्षित होता व तो (काही का असेना) कारणाने मिळाला नाही. तरी त्याबद्दल आपण आपल्याला दोष देण्यात हशील नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्वयंमूल्यांकन केले पाहिजे पण त्याचवेळी माझे असे मत आहे की सहा वर्षांत आज जे रूप मराठी विकिपीडियाला आहे हे आपल्यासारख्यांनांच आहे. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
अभय नातू १७:१८, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

मंदार आणि सध्या पुण्यात असलेल्या सदस्यांना विनंती

[संपादन]
मंदार सध्या पुण्यात शैक्षणिक संस्थातून विकि अम्बॅसॅडर असा जो उपक्रम राबवला जातो आहे त्यात मुख्यत्वे इंग्रजी विकिपीडियावर ट्रेनींग दिले जात असलेतरी त्यातील काही मराठी भाषिक विद्यार्थी किमान मराठी विकिपीडियावर किमान ओळख करून देऊन गेले असे आढळले नाही. असे का होत असावे या बद्दल काही अंदाज बांधणे शक्य आहे का  ? दुसरेतर त्यातील तांत्रीक बाजू असलेले मराठी भाषिक विद्यार्थी मराठी विकिपीडियावर आले नाहीतरी किमान त्यांना बॉट्स वगैर कसे वापरावेत याचे काही ट्रेनींग झाले तर आता नाहीतर भविष्यात तरी उपयोग होऊ शकेल किंवा कसे हे आगामी विकिभेटीत आपण चर्चा करून पहावे असे वाटते माहितगार ०५:४९, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

सध्याची आकडेवारी आणि काही संभाव्य उपक्रम आराखडे

[संपादन]

सध्याची आकडेवारी आणि नजीकच्या भविष्यकाळातील उद्दिष्टे यांत वास्तववादी सांगड घालून काही उपक्रम सुचवू इच्छितो :

  • गेले काही आठवडे मी अलीकडील बदल या पानावर किमान १०००+ बाइटांची वाढ झालेली संपादने किती झालीत याचा ढोबळ आढावा घेत आहे. माझ्या स्थूल निरीक्षणानुसार अशी १०००+ बाइटांची वाढ करणारी संपादने दिवसाकाठी ५ ते १० लेखांमध्ये होत आहे. या कालावधीत दिवसाकाठी पाचाहून अधिक संपादने करणारे (बॉट वगळता मानवी) सदस्य ढोबळमानाने ८-एक आहेत. थोडक्यात दिवसाकाठी दर सक्रिय सदस्यामागे एका लेखात हजार बाइटांची वाढ होताना आढळते. समजा या उपलब्ध सदस्यांनी रोज सरासरी २० मिनिटे अधिक देऊन अजून प्रत्येकी एकेक लेखात १०००+ बाइट वाढवण्याइतपत योगदान केले, तरीही सध्याच्या ८-१० सक्रिय सदस्यसंख्येने दिवसाकाठी अश्या २० लेखांमध्ये १०००+ बाइट वाढ होईल. म्हणजे महिन्याकाठी ५०० ते ६०० लेखांमध्ये वाढ. समजा महिनाभराच्या दीर्घ मुदतीवर हा आकडा उण्या बाजूकडे - म्हणजे ५००कडे - झुकतो, असे गॄहित धरले, तरीही वर्षभरात आपण सध्याच्या क्षमतेने कमाल ६००० लेखांमध्ये १०००+ बाइट भर घालू शकू. प्रत्यक्षात हा आकडा ६०००हून कमीच असेल, कारण एकाच लेखात अनेक वेळा १०००+ बाइटांची दरदिवशी वाढ होण्याचे प्रसंगही वरचेवर यायची शक्यता आहे. ही शक्यता ५०%-५०% गृहित धरली, तर ३००० लेखांमध्ये वर्षभरात १०००+ बाइटांहून भर टाकण्याचे भाकीत अधिक वास्तववादी ठरू शकेल.

या गतीने सध्याच्या ३४००० लेखांमध्ये १०००+ बाइट - म्हणजे सुमारे २-३ ओळींची - भर टाकायला १० वर्षे लागतील. मात्र हे झाले एकरेषीय (लीनियर) भाकीत. प्रत्यक्षात विकिपीडिया वगैरे प्रकल्पांची वाढ लेखांची-गुणवत्ता, सदस्यसंख्या, लेखसंख्या या तिन्ही चलांचे (व्हेरिएबलांचे) काहीसे लॉगॅरिदमिक फल (फंक्शन) असते, असे निरीक्षण आहे. त्यामुळे जर या तिन्ही चलांमध्ये (त्यातही सध्या रिकामटेकडी लेखसंख्या बरीच असल्यामुळे खरे तर पहिल्यााणि दुसर्‍या चलांमध्येच) ताळमेळ राखून वाढ घडत गेली, तर ३५००० बाळसेदार (म्हणजे किमान एखादा परिच्छेद असलेल्या) लेखांच्या ३-४ वर्षांमध्ये गाठता येईल.

  • यातील अर्धा भाग असलेला कळीचा मुद्दा सदस्यसंख्या वाढवायचा : सध्याच्या तुलनेनुसार मराठी विकिसमुदाय अन्य भारतीय भाषी विकिसमुदायांच्या मानाने बराच सुस्त आहे. मल्याळम, तमिळ उडिया इत्यादी विकिपीडियांनी ज्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या देशांत/राज्यांत विकिअकादम्या (कार्यशाळा) भरवल्या, बूथ चालवले, तसे महाराष्ट्रातील मराठी विकिसमुदायाने फारसे केल्याचे आढळत नाही (अपवाद पुण्यातील काही विकिभेटींचा.. मात्र त्या बहुतेक वेळा इंग्लिश विकिसदस्यांचे बाहुल्य असलेल्या असतात). तमिळ विकिपीडियाने तर तमिळनाडूबाहेर श्रीलंका आणि कॅनड्यातही एखाद-दोन दिवसांच्या अकादम्या/कार्यशाळा चालवल्या. महाराष्ट्रातील निवासी मराठी विकिसदस्यांनी पुण्यात, मुंबईत, नागपुरात व अन्य शहरांमध्ये असे एखाद्या दिवसाचे उपक्रम करता येतात का, ते चाचपण्याची निकड जाणवत आहे. खेरीज या कार्यशाळांची प्रसारमाध्यमांतून (=पेपरांतून व शक्य झाल्यास टीव्हीवरून) प्रसिद्धी घडवून नियोजित पद्धतीने लोकांपर्यंत व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. मराठी विकिपीडियावर जशी येत्या वर्षभरात ४०००० लेखसंख्या ओलांडायचे मनसुबे व्यक्त झाले होते, तसे किंबहुना त्याहून अधिक प्राधान्याने मराठी विकिपीडियावरील सक्रिय सदस्यसंख्या (दरमहा पाचाहून अधिक संपादने करणारी) येत्या वर्षभरात २७पासून वाढून ४०पर्यंत नेता येण्याचे वास्तववादी उद्दिष्ट ठेवले तर बरे होईल.

सदस्यसंख्या वाढवण्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नवागत सदस्यांना प्रचलित संकेतांची ओळख, त्यातले फायदे/मर्यादा यांबद्दल मार्गदर्शन करणे; आणि त्यातून मराठी विकिपीडियाची स्वतःची एक विकिसंस्कॄती घडवणे, हा होय. सध्या येथील ४-६ अनुभवी सदस्य नवागत सदस्यांना त्यांच्या परीने मार्गदर्श (मेंटॉरिंग) करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. या प्रक्रियेत आता-आता रुळलेल्या / हजारेक संपादने किंवा अर्ध्या-एका वर्षाहून अधिक काळ सक्रिय असलेल्या) मध्यमवयीन :-) (माफक विनोद :) ) सदस्यांनीही सहभागी होत तुलनेने नवख्या सदस्यांना मार्गदर्शन घेण्याची जबाबदारी उअचलत सामील व्हायला हवे. मार्गदर्शनाखेरीज अन्य सदस्यांना प्रोत्साहन (म्हणून बार्नस्टार, चहा, बियर, सरबत आणि बॉटांसाठी पेट्रोल :) ) देणे इत्यादी गोष्टी प्रचालक असलेल्या वा नसलेल्या सर्वच सदस्यांनी करणे उपयुक्त ठरेल. या सर्वांचा परिणाम नियमित येणारी आणि दीर्घ काळ बांधील राहणारी सक्रिय सदस्यसंख्या वाढण्यात होईल. ज्याचा परिणाम गुणवत्तावाढीतही दिसून येईल.

  • यातील अन्य अर्धा भाग असलेला कळीचा मुद्दा गुणवत्तावाढीचा : गुणवत्तावाढ होण्यासाठी योग्य संपादनपद्धती, वर्गीकरण/साच्यांचा उपयोग/प्रताधिकार/आशयाची मांडणी, आंतरराष्ट्रीय व्याप्तीचा दृष्टीकोन (म्हणजे केवळ भारतकेंद्रित लेखनाचा संकुचितपणा संपादनात न ठेवणे) या सर्वांबद्दल मराठी विकिसमुदायात जागरूकता घडवायलअ हवी. अर्थात ती एकदम आक्शातून टपकणार नाही. त्यासाठी मराठी विकिपीडियावर विकिप्रकल्पांची आणि उत्तम लेख (मुखपॄष्ठ सदर/उदयोन्मुख लेख) निवडीची प्रक्रिया घालून घ्यायला हवी. म्हणजे असे, की महत्त्वाच्या विषयांवर विकिप्रकल्प चालवून त्यात टॉप-टू-बॉटम पद्धतीने काही अतिप्राधान्याचे लेख फुलवून ते दर्जेदार/आदर्श लेख म्हणून घडवत न्यायला हवे. मग विकिप्रकल्पातल्या लोकांनी त्यांचे गुणांकन ठरावयला हवे (कौल/तत्सम पद्धतींनी). त्यातून त्या-त्या विकिप्रकल्पात चांगल्या लेखाच्या दर्जाचे निकष आणि पायंडे आपोआप सिद्ध होत जातील. व त्यातून अन्य लेखांना आकार देण्याचे कार्यप्रस्ताव हाती घेता येतील. अश्या विकिप्रकल्पांतून दर्जेदार सिद्ध झालेले/ निवडलेले लेख अवघ्या विकिपीडियाच्या मुखपॄष्ठावर मुखपॄष्ठ सदर किंवा उदयोन्मुख सदर म्हणून झळकण्यासाठी पुढच्या स्तरात प्रस्तावित होतील. त्यातून आपण आपली स्वतःची कार्यसंस्कॄती/संपादनसंस्कृती विकसवू शकू.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२४, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

वेगवान संपादने कशी करावीत याविषयी ही नवीन सदस्यांना मदत देणे आवश्यक आहे असे माझे मत आहे. शिवाय प्रोत्साहन हे महत्त्वाचे आहेच. कार्यशाळा आयोजित करण्यासाठी काय केले पाहिजे याची टप्पेदार व तपशिलवारतपशिलवारयेथे आली पहिजे मग तसे करता येईल. वेगवान संपादने करण्यासाठी मी खाली प्रस्ताव मांडला आहे पण त्यात अभय नातूं व्यतिरिक्त कुणीच रस दाखवला नाहीये. (याचा अर्थ कुणाला रस नाही असा मी घेत नाही ;) ) तरीही हा सांगकाम्या लवकरात लवकर तयार करून चालवण्याचे मनावर घ्यावे ही विनंती! निनाद २३:२३, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

गावकुसाबाहेरच्या माणसांचा उत्पात

[संपादन]
इंग्रजांनी पारधी आणि इतर जंगलातल्या आदीवासी जमातींना आधी कायदेकरून जंगला बाहेर काढल.हाती जमीन नाही गावातल्या गावकर्‍यांनी गावाच्या गायरानात इतरांनी रहावयास नको म्ह्णून तीथून हाकलल उपजिवीकेकरता त्यांनी गुन्हेगारीचा रस्ता धरला तर इंग्रजांनी त्यांना कायदेकरून जन्मजात गुन्हेगार ठरवल. कुणीतरी मराठी विकिपीडियावर येत त्याला देवनागरीटाईप कशी करायची माहीत माही म्हणून रोमन लिपीतन Pardhi samaj म्हणून लेखाची सुरवात करण्याचा प्रयत्न करत आणि त्यात रोमन लिपीत असेल पण मराठी भाषेत "ha samaj st categiri madhe hoto ya samajachi etihas aajun konala mahit nahi ya" अशा फुटकळ वाक्याने लेखाची सुरवात करू पहातो.मेटावरून घारीच लक्ष ठेऊन असलेल्या परकीय संपादकांना रोमन लिपीत लिहिलेल्या मराठीचा अर्थ ना समजत काही आणि शिवाय रोमन लिपी न वापरणार्‍या विकिपीडियात रोम लिपी कशी काय म्हणून तो येणार तत्परतेने Delete चा साचा लावणार आम्हीही तेवढ्याच तत्परतेने देवनागरी टाईप न करता आलेल्या संपादनाला "उत्पाताच" बिरूद लावून वगळणार आणि विकिच्या गावकुसाबाहेर हाकलणार.काय म्हणताय मंडळी काय करावयास पाहीजे ? माहितगार १३:१३, ९ ऑगस्ट २०११ (UTC)


इंग्लिशमध्ये शीर्षक असलेली पानांचे भाषांतर करुन त्यांचे देवनागरी शीर्षकाकडे स्थानांतरण करावे. स्थानांतरण करताना पुनर्निर्देशन मागे ठेवू नये म्हणजे इंग्लिश शीर्षक आपोआप बाद होते.
केवळ इंग्लिशमध्ये शीर्षक म्हणून मजकूर न पडताळता पान वगळू नये.
मराठी विकिपीडियावर बिगर-देवनागरी शीर्षकाची पाने आणि पुनर्निर्देशने अगदी अपवाद म्हणूनच असावीत.
साच्यांना हा नियम लागू करू नये. ते इंग्लिश शीर्षकाचे असले तरी चालतील (या मागील कारणे सविस्तर उद्धृत करीत बसत नाही.)
अभय नातू १४:४०, ९ ऑगस्ट २०११ (UTC)
अभय लिहित आहे, त्या मुद्द्यांना अनुमोदन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, ९ ऑगस्ट २०११ (UTC)
  • मीही अनुमोदन दिले तर चालेल काय? होय असेल तर कृपया माझेही अनुमोदन स्वीकारावे.

मकरंद (चर्चा • योगदान) ०६:५३, १० ऑगस्ट २०११ (UTC) इंग्रजी शीर्षकांनी तयार होणारे नवे लेख आपोआप एकत्र झालेले कुठे पहायला मिळू शकतील का. मी ठेवीन म्हणतो लक्ष, आणि करीन त्यांचं लिप्यंतर.गावकुसाबाहेर कुणीच नको रहायला -मनोज १९:५३, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

सगळ्या पानांच्या यादीतील पहिले दोन विभाग येथे इंग्लिश शीर्षकांची पाने आहेत. यातील बरीचशी पुनर्निर्देशने आहेत जी काढून टाकायला हवी. याला अपवाद म्हणजे जी नावे इंग्लिश शॉर्टफॉर्म म्हणून प्रचलित असलेली नावे असे, उदा. ASCII, OCR, इ. यांची पुनर्निर्देशने लिप्यंतरि शीर्षकाच्या लेखांकडे पाहिजे.
अभय नातू २३:११, ९ ऑगस्ट २०११ (UTC)
अभय यांना माझे पूर्ण अनुमोदन. मला यामध्ये काही सुचवायचे आहे. Oracle ERP मध्ये आम्ही एक संज्ञा वापरतो. "Segment १" बदलणे. यात आम्ही शीर्षक किंवा मुख्य संज्ञेचे नाव बदलतो. थोडक्यात परत बारसे करतो म्हणूया. हा बदलण्याचा अधिकार फक्त Admin ला दिलेला असतो. त्या प्रकारे ही सारी इंग्रजी शीर्षके (बिगर-देवनागरी) आपल्याला देवनागरी मध्ये बदलता येतील का? याचे काही फायदे असे:
१. नवीन असंख्य लेखांची संख्या वाढायची वाचेल
२. या साऱ्या लेखांचे स्थानातरण करायचे वाचेल
३. हे शक्य असल्यास जवळ जवळ ८००-९०० इंग्लिश (बिगर-देवनागरी) वर्ग आहे असे (rename करून) वापरता येतील.मंदार कुलकर्णी १६:५३, १० ऑगस्ट २०११ (UTC)

संस्कृत विकिपीडियाचे फळफळते नशिब

[संपादन]
संस्कृत विकिपीडियाकडे सदस्य संख्या तुटपूंजी असलीतरी ट्रांसिलट्रेशन टूलसारख्या महत्वपूर्ण तांत्रीक बाबतीत संस्कृत विकिपीडियाचे नशिब फळफळते आहे असे दिसते किमान अगदी हिमालया पासूनते कन्याकुमारी पर्यंत सर्व भाषिक सर्व प्रांतीयच नव्हेतर सर्व धर्मियांचे सहकार्य प्राप्त होत आहे असे आढळून येते. किमान अर्धा डझन प्रचालकांचा या विषयात प्रत्यक्ष रस आणि भारतभरातून सपोर्ट पांचो उंगलीया घी मे !!(बाकी हे संस्कृतात कसे लिहितात ?) संस्कृत विकिपीडियास मनःपूर्वक शुभेच्छा !! माहितगार १३:४९, १० ऑगस्ट २०११ (UTC)

वेगवान संपादने

[संपादन]

संकल्पने लेखांचा बोजा सदस्यांवर कसा पडतो आहे हे दाखवून दिले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला आता काही स्वयंचलित सांगकाम्यांचा वापर करून घेतला पाहिजे. म्हणून मराठीविकीवर वेगवान संपादने पार पाडण्यासाठी निरनिराळे बॉट्स (सांगकामे) वापरले जायला हवेत. जसे की एखाद्या नावाचे पान बनले की त्या 'शब्दाला' सर्व मराठी विकि पानांवर दुवा बनवू शकेल असा सांगकाम्या बनवला पाहिजे. म्हणजे समजा तबला हा लेख बनला तर त्या सांगकाम्याने विकीवरच्या सर्व पानांवर तबला शब्दाचा दुवा बनवावा. (काही वेळा असा शब्द खुपदा आलेला असू शकतो त्यासाठी त्या पानावरील पहिल्या ३ शब्दांचा दुवा बनवावा असे फिल्टर घालता येईल.) तबल्याच्या असा शब्द असेल तर अर्थातच दुवा बनणार नाही हे मी समजू शकतो. हा सांगकाम्या रोज आपोआप चालावा अशी योजनाही करून ठेवता येईल त्यामुळे प्रचालक/संपादकांवरही ताण असणार नाही. यामुळे एकंदर मराठीविकीचे आंतरविकिकरण मोठ्या प्रमाणात होईल व दर्जा वाढण्यास 'एकप्रकारे' मदत होईल.

  • असे सांगकामे बनवणे जमू शकेल का?
  • सांगकामे बनवणे जमू शकत असल्यास हा सांगकाम्या बनवण्याचे काम कुणी अंगावर घ्यायला तयार आहे का?
  • अजून कोणती कामे सांगकाम्या मार्फत करून घेतली पहिजेत असे तुम्हाला वाटते? निनाद ००:४४, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
निनाद,
मराठी विकिपीडियावर अनेक बाहेरचे सांगकामे कार्यरत आहेत. हे बव्हंशी आंतरविकि दुवे काढण्या/घालण्या/बदलण्याचे काम करीत असतात. इतर काही चित्रे काढण्या/घालण्या/बदलण्याचे काम करतात. याशिवाय एक-दोन स्टुअर्डही उत्पातविरोधक सांगकामे चालवतात.
संकल्प आणि मी (आणि मला वाटते डॉनसुद्धा) दोन-तीन सांगकामे सांभाळून आहोत. माझे सांगकामे विशिष्ट कामे करीत असतात. क्रिकाम्या क्रिकेटबद्दलचे बदल, रिकाम्या दुव्यांच्या भाषांतराचे तर हरकाम्या शुद्धलेखन, व्याकरण, इ. संबंधित बदल करीत असतो. संकल्पचा सांगकाम्या व्याकरण/शुद्धलेखनविषयक अधिक क्लिष्ट कामे करतो असा माझा अंदाज आहे.
सांगकामे बनवता येतील. यासाठी नेमके काम ठरवले पाहिजे. सांगकाम्याची व्याप्ती आणि अधिकार दोन्ही बारकाईने ठरविले पाहिजेत.
नियम ठरवल्यास माझ्या (किंवा संकल्पच्या) सांगकाम्याकडून ही कामे करवून घेता येतील. प्रसंगी नवीन सांगकाम्याही तयार करता येईल.
मी हे काम करण्यास तयार आहे.
मला येथे एक चेतावणी देणे भाग आहे असे वाटते. सांगकामे चालवून बदल करणे हे जरा धोक्याचे काम आहे कारण प्रत्येक बदलावर चालवणार्‍याचे लक्ष असेलच असे नाही. एखादा चुकीचा बदल शेकडो पानांवर पटकन होऊ शकतो व त्यामुळे माहिती आणि रचना दोन्हीवर नको ते परिणाम होतात. तरी असे सांगकामे आपल्या जुन्या सदस्यांकडून (प्रचालक असणे अजिबात आवश्यक नाही) करुन घेणे हे हितावह ठरेल. यासाठी मराठी विकिपीडियावरच अनुभव असणेही आवश्यक नाही. जर एखादा सदस्य इंग्लिश किंवा इतर भाषेतील विकिमिडीया प्रकल्पावर सांगकामे चालवीत असला तरीही चालेल. यात नवीन-जुन्यांत भेदभाव करीत असलो तरी केवळ पुढील गुंतागुत होऊ नये याच साठी. कोणीही गैरसमज करुन घेऊ नये.
अभय नातू ०१:१२, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
मी खाली प्रतिसाद दिला आहे. आपल्याला वाट्णारे अजून काही माला न दिसलेले धोके आणि फायदे याविषयी काही मत? आपली अनुमोदन असेल का अशा बॉट साठी? हा प्रकल्प पुढे जावा म्हणून काय केले पाहिजे?निनाद ००:२३, १३ ऑगस्ट २०११ (UTC)
सांगकामे चालवून बदल करणे हे जरा धोक्याचे काम आहे याच्या पूर्णतः सहमत आहे. हे काम अनुभवी सदस्यांनीच करावे हे ही पूर्णपणे मान्य असायला कुणाची हरकत नसावीच.

हा सांगकाम्या चालवतांना

  • हा सांगकाम्या किमान ३० दिवस जुन्या असलेल्या लेखांसाठीच चालवला जावा - इतक्या काळात बहुतेकांचेच अलीकडील बदलवर लक्ष असते व त्यानुसार आवश्यकता असल्यास लेख वगळण्याचे काम होऊ शकते.
  • अथवा यासाठी लेखकाने विनंती केलेली असावी
  • वगळण्याचे लेख सांगकाम्याने आपोआप वगळलेले असावेत
  • सांगकाम्या चालवण्याची व चालवल्याची वर्दी चावडीवर दिली जावी (शक्य असल्यास आपोआप!)
  • हा सांगकाम्या चालवण्यासाठी अनुभवी सदस्याने जबाबदारी घ्यावी.
  • किंवा तूलनेने नवीन पण कार्यक्षम सदस्याला योग्य ते प्रशिक्षण दिले जावे.
  • आवशयकता असल्यास प्रचालकांनाही हा सांगकाम्या चालवण्याचे अथवा थांबवण्याचे अधिकार असावेत.

याकामी मी राहूल देशमुख (सदस्य:Rahuldeshmukh101) या सदस्याला सुचवीत आहे. सर्वांनी आपली मते कळवावीत. ही सूचना राहूलने केलेली नाही. परंतु त्याच्या कामाचा झपाटा व पद्धती पाहता, तो हे कामही कुशलतेने व विचारपूर्वक रितीने करेल असे वाटते. अजून इतर कुणी सदस्यांना यात रस असल्यास त्यांनाही सहभागी करून घेतले जावे. किंवा त्यांनी जबाबदारी घ्यावी. ही फक्त सुचवणी आहे मागणी नाही, गैरसमज नसावेत! काम कुणीही केले तरी चालेल पण हा सांगकाम्या लवकरात लवकर आपल्या विकीवर यावा ही इच्छा!! निनाद ०१:५५, ८ ऑगस्ट २०११ (UTC)


मलाही यात खारीचा वाट उचलायला नक्कीच आवडेल....मंदार कुलकर्णी १७:०१, १० ऑगस्ट २०११ (UTC)
पाठीम्बा दिणे आणि कार्यभार उचलण्याची तयारी दाखवणे साठी धन्यवाद मंदारराव!
अनुमोदन पुण्यात मराठी विकिपीड्यन्सकरता बॉट स्पेशल ट्रेनिंग कँपपण घेण्यात कुणी पुढाकार घ्यावा माहितगार ०६:१२, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

सांगकाम्ये, तांत्रिक मर्यादा आणि अन्य पर्यायांसाठी विचार

[संपादन]
निनाद, तुम्ही नोंदवलेल्या काही मुद्द्यांवर सांगकाम्ये चालवून काम करता येईल; तर काही गोष्टी अधिक परिष्कृत तांत्रिक संरचनेशिवाय करणे तूर्तास शक्य होणार नाहीसे दिसते. अभय नातू, मी यांनी चालवलेले सांगकाम्ये आणि आपल्याकडील अन्य काही सांगकाम्ये ऑटोविकिब्राउझर (इंग्लिश विकिपीडियावरील माहिती) नावाचे टूल वापरून सांगकाम्ये चालवतात. या सॉफ्टवेअरात काही मूलभूत उपकरणे दिली आहेत; ज्यातून तुम्हांला कार्यभाग साधता येऊ शकतो. काही जटिल कामांसाठी मात्र काही प्रोग्रॅमर विकिसदस्य पर्ल, सी शार्प किंवा तत्सम प्रोग्रॅमिंग भाषेत किंवा स्क्रिप्टिंग भाषेत विवक्षित कामासाठी कोड लिहितात आणि चाचण्यांनंतर तो बॉट सेवादाखल करतात.
बॉटांची ही स्थूळ माहिती झाली. आता उपरिनिर्दिष्ट मुद्द्यांचा विचार केल्यास खालील गोष्टी ऑटोविकिब्राउझर-आधारित सांगकाम्याने करता येतील :
  • लेखांमध्ये मार्गक्रमण साचे घालणे किंवा बदलणे.
  • पानांचे वर्गीकरण करणे किंवा बदलणे.
  • पानांमध्ये लेखांचे दुवे घालणे (मात्र त्यात अमुक वेळाच शब्द आल्यास दुवा घालता येईल, असा काही फिल्टर माझ्या माहितीनुसार घालणे सध्या शक्य नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व शब्दांना विकिदुवा बसेल, आणि ते जरा अती होईल.).
  • काही ढोबळ चुकांच्या दुरुस्त्या (फाइंड-अँड-रिप्लेस स्वरूपाच्या) अनेक पानांमध्ये करायच्या असतील, तर तसे काम.

सांगकाम्याला प्रचालकत्वाचे अधिकार असतील (जे नीट विचारान्ती द्यावेत), तर तो खालील कामेही करू शकतो :

  • पाने वगळणे
  • पाने स्थानांतरित करणे.

तुम्ही नोंदवलेल्या मुद्द्यांपैकी खालील कामे ऑटोविकिब्राउझर-आधारित सांगकाम्ये करू शकत नाहीत :

  • चालू झाल्याची व चालवल्याची वर्दी चावडीवर देणे.
  • मजकुरात विकिदुवे टाकताना आढळसंख्येनुसार आपोआप काही आढळ गाळले जाणे (फिल्टर क्रिया).

बाकी, वगळण्याजोगी पाने वगळण्याचा अनेक महिन्यांचा बॅकलॉग भरून काढायला इंग्लिश विकिपीडियाप्रमाणे "पानकाढा" साचा लावतेवेळच्या दिनांकानुसा‍र किंवा किमान महिन्यानुसार वगळण्याजोग्या पानांचे वर्गीकरण साच्यातूनच साधले, तर काम सोपे होईल. मग असे दिनांकानुसार किंवा महिन्यानुसार वर्गीकरण झालेली पाने सांगकाम्या लावून वगळता येऊ शकतील.

तूर्तास काही कामे करायची असल्यास सध्याच्या सक्रिय सांगकाम्यांच्या चर्चापानावर संदेश लिहू शकता किंवा चावडीवर कार्यप्रस्ताव लिहू शकता किंवा विकिपीडिया:सांगकाम्या चालवण्याची विनंती (संदर्भाखातर समांतर इंग्लिश विकिपान येथे पाहा.) असे एखादे पान काढून तेथे करायच्या एकेका कामाचे तपशील कळवू शकता.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:४९, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

कार्य विरुद्ध कार्यकर्ते आणि आपापसातील संवाद

[संपादन]
मला असे वाटते कि कार्यकर्ते हे महत्व पूर्ण आहेत आणि कार्य हे :त्या नंतर आहे. जर कार्यकर्तेच नसतील तर कार्य कसे होणार ? आणि कार्यकर्ते असतील तर कार्य हे घडेलच (दर्जा, नियम आदी गोष्टी तदनंतर येतात तेही एक कार्याचाच भाग आहे ) अर्थात कार्यकर्ता हाच सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच विपीचा प्राण आहे. आपल्या कडे नेमके उलटे असण्याची शक्यता पडताळून पहावयास हवी ?
तेव्हा संघटन जास्तीत जास्त बळकट करण्याची आज गरज आहे. असलेल्या कार्यकर्त्यांना जास्तीत ज्यास्त प्रोत्साहन देणे, सहयोग करणे, विश्वासात घेणे, समजणे आणि समजून देणे , विवादाचे मुद्दे टाळून तडजोडीच्या मुद्यांवर काम सुरु ठेवणे आदी द्वारे ते शक्य आहे असे वाटते. राहुल देशमुख १०:००, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
राहुल, माझा जो काही थोडाफार अनुभव आहे त्यात मला हेच आढळले की नव्या कार्यकर्त्यांबद्दल प्रोत्साहन देणे, सहयोग करणे, विश्वासात घेणे, समजणे आणि समजून देणे, विवादाचे मुद्दे टाळून तडजोडीच्या मुद्यांवर काम सुरु ठेवणे अशा भावनेचीच येथे खरी गरज आहे, फक्त नव्या सदस्यांच्या पानावर फक्त स्वागतसाचे लावून हे होणार नाही. मनोज २१:१७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
सर्वांना विनंती की समजावून देणे मध्ये सौम्य भाषा वापरावी, किमान नवीन कार्यकर्त्यांना समजावताना! उदा. (स्थानांतरांची नोंद); "डॉ.बानू कोयाजी" हे पान "बानू कोयाजी" मथळ्याखाली स्थानांतरित केले. (नावात पदव्या बिदव्या घालू नयेत.) या चुका काही मुद्दामहून केल्या जातात असे नाही, त्यामुळे पान खाऊन अंगावर येण्याच्य पद्धतीने रागावून प्रतिक्रिया देणे टाळावे. सचिन १५:५६, ११ ऑगस्ट २०११ (UTC)


मित्रांनो, मी तुमच्या भावनांशी सहमत आहे. अर्थात या मुद्द्यास जे काही पदर(अंग) आहेत. परस्परातील संवाद साधताना संवादशैलीबद्दलच्या येणार्‍या अडचणींबद्दल चर्चा व्य्क्तीगत पातळीवर न नेता चर्चा करून घेऊया जी भविश्यात अधिकाधीक कार्यकर्त्यांना सामावून घेऊ शकेल.
मी विकिपुणेरी या फेसबुक ग्रूपात मराठी विकिपीडियावर कमी संपादने करणार्‍यां व्यक्तींना आलेल्या अडचणी अशी चर्चा लावली. एक महत्वाचा (सोदाहरण) प्रतिसाद होता कि सहाय्य पाने, साचे आणि विकिपीडिया सजगता शिवाय मिडिया विकि संदेश इत्यादींची भाषा बोजड कंटाळवाणी आणि कृत्रिम असते अशी टिका आली आहे. हा मुद्दा इथे मांडण्याच कारण अस कि माझ्यावर कुणी व्यक्तीशः आरोप केला नाही (तसा त्यांचा उद्देशही नाही)एक तर सहाय्य पानांशी संबधीत बरचस लेखन माझ आहे आणि झालेल्या दोष निदर्शनाशी मी सहमत सुद्धा आहे.
तसच मी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शक्य तेवढ्या सौम्य आणि औपचारीक भाषेचा वापर करतो.हे करतानाही खर म्हणजे सदस्यांच्या चर्चा पानावर संदेश देताना बर्‍याचदा मी द्वीधा मनस्थितीत असतो.तू लिहू,तुम्ही का आपण, सरधोपटपणे हे असे का ? किंवा करा असे लिहू का सादर नम्र विनंती असे लिहू? सोबत मराठी विकिपीडियावर राहून-राहून व्यवहारात आलेल्या इंग्रजी एवजी मराठी शब्दांचा वापरही करत जातो आहे यात माझ्या भाषेत बरीच कृत्रिमता आणि नकळत बोजडपणा येतो आहे.
सरधोपट स्पष्ट नैसर्गिक संवादाचे मार्ग जे स्विकारतात त्यांना इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने दोन्ही बाजूने होणार्‍या मनस्तापास सामोरे जावे लागते. किंवा माझ्या सारखा मार्ग चोखाळला तर संवाद कंटाळवाणा कृत्रिम आणि बोजड अस्प्ष्ट होऊ शकतो.
नविन सदस्य जेव्हा पहिल्यांदा संवाद साधत असतात तेव्हा त्यांच्या चूका किंवा विषयास व्यक्तिगत बनवण्याच्या प्रवृत्तीकडे नैसर्गिक भूल म्हणून दुर्लक्ष करून पोटात घेण्याची गरज आहे हे खरे.पण त्याच वेळी विषय व्यक्तिगत केला जाणे एकदा स्विकारले कि विवाद अधिकही चिघळणे शक्य असते तेव्हा व्यक्तिगतता कशी टाळायची म्हणजेकाय आणि कशी टाळायची हे नविन सदस्यांना कस आणि केव्हा सांगावे ? एक तर आपापसातील संवादशैली नेमकी कशी असावी नैसर्गिक सरधोपट का आपण-विनंत्या इत्यादी कृत्रिमता थोडी असलेली बरी ?
माहितगार ०६:४५, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

इंग्रजी शीर्षके

[संपादन]

Oracle ERP मध्ये आम्ही एक संज्ञा वापरतो. "Segment १" बदलणे. यात आम्ही शीर्षक किंवा मुख्य संज्ञेचे नाव बदलतो. थोडक्यात परत बारसे करतो म्हणूया. हा बदलण्याचा अधिकार फक्त Admin ला दिलेला असतो. त्या प्रकारे ही सारी इंग्रजी शीर्षके (बिगर-देवनागरी) आपल्याला देवनागरी मध्ये बदलता येतील का? याचे काही फायदे असे:

   १. नवीन असंख्य लेखांची संख्या वाढायची वाचेल
   २. या साऱ्या लेखांचे स्थानातरण करायचे वाचेल
   ३. हे शक्य असल्यास जवळ जवळ ८००-९०० इंग्लिश (बिगर-देवनागरी) वर्ग आहे असे (rename करून) वापरता येतील.

मला गेल्या ४-५ दिवसात काहीच कुणाचे उत्तर आले नाही म्हणून परत चावडी वर टाकत आहे. तरी गैरसमज नसावा.मंदार कुलकर्णी ०३:५६, १५ ऑगस्ट २०११ (UTC)

एक मुख्य प्रश्न : ही सुविधा विकिपीडियावर (जो प्रकल्प मीडियाविकी कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरावर) उपलब्ध आहे का ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:२५, १५ ऑगस्ट २०११ (UTC)

इंग्लिश शीर्षकांची पाने व पुनर्निर्देशने

[संपादन]
अभ्यासांती आढळून आले की मराठी विकिपीडियावर -
इंग्लिशमध्ये शीर्षक असलेला एकही लेख नाही (अपवाद - A, B, C, ...)
इंग्लिशमध्ये शीर्षक असलेली इतर सगळी पाने योग्य त्या मराठी शीर्षकाच्या लेखाकडे पुनर्निर्देशित केलेली आहेत.
अभय नातू ०३:०४, १६ ऑगस्ट २०११ (UTC)


Dear Abhay ans Sankalp,
Your study is right but here is my observation.
Can I help in this by any mean? मंदार कुलकर्णी १४:१७, १६ ऑगस्ट २०११ (UTC)
१. रोमनलिपीतील वर्गनावे मराठीत लिप्यंतरित किंवा भाषांतरित केली गेली पाहिजेत.
२. ही सगळी ४११ पाने पुनर्निर्देशने आहेत. वर लिहिल्याप्रमाणे लेख एकही नाही (अपवाद वगळता)
३. न वापरलेले रोमन नावांचे साचे बरेचदा प्रयोग म्हणून तयार केले गेलेले आहेत असे वाटते किंवा इतर, क्लिष्ट साच्यांना सपोर्ट म्हणून आयात केले गेले असण्याची शक्यता आहे. यातील कार्यभाग इतर साच्यांतून उरकत असला तर हे साचे ठेवू नयेत. यातील ज्या साच्यांना येथे समांतर साचे नाहीत ते काढून टाकण्याऐवजी त्यांची नावे बदलून देवनागरी शीर्षके द्यावी व ते साचे कोठे वापरता येतील हे बघावे.
४. लेखनभेद किंवा शुद्धलेखनाच्या चुका असलेली पुनर्निर्देशने बरेचदा मुद्दामहून तयार केली जातात. असे केल्याने -
  • अशुद्ध नावाने घेतलेले शोध नेमक्या लेखापर्यंत पोचतात.
  • अशुद्ध नावाने नवीन लेख तयार होत नाहीत.
    • यासाठी लिखित नियम आहेत कि नाहीत हे आठवत नाही पण कॉमन सेन्सने अशी पुनर्निर्देशने करावी, उदा. विकिपीडिया, विकिपिडीया, विकीपीडीया ही पुनर्निर्देशने करणे ठीक, पण विकीडिपीया, विक्पिडीया, इ.ची गरज नाही....अर्थात, हे एक उदाहरण.
एकंदरीत पाहता वरील काही मुद्द्यांवर काम केल्याने अदृष्य फायदे जरुर होतील (मुख्यत्वे अडगळ कमी होणे), पण आपल्याकडील संपादकसंख्या पाहता आपली एनर्जी (अधिक कचरा न करता) लेखन/संपादन करण्यात खर्च करावी असे माझे प्रांजळ मत आहे. जसजसे दिसेल तसतसे वरील कामही करावे पण ते करण्यासाठी highly productive संपादकांचा वेळ घालवू नये असे मला वाटते. मराठी विकिपीडिया पूर्णपणे स्वच्छ होईल/राहील ही आशा ठेवणे फोल आहे. त्याचप्रमाणे येथे अगदी उकिरडा होऊ द्यावा असेही नाही. सुवर्णमध्य साधून काम करीत राहणे हा सुज्ञपणा.
हे माझे मत. इतरांचेही मत आजमावून पहावे.
अभय नातू १५:५६, १६ ऑगस्ट २०११ (UTC)

चंद्रभागा नदी

[संपादन]

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी चा या लेखात उल्लेख भीमा नदी ची उपनदी असा उल्लेख आहे तर इतरत्र आंतरजालावर भीमा नदी चाच उल्लेख पंढरपूर परिसरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते असा आहे. नेमके कोणते बरोबर आहे .ती स्वतंत्र उपनदी नसेल तर चंद्रभागा नदी आणि भीमा नदी लेखांचे एकत्रीकरण का करू नये.

दुसरेतर आंतरजालावर शोध घेतला असता भारतभरात किमान तीन मह्त्वपूर्ण नद्यांचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो आणि संख्या कदाचित जास्तच असण्याची शक्यता आहे , माहिती बर्‍याचवेळा कन्फ्यूजींग आहे. वैदीक आणि पौराणिक ग्रंथातील नोंदींमधली चंद्रभागा म्हणजे हिमाचल प्रदेशातील हे सहज लक्षात पण आपल्या मराठी लोकांनी त्यातील काही उल्लेख प्रेमानी पंढरपूरातील चंद्रभागेशी जोडल्याचेही दिसते.माहितगार ०९:१०, १६ ऑगस्ट २०११ (UTC)

चंद्रभागा नदी = भीमा नदी. चंद्रभागा नदी आणि भीमा नदी लेखांचे एकत्रीकरण करायला हवे. मंदार कुलकर्णी १४:२५, १६ ऑगस्ट २०११ (UTC)

अण्णा हजारे

[संपादन]

सध्या भारतभर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि जनक्षोभास कारणीभूत असलेल्या अण्णा हजारे या मराठी व्यक्तीबद्दल येथील लेख दयनीय स्थितीत आहे. कृपया त्यात रोज चार वाक्यांची का होईना, भाषांतर करून का होईना भर घालावी ही विनंती.

यात हजारेंच्या विचारांचा पुरस्कार करण्याचा इशारा नाही (तो व्यक्तिगत प्रश्न आहे), पण सध्या प्रसिद्धी पावत असलेल्या आणि भारतीय समाजावर, राजकारणावर दूरगामी बदल घडवू पाहणार्‍या या मराठी व्यक्तीबद्दल येथे माहिती असावी हा दृष्टिकोन आहे.

अभय नातू ०२:१६, १८ ऑगस्ट २०११ (UTC)

नवीन नामविश्व "बोली " करता प्रस्ताव

[संपादन]

आपल्या मुख्य लेख नामविश्वात आपण प्रमाण मराठीचा वापरकरतो त्या शिवाय माझ्या सारख्या बर्‍याच मंडळींचा मराठी पारिभाषिक शब्दांच्या उपयोगाचा आग्रह असतो. शुद्ध मराठीशी संपर्क कमी असलेला खूप मोठा वर्ग आहे. त्यात मराठी कच्चे असलेली मडळी , मराठी लिपी न लिहिता येणारी मंडळी आणि अर्धा डझन बोली भाषा या सर्वांकरता मिळून मराठी विकिपीडियावरच एक वेगळे नामविश्व उपलब्ध करून द्यावे म्हणजे कुणाला रोमन लिपीतून लेख लिहायचा आहे किंवा सोपी मराठी नावाचा काही प्रकार बनवायचा आहे, वर्‍हाडी मालवणी अशा बोली भाषेत लेख लिहावयाचा असेल तर त्यांची सोय होईल.

नामविश्वाकरता नाव "बोली" सोबत इंग्रजीत कुणी Dialect टाईप केले अथवा Dl टाईप केले तरी बोली नामविश्वा कडे जाण्याची सोय व्हावी. सर्व मराठी विकिपीडियन मंडळींच्या मतांचे स्वागत आहे. माहितगार २३:३१, २३ ऑगस्ट २०११ (UTC)

  • आज मराठी विकिपीडिया वर काम करणाऱ्या सक्रीय सदस्याची संख्या हि मर्यादित आहे. तेव्हा बोली भाषेत काम करणारे किती लोक आहेत हे पहिले जाणून घ्यावे असे वाटते. जर फारसा लेखक वर्ग उपलब्ध नसेल तर हे व्हेरिय्नट टाळलेलेच बरे कारण त्यासाठी वेगळे बोलीभाषा जाणकार, मोड्रेटर वैगरे मंडळी (ओव्हरहेड) लागतील. तसेच काही सध्याचीच सक्रीय मंडळी बोलीभाषे कडे वळती होतील. ह्या कारणांनी थोडे डायव्हरसीफीकेशन होण्याचा संभाव वाटतो. जरी वेगळे नामविश्व दिले तरी वर्ग, दालने, चर्चा पाने वैगरे ठिकाणे एकाच राहणार आणि त्याठिकाणी बोलीभाषेतील वापर वाढला तर संपूर्ण विपीच गढूळ होईल . तरी बोली भाषेतील लिखाणास साहाय्य करण्या साठी सुरुवातीला त्या लेख नामाचा वर्ग अथवा प्रकल्प करावा, त्यानंतर दालन ह्या मार्गाने प्रोत्साहन द्यावे आणि बरेच लेख लिहल्या जाऊ लागले तर मग नामविश्व बनवावे असे वाटते. राहुल देशमुख ०४:४२, २४ ऑगस्ट २०११ (UTC)
माहितगार यांच्या वरील मताशी पूर्ण सहमत. बोली हे नवीन नामविश्व सुरु करण्याची गरज आहे. राहुल, मराठी (किंवा कोणतीही भाषा) इतर अ-प्रमाण बोली किंवा परभाषांच्या संपर्काने समृद्धच होते, गढूळ होत नाही. कारण भाषा ही प्रवाही असते. प्रवाहातले पाणी गढूळ नसते, काही कारणाने गढूळ झालेच, तरी फार काळ गढूळ राहात नाही. साचलेले, डबक्यातले पाणी मात्र सहजपणे गढूळ होते आणि बराच काळ गढूळच राहाते. आपल्याला सर्वांना मराठी साचलेल्या डबक्यासारखी ठेवायची आहे का खळाळणारी, प्रवाही नदीसारखी ? प्रमाण मराठी ही बोलीभाषांतूनच विकसित होत गेली आहे. त्यामुळे प्रमाण मराठी अधिक मजबूत बनवायची असेल तर बोलींचे बोट धरणे, हा एक व्यवहार्य पर्यायही आहे. म्हणून येथे मराठी बोलींसाठी नामविश्व हवे. आणि (हलकेच घ्या, पण) सदस्यांच्या डायव्हर्सिफिकेशनचा तुम्ही मांडलेला मुद्दा इंग्रजी विकीकरांनी विचारात घेऊन अमलात आणला असता, तर मराठी आणि इतर कित्येक भाषांतले विकिपीडिया जन्माला तरी आले असते काय?:) -मनोज २१:१२, २४ ऑगस्ट २०११ (UTC)


राहुल,प्रस्तावाचा उद्देश आहेत त्या मडंळींना डायव्हर्सीफाय करण्याचा मुळीच नाही, एकतर सध्याच्या मडळींपैकी कुणी वळतील याची शक्यता मला फारच कमी वाटते, अभय नातूंना चित्पावनी येत असेल असे मला वाटत नाही.डो सचिन साठे द्रवीड आणि जे अशी काम करणारी बहूसंख्य मंडळी चक्क प्रमाण मराठीची मंडळी आहेत.शालेय शीक्षणामूळे मोठावर्ग प्रमाण मराठीतच लिहीतो. त्यामुळे प्रमाण भाषेतील विकिला समुदाय जमवणे सोपे आहे (अर्थात तेही हवे त्या वेगाने होत नसल्यामुळे तुम्ही साशंक असणे स्वाभावीक आहे) जी मंडळी लिहितच नाहीत किंवा अत्यंत कमी लिहितात त्यांना लिहिण्याच्या कक्षेत आणणे असा उद्देश आहे. मला वाटते MS Kadu,ashwin baindur अशी बरीच मंडळी मराठी प्रमाण मराठीशी जूळत नाही म्हणून कक्षे बाहेर रहातात, वर्षाकाठी किमान सहा लाख मराठी मुळे इंग्रजी शाळेतून दहावी पूर्ण करून बाहेर पडत आहेत त्यांची मराठी शब्दांची व्होकॅबलरी मराठी शाळेतील मुलांएवढी असू शकत नाही.केवळ प्रमाण भाषा आणि देवनागरी लिपीचा उपयोगाचा अती आग्रह म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर आमचीच मुले उपाशी असा तर होणार नाही याची साधार भिती वाटते.माहितगार २२:१६, २४ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार. मी मधल्या काळात या विषयावर बरीच चर्चा केली आहे. अश्विन, सुधन्वा आणि अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांना सध्याची मराठी विपी वरील भाषा अतिशय बोजड वाटते. माझ्या मते "बोली" मराठी प्रमाणेच "सोपी" मराठी जर लिहिता आली तर खूप जणांची सोय होईल. मराठी वृत्तपत्रातील बातम्या आणि त्यामधील अग्रलेख यातील भाषेच्या (बो)जडपणाचा जो सर्वसाधारण फरक करता येईल असा फरक तरी करणे आवश्यक आहे. खूप जड लिहून ते जर फारसे कोणाला कळले नाही तर काय उपयोग? कदाचित मराठीतील Active संपादक खूप प्रमाणात न वाढण्याचे हे एक कारण असू शकते. विपी ने या कारणासाठीच इंग्रजी बरोबर "सोपी इंग्रजी" विपी काढली आहेच की.http://simple.wikipedia.org/wiki/Main_Page या संदर्भात सुयोग्य चर्चा करून आपले सिनियर निर्णय घेतील अशी मी अशा करतो ....मंदार कुलकर्णी १७:४९, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

मंदारने महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला आहे. मराठी विकिपीडियावरील भाषा सोपी, सुगम असावी यात वाद नाही.

मला वाटते येथे विषद करावे की माहितगारांनी मांडलेला बोली भाषेचा मुद्दा व मंदारचे म्हणणे एकच नाही (दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत). माहितगारांना प्रादेशिक बोलीभाषांसाठीचे वेगळे नामविश्व अपेक्षित आहे, तर मंदारचा रोख मुख्य नामविश्वातील लेखांतील भाषेबद्दल आहे.

अभय नातू २०:१३, २५ ऑगस्ट २०११ (UTC)


  • मलातरी असे वाटते कि आपण प्रमाण मराठीच वापरावी बोली साठी प्रकल्प असावा सरसकट डायल्युषण करू नये. कारण शुद्ध मराठी वाचण्या साठी बराच मराठी वर्ग येथे येतो.
(उदा. संदर्भ I am again sorry.i have to take help of english to express myself in a better way.can u suggest certain articles which will help me in coming out of the situation. i really want to work here.the language here appears to be very pure and i am yet to get femilear with it.pl. help. Makyaj १४:०४, ३ ऑगस्ट २०११ (UTC) ).
उत्तम मराठीतून वाचन/लेखन करण्या साठी बरीच वाचक मंडळी मराठी विपी ला भेट देतात. कारण जे आंतर जालावर येतात त्यांना इंग्रजी येतेच आणि इंग्रजी विकिपीडिया येथे जास्त माहिती उपलब्ध आहे. (माहिती हे आपले प्रमुख आकर्षण नाही) मग मराठी विपीचे मुख्य आकर्षण हि शुद्ध मराठी हेच असावे असे वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले.
केवळ संपादकांना आकर्षित करण्यासाठी आपण सोपी मराठी वैगरे करतो आहे का ? आपणास काही लेख मिळवणे हा उद्देश असावा कि शुद्धतेचे प्रमाण म्हणून विपी असावा ? ह्यावर विचार व्हावा. आग्रह नाही पण एकदा फ्लड गेट उघडले कि मग कुठे थांबायचे हे कठीण होणार. राहुल देशमुख ०६:३१, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

अन्य प्रकल्प उभारावेत

[संपादन]

>> उत्तम मराठीतून वाचन/लेखन करण्या साठी बरीच वाचक मंडळी मराठी विपी ला भेट देतात. कारण जे आंतर जालावर येतात त्यांना इंग्रजी येतेच आणि इंग्रजी विकिपीडिया येथे जास्त माहिती उपलब्ध आहे. (माहिती हे आपले प्रमुख आकर्षण नाही) मग मराठी विपीचे मुख्य आकर्षण हि शुद्ध मराठी हेच असावे असे वाटते. << राहुल देशमुखांच्या या मुद्द्यास अनुमोदन. बाकी, बोली मराठीसाठी इन्क्युबेटर प्रकल्पात एक प्रारूप विकी बनवणे पहिली पायरी ठरू शकेल. शिवाय बोली विकी म्हणजे नेमके काय, याबद्दल काही ढोबळ संकेत घालून त्यानुसार तेथे काम करता येईल. सध्या जिला आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा देणार्‍या महाराष्ट्र, गोवा, भारत या राजकीय भूप्रदेशांमध्ये मराठी म्हणून प्रमाण मानले जाते, त्या भाषेच्या ढंगाचाच (आणि तिच्या लेखन, व्याकरणादी अंगांचा) स्वीकार होणे योग्य ठरते.

कोकणी, अहिराणी, वर्‍हाडी इत्यादी प्रादेशिक किंवा शहरी बोल्यांसाठी किंवा इंग्लिशमिश्रित बोलीसाठी इन्क्युबेटर प्रकल्पाचा प्रस्ताव जरूर सादर करावा. पण त्यातही प्रमाणीकरणाची, त्या-त्या बोलीच्या ढंगाची/लेखनाची व्याख्या करणे व त्यानुसार प्रकल्पाचे सुचालन सांभाळण्याची आवश्यकता भासणार आहेच. त्यासाठीही इच्छुक मंडळींना काम आरंभावे लागेल.

भाषेच्या बोजडपणाबद्दल ओरड करणार्‍या बर्‍याच समाजघटकांची ओरड ही फारच व्यक्तिसापेक्ष आणि परिणामी ढिसाळ आणि दर्जाहीन असते, असे (किमान माझेतरी बर्‍याच वर्षांपासून समाजशास्त्रीय) निरीक्षण आहे. ज्यांना खरोखरीच मराठी विकिपीडियासाठी काही करावेसे वाटेल, ते लोक उलट-सुलट कल्पना किंवा मतभेद असले, तरीही आपल्या सकारात्मक क्रयशक्तीसह येथे येतील आणि मराठी विकिपीडिया सर्वांगांनी वाढ्ण्यासाठी शक्य असेल ती-ती मदत करतील. ज्यांना तेवढी तळमळ वाटणार नाही, त्यांना त्यासाठी एक ना दोन शेकडो निमित्ते सापडतील. प्रत्येक व्यक्तीला मराठी विकिपीडियावर काम करण्याची कितपत खाज वाटते, त्यावर ही व्यक्तिसापेक्ष मतमतांतरे अवलंबून! (अर्थात त्याबद्दल काही तक्रार नाही; कारण खाज असणे/नसणे आणि अमुक इतके टक्के असणे हा सर्व वैयक्तिक पसंतीचा मामला आहे.) त्यामुळे त्याचा बाऊ करून शहारून जाण्यात शहाणपणा नाही.

आणि शेवटचा मुद्दा : या कल्पनांवर जमेल आणि स्फुरेल तसे सकारात्मक प्रयत्न करत राहावेत. दरम्यान मराठी विकिपीडियावरील कामही जोमाने चालू राखावे. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३२, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

मागासलेपणाचे लक्षण

[संपादन]

बोलीभाषा ही फक्त बोलण्यासाठी असते, लिहिण्यासाठी कधीच नसते. बोलीभाषा दर बारा कोसावर बदलते. विकीवर लिहिणार तर कोणत्या बोलीभाषेत? विकी हा ज्ञानकोश आहे. जगातल्या कुठल्या भाषेतले ज्ञानकोश बोली भाषेत असतील? त्यामुळे बोलीभाषेत लिखाण करणे म्हणजे पाच हजार वर्षे मागे जाण्यासारखे आहे. जेव्हा कागद नव्हता, लेखण्या नव्हत्या, लिप्या नव्हत्या तेव्हा शब्दकोश, ज्ञानकोश आणि इतर सर्वच वाङ्मय बोलीभाषेतच होते. त्या काळात परत जायची हौस असेल तर खुशाल बोलीभाषा वापरावी, पण ती सर्व मराठी लोकांना समजली नाही तर आश्चर्य वाटू नये. आज गोंडी, अहिराणी, दखनी किंवा चित्पावनी मराठीत बोललेले किती लोकांना समजते, तर लिखाण काय समजणार?

गंमत अशी आहे की, हे बोलीभाषेचे फॅड फक्त मराठीभाषकांत आहे, कारण त्यांनी मराठीसकट कुठलीच भाषा नीट शिकलेली नसते. हिंदीच्या मराठीहून कितीतरी अधिक बोलीभाषा आहेत. पण गरीबातला गरीब आणि अडाण्यातला अडाणी हिंदीभाषक आपाआपसात बोलीभाषेत बोलत असला तरी परक्याशी बोलताना प्रमाणभाषेतच बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण हिंदीभाषिक प्रदेशात बोलीभाषांचे फॅड नाही. गुजराथमध्ये भरपूर बोलीभाषा आहेत. त्यातली काठेवाडी आणि कच्छी या दोन भाषेत लिहिलेली एक ओळही कधी वाचण्यात येणार नाही. मुंबईतले मांडवी भाषेतले लोक जेव्हा कच्छी बोलतात, तेव्हा गुजराथी लोकांना ते बोलणे समजत नाही. पुण्यातले मारवाडी मेवाडी किंवा मारवाडी भाषेत बोलतात. त्यांच्या भाषेत पुस्तके नाहीत. हिंदी मातृभाषा असणार्‍या लोकांना त्या भाषांतले बोलणे कळत नाही.

जगातल्या कुठल्याही बोलीभाषेत पुस्तके निघतात असे दाखवून द्यावे, आणि मगच बोलीभाषेचा पुरस्कार करावा....J १७:५६, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

जे यांच्या निरीक्षणांना दुजोरा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५९, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रतिवाद

[संपादन]

वरती एक वाक्य वाचले, ते असे :"प्रमाण मराठी ही बोलीभाषांतूनच विकसित होत गेली आहे. त्यामुळे प्रमाण मराठी अधिक मजबूत बनवायची असेल तर बोलींचे बोट धरणे, हा एक व्यवहार्य पर्यायही आहे." जगातली प्रत्येक भाषा ही जन्माला येते तेव्हा बोलीभाषाच असते. दर बारा कोसावर एक अशा अनेक बोलीभाषा उदयाला आल्या असणार. जेव्हा वाहतुकीची साधने वाढली आणि लोक प्रवास करू लागले तेव्हा बोलीभाषांमधील अंतर कमी होऊ लागले. मग चार विद्वान एकत्र आले. त्यांना बोलीभाषांमधून विकसित होत चाललेली एक समान भाषा दृग्गोचर झाली. तिच्यात लेखन सुरू झाले, तिचे व्याकरण बनले आणि शब्द कसे उच्चारावे आणि कसे लिहावेत हे हळूहळू निश्चित होऊ लागले. प्रमाणभाषा ही अशी जन्माला येते. सध्या जी हिंदी भाषा सर्व भारतात समजली-बोलली-लिहिली जाते ही तर तर केवळ दोन माणसांनी बनवलेली भाषा आहे[ संदर्भ हवा ], हे ज्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास केला आहे त्यांना नक्की माहीत असते. ही कृत्रिम भाषा आज भारतात सर्वात लोकप्रिय भाषा आहे. प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे जाणे म्हणजे विकसित भाषेकडून अविकसित भाषेकडे जाणे आहे[ संदर्भ हवा ]. बोलीभाषेत शब्दसाठा अतिशय कमी असतो, कारण त्यांना ती बोलणार्‍यांना व्यवहारात जास्त शब्दांची गरजच नसते. प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे जाणे म्हणजे आपली भाषा शब्ददरिद्री करणे होय...J १८:३८, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

सगळ्यांसाठी गरमागरम चहा. गरम चहा पिउन थोडेसे डोके (जर गरम झाले असले तर) थंड करा आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू करा.

कमी पडला तर ही घ्या किटली...चांगली जपानी किटली आहे.

अभय नातू २०:०७, २६ ऑगस्ट २०११ (UTC)


काय अभयराव अ‍ॅडव्हान्समध्येच चहाचे कप आणून ठेवलेत :) मी आदरणीय जे आणि संकल्पच्या विचारांशी मुळीच सहमत नाहीए पण तुम्ही आणलेला आधी चहा घेतो बाकी विकिपीडिया चहाते काय म्हणत्तहेत ते पाहून मग एक दोन दिवसात माझ पुढच मत मांडतो. बाकी मंडळी तुमच्या मतांच्या प्रतीक्श्ःएत आहे लगे रहो ! माहितगार २१:१३, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

चावडी ध्येय आणि धोरणे वर स्थानांतरीत करावे का ?

[संपादन]
  • माहितीगार,
हि चर्चा तुमच्या प्रस्तावाकडून आता विपी वरील लेखन शैली अशी गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने तिला चावडी ध्येय आणि धोरणे वर स्थानांतरीत करावे का ?
राहुल देशमुख ०५:५१, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

उलटसुलट मुद्दे

[संपादन]

नमस्कार,

वर बरीच गरमागरम चर्चा चाललेली आहे. त्यात अनेक मुद्दे मांडले गेले आहेत. त्यांची छाननी करुन बोलीभाषा हे नामविश्व असावे कि नाही (आणि पर्यायाने त्यातील लिखाण ग्राह्य मानावे कि नाही) याचे समर्थन करणारे आणि विरुद्ध अशा मुद्द्यांचा तक्ता खाली दिला आहे. आशा आहे याने चर्चेला थोडासा सुरळीतपणा आणि वस्तुनिष्ठता (ऑब्जेक्टिव्हिटी) येईल. एकाच ओळीतील मुद्दे एकमेकांस संबंधित नाहीत. एखादा मुद्दा मांडणार्‍याचे नाव मुद्दामहूनच दिलेले नाही. जसजसे अधिकाधिक नवीन मुद्दे पुढे येतील तसतसा हा तक्त्यात ते दाखल केले जातील. मंदार, तुझा सोप्या मराठीबद्दलचा मुद्दा महत्वाचा आहे पण या चर्चेत थेट बसत नाही म्हणून मुद्दाम गाळलेला आहे.

मूळ प्रस्ताव --

मराठी विकिपीडियावर चर्चा, सदस्य, सदस्य चर्चा, मीडियाविकी, साचा, वर्ग, इ. प्रमाणे बोलीभाषा असे वेगळे नामविश्व असावे.

बोलीभाषेसाठी वेगळे नामविश्व बोलीभाषेत लिहू नये
रोमन लिपीतून लिहिता येईल असलेल्या संपादकांचे विभागीकरण होईल आणि येथील विकास मंदावेल
बोली भाषांतून (वर्‍हाडी, चित्पावनी, खानदेशी, मालवणी, इ.) लिहिता येईल चर्चा, दालन, वर्ग, इ. नामविश्वे एकच असल्याने एकमेकांत मिसळून बोलीभाषा आणि मूळ मराठी विकिपीडियावरील मुख्य नामविश्व दोन्ही गढूळ होतील
ज्यांना मराठी नीट लिहिता/बोलता येत नाही असे लेखक सुद्धा येथे योगदान करतील विकिपीडिया ज्ञानकोश आहे, यावर प्रमाण (एकच) भाषेतून लिखाण व्हावे
बोलीभाषांच्या संपर्काने (प्रमाण) मराठी भाषा समृद्ध होईल वाचक प्रमाण मराठीतून लिहिलेले वाचण्यास येथे येतात, इंग्लिश भाषा/रोमन लिपी येणार्‍यांसाठी इतर विकिपीडिया उपलब्ध आहेतच
अनिर्बंध नामविश्वे तयार होण्याची शक्यता आहे तसेच अशुद्ध भाषा पसरण्याची दाट शक्यता आहे (संदर्भ - फ्लडगेट)
बोलीभाषा बोलण्यासाठी असते, लिहिण्यासाठी नाही. बोलीभाषांतून पुस्तके प्रसिद्ध झालेली नाहीत
बोलीभाषेत लिहिलेले विशिष्ट लोकांनाच समजेल

गरजच काय ?

[संपादन]

बाकी, मला या सर्व प्रस्तावित गोष्टींचे प्रयोजनच समजले नाही (इंग्लिशमिश्रित शहरी मराठी बोलीत : बाय द वे, मला याअ प्रपोझ्ड पॉइंट्सचं प्रयोजनच झेपलं नाही!). मराठी विकिपीडियावर व्याकरणाच्या किंवा लेखनशैलीच्या दर्जात सुधारणा करण्याजोग्या लेखांमध्ये येथील काही संपादक न कुरकुरता दुरुस्त्या करत असतात, काही वेळा अन्य संपादकांना योग्य त्या संदर्भांचे दाखले किंवा ऑनलाइन दुवे देऊन (नकळतपणे) लेखनदर्जाविषयी मार्गदर्शन करतात. प्रामाणिकप्रणे सांगायचे, तर माझ्यासारखे काही (हेकेखोर ? :) ) संपादक वेळप्रसंगी चिडचिडून एखादी दुरुस्ती जतन करताना कुठेतरी एखादी टिप्पणी नोंदवत असले, तरीही करत असलेल्या कामाच्या तुलनेने अश्या प्रसंगांचे प्रमाणही किरकोळ असते. लेखनशैलीत किंवा व्याकरणात चुका केल्याने कुणाला काढून टाकले जात नाही. अगदी परभाषांमधील मजकूर कॉपी-पेस्ट मारलेले लेखही वर्षानुवर्षे आसर्‍याला राहू दिले जातात. विज्ञान-तंत्रज्ञानविषयक लेखांमध्ये पहिल्या ओळीत लेखाच्या प्रधानविषयाचे इंग्लिश भाषेतील पारिभाषिक नावही नोंदवले जाते (जेणेकरून इंग्लिश किंवा अर्ध-इंग्लिश माध्यमातून विज्ञान-तंत्रज्ञान शिकलेल्यांनाही पहिल्या ओळीत विषय ओळखीचा असल्याचे स्मरेल). भाषिक पैलूंविषयीचे मराठी विकिपीडियाचे एवढे औदार्यदेखील कमीच वाटते काय ? मराठी विकिपीडियावर प्रमाण मराठीनुसार लेखन हे ध्येय मानले गेले आहे; ते मूलभूत ध्येय उखडून टाकायची गरज खरोखरच आहे काय ?

बाकी, मी मागच्या प्रतिसादात नोंदवलेल्या समाजशास्त्रीय टिप्पणीबद्दल थोडे अजून : प्रमाण मराठीला बोजड-बोजड म्हणून हिणवायची फॅशन इंग्लिश-शिक्षित/अर्ध-इंग्लिश-शिक्षित मराठ्यांमध्ये (= मराठी भाषकांमध्ये) अधिक असल्याचे आढळून येते. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांनी धंदेवाईक कारणांनी शालेय विद्यापीठीय शिक्षण इंग्लिश माध्यमातून घेतलेले असते. त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील इंग्लिश भाषेतले विद्वत्तापूर्ण (पक्षी अकॅडेमिक) ग्रंथ सदर मंडळींनी विद्यार्थिजीवनात व नंतरही अभ्यासले असतात. त्यातल्या इंग्लिश परिभाषेला - जी त्यांनाही सुरुवाती-सुरुवातीला परकी व बोजडच होती - तिला त्यांनी परिश्रमपूर्वक आपलेसे केले असते व मग कालौघात ती त्यांना बोजड वाटेनाशी होते. मग एखादे दिवशी ते मराठीचे भले करण्याच्या ओढीने म्हणा किंवा सुरसुरीने मराठी विकिपीडियाकडे वळतात. तेव हा दैववशात त्यांचे लक्ष कलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस) या किंवा तत्सम लेखांकडे जाते. तेव्हा केवळ त्यातले पारिभाषिक शब्द यांनी आधी अभ्यासले नसल्याने ही मंडळी मराठी विकिपीडियावरील मराठी बोजड असल्याचे ग्रह करून घेतात. यात दोन महत्त्वाच्या बाबी हे लोक दुर्लक्षितात :

  1. परिभाषा किंवा भाषा बोजड नसते; आपण आपल्या मेंदूचे जाड्य (म्हणजे आळशीपणा) दूर सारून मराठीतली परिभाषा अभ्यासली व जमेल तसा मराठी शुद्धलेखन-व्याकरण इत्यादी भाषिक अंगांचाही अभ्यास चालू ठेवला, तर सर्व गोष्टी सोप्या असतात. भाषा/परिभाषा बोजड नसते; जड-बोजड काही असेल, तर ती केवळ आपली या विषयीची वृत्ती/दृष्टिकोन.
  2. मराठी माध्यमात शिकलेल्या मंडळींना (त्यातही पोटभेद आहेतच - इ.स. १९९०च्या दशकाआधी व त्यानंतर वगैरे) हे पारिभाषिक शब्द अभ्यासक्रमात येऊन गेलेले असतात. मराठी माध्यमात शिकलेल्या मंडळींचीही संख्या प्रचंड आहे. या मंडळींनाही आपल्याप्रमाणेच कॅल्क्युलस वगैरे इंग्लिश पारिभाषिक संज्ञाच ठाऊक असतील असा ग्रह करून घेऊ नये. मराठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंडळ, पाठ्यपुस्तके आणि विविध विषयांत आजवर मराठीत लिहिले गेलेले कोश / विद्वत्तापूर्ण ग्रंथ यांनी मराठीमध्ये विविध ज्ञानशाखांची परिभाषा स्वीकारली आहे, दशकानुदशके घडवली आहे. मुख्य म्हणजे ती वापरात आहे.

या बाबी लक्षात घेता आणि वर मी नोंदवलेले मराठी विकीचे सध्याचे उदार धोरण बघता, मरअठी विकीच्या भाषिक मूलाधाराला धक्का लावण्याचे प्रयोजनच काय ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४५, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रमाण/बोलीभाषा वि. सुगम/बोजड भाषा

[संपादन]

संकल्प,

मला वाटते तुझे वरील लिखाण हे बोलीभाषा नामविश्वाच्या प्रस्तावाशी निगडीत नसून भाषेच्या सुगमपणाबद्दल आहे, जो मुद्दा मंदारने परवा उपस्थित केला होता. असे असेल तर ते वेगळ्या विभागात हलवावे का?

अभय नातू

विपी लेखन शैली बाबत एकत्रित चर्चा व्हावी

[संपादन]

चर्चा विपीवर लेखन शैली बाबत होत आहे. त्यात प्रमाण मराठी असावी/नसावी हा चर्चेचा हेतू पकडला तर मला असे वाटते कि मंदारच्या मुद्यांना वेगळे काढू नये. प्रमाण मराठी शिवाय इतर सारे मुद्धे जसे बोली, सोपी मराठी, रोमन मिषरीत मराठी, वैगरे वैगरे जे जे प्रमाण मराठी नाही ते ते सारे येथेच चर्चून एकत्रित निर्देश बनवणे ज्यास्त समर्पक वाटते. ह्याविषयावर याआधी काही चर्चा झाल्या असतील/होत असतील तर त्याचे दुवे संदर्भ म्हणून संबधितांनी उपलब्ध करून दिल्यास अतिउत्तम. वारंवार ह्याच आशयाच्या चर्चा करून त्यात वेळ घालवण्या पेक्षा एकत्रित चर्चा जास्त संयुक्तिक पर्याय आहे असे वाटते. राहुल देशमुख ०५:१४, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

माझ्या मते वरील दोन्ही मुद्दे जवळचे असले तरी वेगवेगळे आहेत. दोन्हीवर एकत्रित चर्चा केली असता चर्चा फोकस्ड राहणार नाही असे वाटते. चर्चा सुरू झाली ती माहितगारांच्या नामविश्वाच्या प्रसतावावरुन. मंदारचा मुद्दा फक्त तात्पुरता गाळला आहे. त्यावर वेगळी चर्चा (लवकरच) व्हावी ही अपेक्षा, पण चालू असलेली चर्चा विस्कळीत होऊ नये म्हणून वेगवेगळी करणे बरे. तेचतेच पुन्हा उगाळण्याची भीती असेल तर पुढच्या मुद्द्याला हात घालताना पहिली चर्चा येथे असेलच.
अभय नातू ०५:२१, २७ ऑगस्ट २०११ (UTC)
मला अभयचे म्हणणे पटते आहे. मी एक आठवडा थांबायला तयार आहे.... :) पहिला मुद्दा मार्गी लागल्यावर माझा मुद्दा घेऊ......मंदार कुलकर्णी १७:५८, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रमाण आणि बोली

[संपादन]

माफ करा, मला वाटते चर्चेत माझ्याबाजूनेही काही गोष्टी स्पष्ट करायला हव्या होत्या

१) बोली असा उल्लेख इथे डायलेक्ट या अर्थाने केला आहे. बोली म्हणजे केवळ बोलली जाणारीच भाषा असे इथे अभिप्रेत नाही. अहिराणी, मालवणी किंवा वैदर्भी या सारख्यांत लेखनही मोठ्या प्रमाणात झाले आहे,

२) मूळ मराठी विकीपीडियाची प्रमाण मराठी लेखनशैली बदलावी असा बोली नामविश्वाच्या प्रस्तावाचा अर्थ नाही. मराठी विकीपीडिया हा प्रमाण मराठीतच लिहीण्याचे आटोकाट प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचबरोबर

३) उपलब्ध ज्ञान वाटण्याची आणि मिळवण्याची सर्वांना मुक्त मुभा याअर्थाचा, विकीपिडीयाचा एक प्रमुख उद्देश होता, आहे आणि राहीलही. प्रमाण मराठीपासून दूर, पण ज्ञान-दरिद्री नक्कीच नाहीत, अशांची संख्या मोठी आहे. त्यांचे ज्ञान येथे येण्यासाठी त्यांना येत असलेल्या भाषेत, लिपीत (रोमन लिपीसह), लिहीण्याच्या जास्तीत जास्त सुविधा येथे असाव्यात. त्याचबरोबर विपीचे काही नियमही पाळले जायलाच हवेत (परभाषेत शीर्षके नकोत इ.). हे दोन्ही साधण्यासाठी बोलींचे नामविश्व यासारखे पर्यांय निश्चितपणे वापरायलाच पाहिजेत, असे मला वाटते. - मनोज २०:१६, १ सप्टेंबर २०११ (UTC)

ता. क. चर्चा ही मराठी विकिपीडियाबद्दल सुरु आहे मराठी भाषेबद्दल नव्हे. नामविश्व मराठी विकिपीडियावर असणार आहे, प्रमाण मराठी भाषेत नव्हे. यातल्या फरकाकडे काही आक्षेप घेणारांचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. मराठी विकीपीडियाशी सुसंगत मुद्देच मांडलेत तर काही उपयोगाचे ठरेल -मनोज २१:३८, १ सप्टेंबर २०११ (UTC)

अनुवादाकरीता वॉलूंटीअर्स हवेत

[संपादन]

इतर विकिंप्रमाणे मराठी विकिपीडियास सुद्धा गेल्या आठवड्या पासून en:Wikipedia:Edit filter नावाचे नवे एक्सटेशन उपलब्ध झाले आहे, त्याचा सुयोग्य उपयोग होण्याच्या ड्र्ष्टीने संबंधीत इंग्रजी विकिपीडियावरील en:Wikipedia:Edit filter या आणि त्याच्या तेथील उपपानांचे मराठी विकिपीडियावर भाषांतर करून हवे आहे.माहितगार १६:३२, ३१ ऑगस्ट २०११ (UTC)

शंका

[संपादन]

>>अहिराणी, मालवणी किंवा वैदर्भी या सारख्यांत लेखनही मोठ्या प्रमाणात झाले आहे.--मनोज<< या बोलीभाषांत किती विषयांवर ग्रंथ लिहिले गेले आहेत, किती गैरललित लेखन झाले आहे, हे समजले तर बरे होईल. विकि वाचणार्‍यांना प्रमाण मराठी समजत नाही आणि केवळ याच बोली कळतात असे किती लोक आहेत, याचे सर्वेक्षण करावे....J १७:००, २ सप्टेंबर २०११ (UTC)

१) महाराष्ट्रातल्या अशा डायलेक्टसमधले लेखन गेल्या पंचवीस वर्षांत लहानमोठ्या गावांतून प्रसिद्ध होत असलेल्या अनेक दिवाळी अंकांमधून मोठ्या प्रमाणात सापडेल. यावर्षीही दिसेल. ग्रंथालयांचा फार धांडोळाही घेण्याची गरज नाही. २) या बोलींत किती विषयांवर ग्रंथ...किती गैरललित ग्रंथ निघाले, असे कितीही उपप्रश्न यावर विचारले जाऊ शकतात. त्यापैकी अनेकांची उत्तरेही मिळू शकतात, पण ती दिल्याने इथल्या अन्य विकीकरांना प्रस्तावावर मत बनवण्यात उपयोग होईल असे वाटत नाही. त्यामुळे चर्चा त्या दिशेने नेणे टाळतो. ३) या महाराष्ट्री बोली वापरणारांना प्रमाण मराठी कळते, वाचता येते. पण नामविश्वाचा प्रस्ताव हा विपीवर लिहीण्यासंदर्भात आहे, त्याचा संदर्भ वाचण्याशी फारसा नाही हे कृपया लक्षात घ्यावे. -मनोज २०:०८, २ सप्टेंबर २०११ (UTC)


अजून काही शंका

[संपादन]

जर बोली भाषांचे नामविश्व निर्माण झाले तर मला प्रमाण मराठीतून बोली मराठीत जसे वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी मध्ये अनुवादाचे लेख लिहिता येतील का ? म्हणजे आज असलेले ३४ हजार लेख (२० हजार लेख + १४ हजार विस्तार साचे ) पुन्हा बोली भाषा मध्ये निर्माण करता येईल का ?

थोडक्यात आपण एका विकिपीडियात अनेक प्यारेलल विकिपीडिया तर निर्माण करणार नहीतन ? राहुल देशमुख ०७:०५, ३ सप्टेंबर २०११ (UTC)

चला ताज्या दमाच्या संपादक फळीतील मनोज आणि राहूल हेल्दी चर्चा करत आहेत हे पाहून आनंद वाटला.नवीन पिढीस मोकळॅ पणाने आपले निर्णय करणे सवयीचे व्हावे म्हणून मी व्यक्तीशः या विषयावर शक्यतो मौन बाळगण्याचा प्रयत्न करेन. निकाल काही लागू द्यात अथवा बदलू द्यात पण नवीन फळी आणि नवीन पिढी पुढाकर घेत पुढे जाते आहे त्यांना शुभेच्छा. माहितगार १४:२६, ३ सप्टेंबर २०११ (UTC)
>>>नवीन पिढीस मोकळॅ पणाने आपले निर्णय करणे सवयीचे व्हावे म्हणून मी व्यक्तीशः या विषयावर शक्यतो मौन बाळगण्याचा प्रयत्न करेन. -माहितगार
मौन हा काही योग्य पर्याय नाही. आपणा कडून शंकांच्या समाधानाची अपेक्षा होती. मी फक्त माझे विचार मांडले. जे आणि संकल्प हि तसेच काही म्हणतात. विकिपीडियाला नवे विचार आणि अनुभव ह्या दोघांचीही गरज आहे.
>>> निकाल काही लागू द्यात अथवा बदलू द्यात
निर्णय हे विचारानेच आणि योग्य तेच घ्यावे असे वाटते. त्यात नवे/जुने हा भेद पण टाळला तर उत्तमच.
राहुल देशमुख १७:०८, ४ सप्टेंबर २०११ (UTC)

चर्चा नको

[संपादन]

विकि लेखनशैलीबद्दल नुसती वायफळ चर्चा नको. अवघड/क्लिष्ट किंवा अवाजवी प्रमाण भाषेत असलेले वाक्य सांगावे आणि ते सोपे करून दाखवावे. सुधारित वाक्य आवडले तर लगेच मूळ वाक्याच्या जागी ते टाकून दुरुस्ती करावी...J १७:११, २ सप्टेंबर २०११ (UTC)

नवीन साचा:वचन (Template:Quote साठी)

[संपादन]

बरंच शोधलं पण "ब्लॉकक्वोट" साठी मराठी विपीवर पर्याय सापडला नाही. शेवटी इंग्रजी विपीवरून Template:Quote उचलले आणि समांतर मराठी साचा:वचन तयार केलाय. आशा करतो की इतरांनाही उपयोग होईल. Kaajawa ०८:१२, ११ सप्टेंबर २०११ (UTC)

आपण साचा:स्वागत ह्यात बदल करावेत असे मला वाटते. हिंदी विकीपेडिया वरील साचा जास्त descriptive आहे असे मला वाटते. आपण हिंदी विकिपीडिया वरील साचा refer करून मराठीतील साच्यात बदल करूयात. आपणा सर्वांचे मत जाणून घ्यायला आवडेल. - प्रबोध १३:०६, १३ सप्टेंबर २०११ (UTC)

विकिपीडिया बदलांकरिता मुक्त आहे, बदल करण्यास तत्वतः हरकत नाही.या बद्दल चावडीवर अनिरुद्ध परांजप्येंनी मागे माडलेली सुचनाही अभ्यसनीय आहे.शिवाय अलिकडे संपादने करू लागलेल्या नवीन पिढीस मराठी विकिपीडियावर आल्या नंतर नेमकी कोणती माहिती कमी पडते आहे हे संपादकांची नवीन फळी अधिक व्यवस्थीत रीत्या समजू शकते त्यामुळे कालपरत्वे होणार्‍या बदलांचे स्वागतच आहे. एका पेक्षा अधिक स्वागत साचे बनवून त्यात नवीन सदस्यांना उपयूक्त ठरणारा साचा मुख्य स्वागत साचा म्हणून वापरण्यासही हरकत नाही.
पण आपण हा विषय अधिक सखोलपणे अभ्यासण्याच्या दृष्टीने विवीध विकि सहप्रकल्पांना भेटी द्या आणि आठवड्याभरानंतर त्या सर्व विकि सहप्रकल्पावरील स्वागत साच्यातील माहिती/सुचनांची यादी किती सखोल पणे वाचली गेली हे अभ्यासल्यास सुचनांची यादी सहसा वाचण्याकडे कल नसतो असे आढळून येते. हे लिहिण्याचा उद्देश तुम्हाला सुयोग्य बदल करण्या पासून परावृत्त करण्याचा नसून आपण या विषयावर अधिक काय करू शकतो या बद्दलच्या विचारांना चालना देण्याचा आहे.
सध्याच्या परिस्थीतीत बहुसंख्य नवीन सदस्यांना एनसायक्लोपिडिया म्हणजे काय हि संकल्पना मराठी कसे टाईप कराएव ते विवीध लेखन संकेत आणि नियमांची यादीचे शेपूट तसे चांगलेच लांब आहे. यातील एनसायक्लोपिडिया म्हणजे काय हि संकल्पना मराठी कसे टाईप करावे हे दोन स्तर सोबत काही किमान स्वरूपाचे लेख्नन संकेत विकिपीडियावर येण्यापूर्वीच वाचक आणि संपादकांना माहिती झाल्यास त्यांचे होणारे लँडींग अधीक शॉकप्रूफ असू शकेल किंवा कसे या दृष्टीने ऑनलाईन प्रेझंटेशन्स आणि फिल्डवर्क मध्ये कार्यशाळा सोबत जमले तर दुरचित्र वाहिन्याच्या माध्यमाचा उपयोग भविष्यात केला जाणे गरजेचे आहे.
इंग्रजी विकिपीडीयावर जाऊन प्रयोगा दाखल नवे खाते उघडा आणि नवीन विकि सदस्याला इंग्रजी विकिपीडिया कसे मार्गदर्शन करते ते अभ्यासल्यास आणि तदनुसार मराठी विकिपीडियावर बदल केल्यास कदाचीत नवीन सदस्यांचे लँडींग अधिक सुखदायक होईल से वाटते.
शिवाय दहा पन्नास शंभर पाचशे हजार पाचहजार संपादने अशी टप्पेवार मार्गदर्शन करता यावे या करता साचे उपलब्ध केले आहेत त्यात सुधारणां करता वावही आहे. या सुचना त्या टप्प्यांवर आपोआप पोहोचत्या व्हाव्यात या साठी मी मागे बगझीलावर सॉफ्टवेअरमध्येच सुधारणा करण्याची सुचना मांडली आहे.
चिकिपीडिया सजगता साचांमध्येही सुधारणा करण्यास वाव आहे.
विकिपीडिया सहाय्य पानांच्या पहिल्या टप्प्यात बनलेल्या बर्‍याच सहाय्य पानातील भाषेवर बोजड भाषेचा वापर झाल्याच्या तक्रारी आहेत, दुसर्‍या टप्प्याकरता अद्यापी पुरेसे स्वयंसेवक पुढे आलेले नाहीत या बाबींकडेही या निमीत्ताने लक्ष वेधावेसे वाटते माहितगार ०६:३९, १५ सप्टेंबर २०११ (UTC)