विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१५०१०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिसूरी हरीण
पिसूरी हरीण

पिसूरी हरीण तथा पिसोरी (इंग्लिश: Chevrotain, शेव्रोटेन/Mouse deer, माउस डियर) हे सर्व हरीणांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. हे मांजर परिवाराचे सदस्य आहे. पिसूरीचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला माउस डियर असेही म्हणतात.

पिसूरी हरीण हे युग्मखुरी वर्गात गणल्या जाणाऱ्या त्रागुलिडी कुळातील प्राणी असून आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत आढळतात. यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० सेमी असते.

पिसूरी हरणाच्या दोन विशिष्ट जाती आढळताता. एक आशियायी पिसूरी हरीण व दुसरी आफ्रिकी पिसूरी हरीण, पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या घनदाट जंगलात आढळते. आशियायी पिसूरी हरणाच्या पाच उपजाती आढळतात. यांपैकी एक उपजात भारतात आढळते.

भारतात पिसूरी हरीण दक्षिण भारताच्या जंगलात, पश्चिम भागातील जंगलात आणि ओरिसाच्या पूर्व किनाऱ्यावर आढळते. याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेशात १८०० मीटर उंचीवर ते राहतात.

पिसूरी हरीण शरीराने दुबळे, बारीक आणि फार लहान असते. त्याची उंची २५ ते ३० सें.मी. पर्यंत असते. शरीराची बनावट अशी आहे की, शरीराचा पुढचा भाग उंच आहे असे वाटते. यांच्या शरीराचा रंग फिकट भुरकट असतो. त्यावर फिकट पिवळे पट्टे संपूर्ण शरीरावर असतात. दुरून पाहिल्यावर त्या लांबट रेघा आहेत असे वाटते. पिसूरींच्या शरिराचा खालचा भाग, पोट इतर हरिणांप्रमाणे पांढरे व पिवळे असते. त्यांच्या शरीरावर लहान, मुलायम बारीक केस असतात. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. या हरणांचे डोळे गर्द भुरकट आणि कान सामान्य आकाराचे असतात.

(पुढे वाचा...)