डोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डोळे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

शरीराचा एक अवयव.पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशीलअवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते . डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.[१]

डोळ्यांचे रंग व वर्णन[संपादन]

डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे.


नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.

त्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.)

पुस्तके[संपादन]

डोळ्यांचे आरोग्य या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :

  • चष्मा व नेत्ररोग चिकित्सा (डॉ. जयनारायण जैस्वाल)
  • डोळ्यांची निगा (डॉ. छाया कुलकर्णी)
  • नेत्र स्वास्थ्य साधना (सदाशिव निंबाळकर)
  • पाहू आनंदे (डॉ. तेजस्विनी आणि डॉ. प्रसाद वाळिंबे)
मानवी डोळा

आपल्या डोळ्यांचा आकार कधी बदलत नही.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डोळा". विकासपिडिया. १५ मार्च २०१९ रोजी पाहिले.