नीडरजाक्सन
Appearance
(लोअर सॅक्सनी या पानावरून पुनर्निर्देशित)
नीडर जाक्सन Niedersachsen | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
नीडर जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | हानोव्हर | ||
क्षेत्रफळ | ४७,६२४ चौ. किमी (१८,३८८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ७९,२२,००० (३१ जुलै २०१२) | ||
घनता | १६६ /चौ. किमी (४३० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-NI | ||
संकेतस्थळ | www.niedersachsen.de |
नीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथ व ग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत.
आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |