ऱ्हाइनलांड-फाल्त्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऱ्हाइनलांड-फाल्त्स
Rheinland-Pfalz
जर्मनीचे राज्य
Flag of Rhineland-Palatinate.svg
ध्वज
Coat of arms of Rhineland-Palatinate.svg
चिन्ह

ऱ्हाइनलांड-फाल्त्सचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
ऱ्हाइनलांड-फाल्त्सचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी माइंत्स
क्षेत्रफळ १९,८४७.४ चौ. किमी (७,६६३.१ चौ. मैल)
लोकसंख्या ३९,९९,११७
घनता २०० /चौ. किमी (५२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-RP

ऱ्हाइनलांड-फाल्त्स (जर्मन: Rheinland-Pfalz) हे जर्मनी देशाच्या १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. हे राज्य जर्मनीच्या पश्चिम भागातील ऱ्हाइनलँड प्रदेशामध्ये असून त्याच्या उत्तरेस नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, पूर्वेस बेल्जियमलक्झेंबर्ग, दक्षिणेस फ्रान्स, नैर्ऋत्येस जारलांड, आग्नेयेस बाडेन-व्युर्टेंबर्ग तर पूर्वेस हेसेन ही राज्ये आहेत. ऱ्हाईन ही येथील प्रमुख नदी आहे.

ऱ्हाइनलांड-फाल्त्स राज्याची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर ३० ऑगस्ट १९४६ रोजी करण्यात आली. माइंत्स ही ह्या राज्याची राजधानी असून लुडविक्सहाफेन, कोब्लेन्झ, ट्रियर, काइझरस्लाउटर्न ही येथील प्रमुख शहरे आहेत. जर्मनीच्या निर्यातक्षेत्रामधील ऱ्हाइनलांड-फाल्त्स हे आघाडीचे राज्य आहे. वाइन उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. तसेच रसायनांचे उत्पादन करणारी बी.ए.एस.एफ. ही लुडविक्सहाफेन येथील सर्वात मोठी कंपनी आहे.

बुंडेसलीगामध्ये खेळणारा १. एफ.से. काइझरस्लाउटर्न हा ऱ्हाइनलांड-फाल्त्समधील प्रमुख फुटबॉल संघ आहे. फॉर्म्युला वन शर्यतीमधील भूतपूर्व युरोपियन ग्रांप्री व सध्याची जर्मन ग्रांप्री येथील न्युर्बुर्गरिंग ह्या सर्किटवर खेळवली जात आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: