Jump to content

लाओसमधील धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फा दॅट लाँग (गोल्डन स्तूप), हा बौद्ध स्तूप लाओसचे राष्ट्रीय प्रतीक आहे.

लाओस मधील धर्म (प्यू २०१०)[]

  लाओटियन लोक धर्म (30.7%)
  अन्य धर्म (1.8%)

लाओस हा एक आशियाई देश असून त्याचे क्षेत्रफळ २,२०,००० किमी वर्ग आणि त्यात सुमारे ६६ लक्ष लोकसंख्या आहे. जवळजवळ सर्व जातीय समूह (लाओ लुम आणि लाओ लोम) थेरवाद बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत; तथापि, त्यांची लोकसंख्या केवळ ४०-५०% आहे. उर्वरित लोकसंख्या कमीत कमी ४८ विशिष्ट जातीय अल्पसंख्यक गटांची आहे. यापैकी बहुसंख्य जातीय समूह (३०%) लाओटियन लोक धर्माचे अनुयायी आहेत, विश्वास असलेल्या गटांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो.

लाओटियन लोक धर्म बहुतेक लाओ थेंग, लाओ सुंग, सिनो-थाई गट, थाई डॅम आणि थाई डाएंग तसेच मॉन-ख्मेर आणि तिबेटो-बर्मन गटांमधील प्रमुख आहेत. लोलँड लाओमध्ये देखील, थेरवाद बौद्ध धर्मामध्ये अनेक पूर्व-बौद्ध धर्म समाविष्ट केले गेले आहेत. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट लोकसंख्या सुमारे २% आहे. इतर अल्पसंख्याक धार्मिक गटांमध्ये बहाई विश्वास, महायान बौद्ध धर्म आणि चीनी लोक धर्मांचे आचरण करणाऱ्यांचा समावेश आहे. नास्तिक किंवा अज्ञेयवादी लोक फारच कमी आहेत.

जरी शासन विदेशी लोकांना धर्मांतरण करण्यास मनाई करते, तरी खाजगी व्यवसाय किंवा गैर-सरकारी संस्थांशी निगडित काही परदेशी विदेशी शांतपणे धार्मिक क्रियाकलाप करतात. लाओ फ्रोट फॉर नॅशनल कंस्ट्रक्शन हे देशातील धार्मिक बाबींचे प्रभारी असून लाओसमधील सर्व धार्मिक संघटनांनी नोंदणी करणे गरजेचे असते.[]

बौद्ध धर्म

[संपादन]
लुआंग प्रबंग मधील रॉयल पॅलेस येथील बौद्ध मंदिर

थेरवाद बौद्धधर्म देशातील सर्वात संघटित व प्रतिष्ठित धर्म आहे, सुमारे ५००० विहारे धार्मिक कार्यांच्या केंद्रस्थानासह तसेच ग्रामीण भागांमध्ये समुदाय जीवनाचे केंद्र म्हणून कार्ये करतात. लाओस मधील गावांत बौद्ध धार्मिक परंपरा प्रभावी आहे. बहुतांश बौद्ध पुरुष विहारातील भिक्खुंच्या रूपात आपल्या जीवनाचा काही काळ धर्मासाठी समर्पित करतात. या देशात सुमारे २२,००० बौद्ध भिक्खू आहेत, ज्यापैकी ९,००० भिक्खूंना "वरिष्ठ भिक्खू"च्या पदव्या प्राप्त झाल्या आहेत, जेणेकरून त्या विहारातील वर्षभराचा अभ्यास दर्शवितात. याव्यतिरिक्त येथे, अंदाजे ४५० भिक्खूणी आहेत. सर्व देशभरात अनेक बौद्ध विहारे आहेत. औपचारिकपणे, इ.स. १९७५ नंतर बौद्ध धर्मात महानिकाय संप्रदायाचा समावेश करण्यात आला असला तरी बौद्ध धर्माचा थम्मयुध पंथ अजूनही देशात कार्यरत आहे. विशेषतः व्हिआंतियानमधील अनेक विहारांत मठाधिपती आणि भिक्खूंमध्ये थम्मयुध पंथाचे अनुयायी आहेत, जे ध्यान आणि शिस्त यांच्यावर अधिक जोर देतात. व्हिआंतियानात चार महायान बौद्ध विहारे आहेत, दोन पारंपारिक व्हिएतनामी समुदायांची सेवा करणारे आणि दोन पारंपारिक चीनी समुदायाची सेवा करणारे आहेत. व्हिएतनाम, चीन आणि भारत या देशातील बौद्ध भिक्खूंनी या विहारास मुक्तपणे सेवा आणि पूजकांसाठी सेवा करण्यासाठी भेटी दिलेल्या आहेत. इतर शहरी भागात किमान चार मोठे महायान बौद्ध पॅगोडे आहेत आणि वियेतनाम आणि चीनच्या सीमेजवळच्या खेड्यांमध्ये काही लहान महायानी विहारे किंवा पॅगोडे आहेत.

एका अहवालानुसार लाओसमध्ये बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या ९०% आहे.[][][][][] तर सीआयए वर्ल्ड फॅक्टबुकच्या अंदाजानुसार, देशातील एकूण लोकसंख्येच्या ६७% लोकसंख्या ही बौद्ध म्हणून ओळखली जाते.[][]

लाओटीयन लोक धर्म

[संपादन]

लाओटीयन लोक धर्म (लाओ: ສາສນາຜີ सस्ना फि, "आत्मांचा धर्म") हा जातीय धर्म लाओसच्या लोकसंख्येच्या ३०.७% लोकांद्वारे अनुसरला जातो. या धर्मात बहुवचनवादी आणि शामांच्या वर्गांचा समावेश आहे.[१०][११][१२]

ख्रिश्चन धर्म

[संपादन]
कॅथोलिक चर्च "सॅक्रे कोउअर" (१९२८ साली बांधलेले), व्हिएन्टियन

लाओसमध्ये ख्रिस्ती धर्म अल्पसंख्यांक धर्म आहे. लाओसमध्ये तीन मान्यताप्राप्त चर्च आहेत: लाओ इव्हँजेलिकल चर्च, सेव्हेंथ-डे ॲडवेंटिस्ट चर्च आणि रोमन कॅथोलिक चर्च. लाओसमधील ख्रिश्चनांची लोकसंख्या १,५०,००० असून ही संख्या प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यात विभागली गेली आहे.[१३]

इतर धर्म

[संपादन]

लाओस ख्मेर साम्राज्याचा एक भाग होता आणि तेथे काही उर्वरित हिंदू मंदिर आहेत. कन्फ्यूशियस आणि ताओवादच्या अनुयायांचे लहान गट मोठ्या शहरांमध्ये त्यांच्या शिकवणींचे आचरण करतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Pew Research Center - Global Religious Landscape 2010 - religious composition by country Archived 2016-03-10 at the Wayback Machine..
  2. ^ USCIRF Annual Report 2009 - The Commission's Watch List: Laos Archived 2012-10-10 at the Wayback Machine.
  3. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.bol.gov.la/english/religion.html
  5. ^ "संग्रहित प्रत". 2017-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  6. ^ https://www.revolvy.com/topic/Buddhism%20in%20Laos&item_type=topic
  7. ^ https://www.asia-planet.net/laos/luanguage.htm
  8. ^ "संग्रहित प्रत". 2017-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  9. ^ "संग्रहित प्रत". 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  10. ^ Pew Research Center's Global Religious Landscape 2010 - Religious Composition by Country Archived 2016-03-10 at the Wayback Machine..
  11. ^ Yoshihisa Shirayama, Samlane Phompida, Chushi Kuroiwa. Malaria Control Alongside "Sadsana-Phee" (Animist Belief System) in Lao PDR. In: Modern Medicine and Indigenous Health Beliefs, Vol 37 No. 4 July 2006. p. 622, quote: «[...] Approximately 60 to 65% of the population, most of whom are Lao Lum (people of the lowlands) follow Buddhism. About 30% of the population, on the other hand, hold an animist belief system called "Sadsana Phee" [...]».
  12. ^ Guido Sprenger. Modern Animism: The Emergence of "Spirit Religion" in Laos. Local Traditions and World Religions: The Appropriation of “Religion” in Southeast Asia and Beyond. 2014.
  13. ^ Laos: Evolution of the religious situation, Religioscope, 14 February 2003 (फ्रेंच)