Jump to content

महायान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महायान बौद्ध धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तरी बौद्ध धर्म:
  पिवळा (महायान)
  नारंगी (वज्रयान)
दक्षिणी बौद्ध धर्म:
  लाल (थेरवाद)
महायान भन्ते

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण पूर्व आशियामध्ये बहुसंख्यक आहे.

इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. सम्राट कनिष्कांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता. कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक स्तुपाची पूजा करीत. या पंथाने उभ्या बुद्ध मूर्तीची पूजा सुरू केली.[]

प्रभाव

[संपादन]
color map showing Buddhism is a major religion worldwide
आशियात बौद्ध धर्माचा विस्तार, महायान पिवळ्या रंगामध्ये

आज महायान पंथाचे लोक चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, हॉंगकॉंग, व्हियेतनामतैवान ह्या देशांमध्ये बहुसंख्यक आहेत. जगामध्ये १.२ अब्ज पेक्षा अधिक महायानी बौद्ध अनुयायी आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ सुनीत पोतनीस. जे आले ते रमले.. : ग्रीको बुद्धिझम. लोकसत्ता (Marathi भाषेत). 12-03-2018 रोजी पाहिले. ग्रीक आणि तत्कालीन भारतीय बौद्ध संस्कृतींच्या संयोगाने एक नवीनच संस्कृती ‘ग्रीको-बुद्धिझम’ उदयाला आली. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]