रामपूर (जव्हार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?रामपूर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°44′42″N 73°07′34″E / 19.744859°N 73.1261091°E / 19.744859; 73.1261091
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .३४६ चौ. किमी
जवळचे शहर जव्हार
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
५९८ (२०११)
• १,७२८/किमी
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०३
• +०२५२०
• एमएच४८

गुणक: 19°44′42″N 73°07′34″E / 19.744859°N 73.1261091°E / 19.744859; 73.1261091


रामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर पुढे गोरवाडी बस थांब्यानंतर क्षणभर विश्रांती धाबा गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ८ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२१ कुटुंबे राहतात. एकूण ५९८ लोकसंख्येपैकी २९० पुरुष तर ३०८ महिला आहेत. गावाची साक्षरता ४३.८५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४७.४३ आहे तर स्त्री साक्षरता ४०.४५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.०४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुध्दा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

न्याहाळेबुद्रुक, राधानगरी, श्रीरामपूर, केळघर, न्याहाळेखुर्द, आपटाळे, चंद्रपूर, गंगापूर, धानोशी, जुनी जव्हार, काशिवळी तर्फे देंगाचीमेट ही जवळपासची गावे आहेत.न्याहाळेखुर्द ग्रामपंचायतीमध्ये नंदनमाळ, न्याहाळेखुर्द आणि रामपूर ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/