रंग
रंग ही प्राण्यांना डोळ्यांद्वारे होणारी संवेदना आहे. प्रकाशाच्या (विद्युतचुंबकीय लहरींच्या) विविध तरंगलांबीनुसार विविध रंगांची संवेदना असते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात. उदा. मधमाशीला अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते, परंतु; त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखू शकते. मनुष्यप्राण्याची दृष्टी "त्रिरंगी" म्हणता येईल, कारण मनुष्याच्या डोळ्यात ३ प्रकारच्या चेतापेशी असतात आणि त्या ३ वेगवेगळ्या तरंगलांबींच्या वर्गांना संवेदनशील असतात. शंकूकार चेतापेशींचा एक प्रकार लांब तरंगलांबी (५६४ - ५८० नॅमी; लाल रंग), दुसरा प्रकार मध्यम तरंगलांबी (५३४ - ५४५ नॅमी; हिरवा रंग), आणि तिसरा प्रकार छोट्या तरंगलांबींसाठी (४२० - ४४० नॅमी; निळा रंग) संवेदनशील असतो. मानवास दिसणारे इतर सगळे रंग या तीन रंगांच्या मिश्रणानेच तयार होतात.
गेरू, चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, पानांचा रस हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत[ संदर्भ हवा ].
रंगामध्ये वर्णक (pigment) आणि रंजक (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे सेंद्रिय व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.
रंगांची यादी:
- तांबडा
- लाल
- नारिंगी
- भगवा
- पिवळा
- हिरवा
- निळा
- पांढरा
- पारवा
- जांभळा
- काळा
- पांढरा
- राखाडी
- अबोली
- गुलाबी
- केशरी
- चंदेरी
- सोनेरी
- करडा रंग
- तांबूस
- तपकिरी
रंग विविध प्रकारचे असतात.रंग माणसाना आपल्याकडे आकर्षित करतो.
छटा
[संपादन]तरंग लांबी | वारंवारिता | |
---|---|---|
तांबडा | ~ ६२५–७४० नॅनो मीटर | ~ ४८०–४०५ THz |
नारिंगी | ~ ५९०–६२५ नॅनो मीटर | ~ ५१०–४८० THz |
पिवळा | ~ ५६५–५९० नॅनो मीटर | ~ ५३०–५१० THz |
हिरवा | ~ ५००–५६५ नॅनो मीटर | ~ ६००–५३० THz |
निळा | ~ ४८५–५०० नॅनो मीटर | ~ ६२०–६०० THz |
पारवा | ~ ४४०–४८५ नॅनो मीटर | ~ ६८०–६२० THz |
जांभळा | ~ ३८०–४४० नॅनो मीटर | ~ ७९०–६८० THz |