Jump to content

करडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करडा रंग या पानावरून पुनर्निर्देशित)

करडा रंग हिम म्हणजे बर्फाचा चुरा पांढरा असतो, तर ढगाचा रंग करडा असतो. करडा रंग म्हणजेच भुरा रंग. वृद्धापकाळ जवळ आला की सफेद होण्याआधी डोक्यावरील केस करडे होतात. त्यामुळे करडा रंग हा निवृत्तीचा मानला जातो.

गृहसजावटीत करडा रंग कोणत्याही अन्य रंगासोबत उठून दिसतो. महाराष्ट्रातील दगड हे करड्या रंगाचे आहेत, त्यामुळे पंढरपूरची विठ्ठलाची मूर्तीही करड्या रंगाची आहे.

प्रभाकर बर्वे, यशवंत देशमुख आदी चित्रकार त्यांच्या चित्रात करड्या रंगाचा वापर जास्त करीत. चित्रकार हुसेन यांची जुनी चित्रेही करड्या रंगात होती.

ग्रॅफाईट पेन्सिलमध्ये अशा रंगाची छटा असते. पूर्वी वर्तमानपत्रातील चित्रे करड्या रंगात असत.

कृष्णधवल चित्रपटांच्या काळाची आठवण म्हणून आजही लोक करड्या रंगात ग्रुप फोटो काढवून घेतात.

करडा रंग फिका केला,म्हणजे त्यात थोडा पांढरा रंग मिसळला की राखाडी रंग बनतो.