चर्चा:मेसाई देवी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .



जल देवता[संपादन]

@आर्या जोशी:

जल देवतांचा विषय निघाला त्या वरुन समर्थ रामदासांनी त्यांच्या साहित्यात मेसाईचा उल्लेख जलदेवता असा केल्याचे दिसते पण जलदेवता असा समकक्ष उल्लेख इतर संतांच्या साहित्यात येत नाही. (-दासबोधात ' जळीच्या मेसको मायेराणी । ' शिवाय मेसेकोलाच समर्थ मायराणी म्हणून संबोधत आहेत का हाही प्रश्नच आहे.). मैसम्मा नावाने हिच देवी तेलंगाणात अधिक महत्व ठेवते असे दिसते. कृ. मिसळपाव डॉट कॉम वरील ही संबधीत चर्चाही पहावी


छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाईंच्या संबंधीत ऐतिहासिक दस्तएवजात मेसाईचा संदर्भ येत असावा. अद्याप दुजोरा न मिळाल्याने त्याचीही लेखात नोंद घेता आलेली नाही.

एनी वे या देवी बद्दल आपल्याकडच्या संदर्भ ग्रंथात काही माहिती असल्यास द्यावी हि विनंती



माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०७, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]