शिरगाव (मुरबाड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?शिरगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मुरबाड
जिल्हा ठाणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

शिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. सन२०११ च्या जनगणनेेनुसार लोकसंख्या १२४३आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

मुरबाड या तालुक्याच्या ठिकानापासून ५.५ किमी अंतरावर हे गांव वसले आहे. सुमारे २ किमी अंतरावर कालू नदी आहे.

हवामान[संपादन]

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

लोकजीवन[संपादन]

गावामध्ये विविध जाती व धर्माचे लोक एकोप्याने राहत असुन यात कुणबी जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तसेच दलित,आदिवासी,मुस्लिम ई लोकसंख्या देखिल आहे. शिंदे, घरत, चोरघे, डोहले, बांगर, सासे, सोकांडे, भोईर, शेख, ई. विविध आडनावाचे लोक वस्ती करून आहेत.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळा असून येथे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळची बस सेवा असून दर अर्धा तासाला फेरी आहे. ग्राम पंचायत मार्फत पाणी पुरवठा केला जातो.

जवळपासची गावे[संपादन]

मोहरई, चिखले, टेमगाव, ब्राम्हणगाव, धानिवली, वाघिवली, कर्वळे, शिदगांव.

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/