मधुबनी चित्रशैली
मधुबनी जिल्हा, बिहार येथील चित्रकला शैली | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | art movement, style of painting | ||
---|---|---|---|
उपवर्ग | folk art | ||
स्थान | बिहार, भारत | ||
मूळ देश | |||
| |||
मधुबनी चित्रशैली हा चित्रकलेचा एक प्रकार आहे.[१]भारताच्या मथुरा प्रांतात हा कलाप्रकार विशेष प्रचलित आहे. बोटांची नखे,आगपेटीच्या काड्या,निबची टोके,ब्रश इ.साधने वापरून मधुबनी शैलीची चित्रे काढली जातात.यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.मधु म्हणजे मध आणि बनी म्हणजे वन/ जंगल अशी या नावाची व्युत्पत्ती आहे.[२]
उगम
[संपादन]या शैलीला मिथिला शैली असेही म्हणले जाते.बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात ह्या कलेचा उगम झालेला दिसतो. नेपाळ हे सुद्धा या कलेचे केंद्र मानले जाते.[३]मधुबनी शहर हे या चित्रांच्या निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र आहे.अशा अर्थाने मधुबनी ही चित्रशैली स्थानिक लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे.[२]
इतिहास
[संपादन]रामायणात असा उल्लेख सापडतो की मिथिलेचा राजा जनक याने सीता आणि श्रीराम यांच्या विवाहाचे चित्रण स्थानिक कलाकारांना करायला सांगितले आणि तिथून या चित्रशैलीला प्रारंभ झाला असे मानले जाते.[४]
माध्यम
[संपादन]पारंपरिक पद्धतीनुसार ही चित्रे नुकत्याच सारवलेल्या घराच्या भिंती,किंवा झोपडीच्या मातीच्या जमिनी यावर काढली जात असत. कालांतराने हाताने तयार केलेला कागद,कापड,कॅनव्हास यावर ही चित्रे काढायला सुरुवात झाली. तांदळाच्या पिठापासून ही चित्रे काढण्याची पारंपरिक पद्धती आहे.
चित्रे
[संपादन]या शैलीमधे विशेष करून राधा-कृष्ण,गणपती या देवता, युवती आणि महिलांची चित्रे, मासा,मोर, पक्षी,झाडे,पाने,फुले यांचा समावेश होतो. भडक रंगांचा वापर करून ही चित्रे काढली जातात.
वैशिष्ट्ये: या चित्रात खासकरून कूल देवतेचे चित्रण होते. हिन्दू देवी देवतांचे फोटो, प्राकृतिक दृश्ये उदा. सूर्य आणि चंद्र, धार्मिक वनस्पती उदा. तुळस आणि विवाहाची दृश्ये पाहायला मिळतात.
मधुबनी भित्तिचित्रात माती(चिकट) व गायीच्या शेणाच्या मिश्रणात बाभूळ या झाडाचे डिंक मिसळून भिंतीवर सारवून तयारी केली जाते. गायीच्या शेणात एक खास प्रकारचे रसायन पदार्थ असल्याने भिंती वर विशेष चमक येते. ही घरातील तीन खास जागांवरच बनविण्याची परंपरा आहे. जसे- पूजास्थान, कोहबर कक्ष (विवाहितेच्या खोलीत) आणि विवाह किंवा काही खास उत्सवानिमित्त घरातील बाहेरील भिंतींवर. मधुबनी पेंटिंगमध्ये ज्या देवी-देवतांचे चित्रण केले जाते ते हे आहे- मां दुर्गा, काली, सीता-राम, राधा-कृष्ण, शिव-पार्वती, गौरी-गणेश, विष्णू देवतेचे दहा अवतार इत्यादि. या फोटो व्यतिरिक्त प्राकृतिक आणि रम्य देखाव्याची चित्रेसुद्धा काढली जातात. पशु-पक्षी, वृक्ष, फूले- पाने इत्यादी चित्रेही वापरली जातात.[३]
सामाजिक माध्यमांवर
[संपादन]- दिल्ली येथील राजपथ येथे स्वातंत्र्याच्या महानायकांची चित्र मधुबनी चित्रशैली मध्ये चित्रित करण्याची संधी स्थानिक कलाकारांनी घेतली.[५]
- बिहार येथील मधुबनी चित्रशैली कलाकार दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ Madhubani Painting (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. 2003. ISBN 978-81-7017-156-0.
- ^ a b Desk, From : Lifestyle. "Madhubani Paintings, the folk art of Mithila". www.cityspidey.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-12 रोजी पाहिले.
- ^ a b "Madhubani (Mithila) Painting - History, Designs & Artists". www.culturalindia.net (इंग्रजी भाषेत). 2022-02-12 रोजी पाहिले.
- ^ NAIR, SUMITRA (DECEMBER 1, 2016). "THE ETHNIC SOUL Feel the vibes of cultural India". craftsvilla.com. 12.2.2022 रोजी पाहिले. line feed character in
|title=
at position 16 (सहाय्य);|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "लाेक चित्रकलाओं:बिहार की लाेक चित्रकला से राजपथ पर, आज सजेगी आजादी के महानायकाें की कहानी". भागलपुर: दैनिक भास्कर. २०२२.
- ^ "सम्मान : बिहार की दुलारी देवी ने घरों में काम करते हुए तय किया पद्मश्री का सफर". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-02-12 रोजी पाहिले.