जलप्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे. हवा - पाणी -अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या द्रुष्टीने खुपच महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.


ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://healthmarathi.com/water-pollution/ येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
उपाययोजना[संपादन]

    परिवेद

शुद्धीकरण[संपादन]

तलावातील कचरा,प्लास्टिक पिशव्या आदि काढतानाचा एक क्षण
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.

जगभरातील साधारण २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले