भोपाळ वायुदुर्घटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोपाळ वायु दुर्घटना ३ डिसेंबर, १९८४ या दिवशी मध्यप्रदेश येथिल भोपाळ या शहरात घडली. युनियन कार्बाइड (इं.) लिमिटेड या कंपनीच्या ६१० नंबरच्या जमिनीखालील टँकमधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल ऐसोसायनाईट (एम. आय. सी.) वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. जवळपास २०,००० लोकांना या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे म्रूत्यु ओढवला तर ५००,००० हुन जास्त जण जखमी अथवा अपंग झाले.

पार्श्वभुमी[संपादन]

युनियन कार्बाईड इंडिया लि. हा सत्तरच्या दशकात भोपाळमधला एक महत्त्वाचा प्रकल्प होता. अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीची ही भारतातील सबसिडीयरी. इथे ‘सेविन’ (कार्बरिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाईल ऐसोसायनाइट व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. द्रव स्थितीत असलेला मिथाईल ऐसोसायनाइट वायूरूप अवस्थेत अत्यंत विषारी असल्याची पूर्ण कल्पना अमेरिकन तसेच भारतीय कंपनीला होती. एम.आय.सी.चे रूपांतर वायूत होऊ नये म्हणून जमिनीखालच्या थंड टाक्यांमधून तो द्रव साठवला जात असे. अशा तीन टाक्या जमिनीखाली होत्या. त्यापैकी एका टाकीमधून द्रव एम.आय.सी.चे गॅसमध्ये रूपांतर झाले.

दुर्घटना[संपादन]

दोन डिसेंबर चौऱ्याऐंशीच्या रात्री नाइट पेट्रोलिंग युनिटने जवळच्या पोलीस कंट्रोल रूमला रात्री १.२५ च्या सुमारास पहिली बातमी कळवली की, कसलासा वायू पसरला आहे आणि लोक घाबरून पळत आहेत. वायुगळती युनियन कार्बाईडमधून होत असल्याचाही संदेश पोहोचला. युनियन कार्बाईडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु एकही जबाबदार अधिकारी सापडेना. रात्री दोनच्या सुमारास कंट्रोल रूममधील फोन सतत खणखणू लागले आणि पोलीस केवळ एवढीच माहिती देऊ शकत होते की, शहरात वायुगळती झाली आहे आणि पाण्याचा वापर केल्यास होणारा त्रास कमी होऊ शकेल. मात्र, हा वायू इतका विषारी असल्याची कल्पना यंत्रणेलाच नसल्यामुळे केवळ लोकांमधली भीती दूर करणे आणि पळणाऱ्यांची सुरक्षितता- एवढीच बाब प्रामुख्याने त्या रात्री विचारात घेतली जात होती. तीन डिसेंबरची सकाळ उजाडली. सकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत या घटनेची तीव्रता लक्षात आली. मृत्यूने घातलेले थैमान लक्षात येऊ लागले. मृत अथवा घायाळ शरीरे भोपाळ मेडिकल कॉलेजच्या आवारात पोस्टमॉर्टेमसाठी आणून टाकू लागली. या परिस्थितीत नेमक्या इलाजाबाबत डॉक्टरांमध्येही संदिग्धताच होती.

१६ डिसेंबरपासून ‘ऑपरेशन फेथ’ हाती घेण्यात आले. कंपनीपासून दूरवर कॅम्प्समधून लोकांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या ऑपरेशनपूर्वीच जुन्या भोपाळमधील बरेच लोक उठून निघून गेले होते. १६ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ‘फेथ ऑपरेशन’ सुरू झाले. या प्रक्रियेदरम्यान कंपनीच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी टाकण्यात येत होते. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधूनही सतत पाण्याचा शिडकावा कंपनीवर होत राहिला. लोकांच्या मनात विश्वास उत्पन्न व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांसह सगळा अधिकारी काफिला ऑपरेशनदरम्यान कंपनीमध्येच दिवसभर राहत होता. आणि २२ डिसेंबरच्या संध्याकाळी ‘ऑपरेशन फेथ’ संपले.

दुर्घटनेचे परिणाम[संपादन]

या दुर्घटनेत ३,००० हून अधिक लोकांचा काही दिवसातच मृत्यू झाला तर जवळपास २०,००० लोकांना या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे म्रूत्यु ओढवला. भोपाळ वायु दुर्घटना ही उद्योगजगतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना गणली जाते.

दुर्घटनेची कारणे[संपादन]


युनियन कार्बाइड वरील खटला आणि वॉरेन अँडरसन वरील आरोप[संपादन]

युनियन कार्बाइड कंपनीचे त्यावेळचे मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO), वॉरेन अँडरसन यांच्यावर इ.स. १९९१ मधे मनुष्यवधाचा खटला भरण्यात आला. अँडरसन याना फेब्रुवारी १, इ.स. १९९२ मधे भोपाळच्या सरन्यायाधीशांनी मनुष्यवधाचा खटल्यामधे न्यायालयामधे हजर न झाल्याने फरारी म्हणून जाहीर केले. न्यायालयाने अँडरसन यांच्या अमेरिकेकडून प्रत्यार्पणासाठी भारतीय सरकारकडे आदेश जारी करण्यात आला. अँडरसन यांना अटक होऊ शकली नाही. अखेर व्हेरो बीच, फ्लोरिडा येथील एका इस्पितळात २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा मृत्यू झाला मरता मरता पन तो बोलुन गेला कि मला माझ्या पापाची

बाह्य दुवे[संपादन]