Jump to content

भारतातील रेल्वे अपघातांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही कालक्रमानुसार भारतातील रेल्वे अपघातांची यादी आहे.

यादी

[संपादन]

स्वातंत्र्यपूर्व भारत

[संपादन]
दिनांक अपघात स्थान ठार जखमी नोंद संदर्भ
२४ ऑक्टोबर, १९०७ कोट लखपत रेल्वे अपघात कोट लखपत, लाहोर जवळ ११ २७ कोट लखपत स्थानकावर एक प्रवासी ट्रेन मालवाहू ट्रेनला धडकली. [][]

स्वातंत्र्योत्तर भारत

[संपादन]
दिनांक अपघात स्थान ठार जखमी नोंद संदर्भ
२३ डिसेंबर, १९६४ पांबन पूल अपघात पांबन पूल १५०+ रामेश्वरमजवळ आलेल्या चक्रीवादळात गाडी पुलावरून कोसळली
६ जून, १९८१ १९८१ बिहार रेल्वे अपघात सहर्सा, बिहार जवळ ७५०+ वादळी पावसात गाडी बागमती नदीत कोसळली
२० ऑगस्ट, १९९५ फिरोजाबाद रेल्वे अपघात फिरोझाबाद जवळ ३५८+ नीलगायीला धडकल्यानंतर कालिंदी एक्स्प्रेस रुळावर थांबली. पुरुषोत्तम एक्सप्रेसने मागून कालिंदी एक्सप्रेसला धडक दिली.
२६ नोव्हेंबर, १९९८ खन्ना रेल्वे अपघात खन्ना, लुधियाना जिल्हा, पंजाब २१२ जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस रुळ तुटल्यामुळे रुळावरून घसरली. पुढे, स्वर्ण मंदिर मेल आणि जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस मध्ये टक्कर होऊन अपघाताची व्याप्ती वाढली.
२ ऑगस्ट, १९९९ गैसल रेल्वे अपघात गैसल रेल्वे स्थानकाजवळ, उत्तर दिनाजपूर जिल्हा, पश्चिम बंगाल २८५ ३००+ एकाच ट्रॅकवर दोन गाड्यांची टक्कर, जेव्हा ४ पैकी ३ ट्रॅक देखभालीसाठी बंद करण्यात आले होते.
९ सप्टेंबर, २००२ रफीगंज रेल्वे अपघात रफीगंज, औरंगाबाद जिल्हा, बिहार १३०+ १५०+ स्थानिक माओवादी दहशतवादी गटाने घडवला
२३ जून २००३ वैभववाडी रेल्वे अपघात वैभववाडी जवळ ५२+ १००+ दरड कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली.
१७ जून २००४ करंजाडी रेल्वे अपघात करंजाडी जवळ १४ ११५+ दरड कोसळल्याने मत्स्यगंधा एक्सप्रेस रुळावरून घसरली.
२८ मे, २०१० ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रेल्वे अपघात झाडग्राम जिल्हा १४८+ २००+ गाडी रुळावरून घसरली []
१९ ऑक्टोबर, २०१८ अमृतसर रेल्वे अपघात अमृतसर जवळ ६१ २०० रावण दहन (दसराउत्सव) पहाण्यासाठी गर्दी रुळांवर एकत्र उभी होती ज्यामुळे अपघात झाला. []
२ जून, २०२३ ओडिशा रेल्वे अपघात बहानागा बाजार रेल्वे स्थानकाजवळ २७५+

संदर्भ

[संपादन]
  1. ^ A big smash, The Straits Times (4 November 1907)
  2. ^ "Summary Of The Administration Of The Earl Of Minto Viceroy And Governor Of India In The Railway Department Nov 1905- July 1910". archive.org. 1910.
  3. ^ "1981 Bihar to 2023 Balasore train accident in Odisha, here are India's deadliest rail accidents". followed by 2023 Odisha Railway Accident (Killed 300)
  4. ^ "Dussehra tragedy in Amritsar". The Hindu. 19 October 2018.