सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांताक्रुझ–चेंबूर जोडरस्ता या पानावरून पुनर्निर्देशित)
सांताक्रूझ–चेंबूर जोडरस्ता
मुंबईच्या नकाशावर गडद निळ्या रंगात सांताक्रूझ–चेंबूर जोडरस्ता
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ६.४५ किलोमीटर (४.०१ मैल)
सुरुवात पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रूझ
शेवट पूर्व द्रुतगती महामार्ग, चेंबूर
स्थान
शहरे मुंबई
जिल्हे मुंबई उपनगर जिल्हा
राज्ये महाराष्ट्र

सांताक्रूझ–चेंबूर जोडरस्ता (Santa Cruz–Chembur Link Road; संक्षेप: एस.सी.एल.आर.) हा मुंबई शहरामधील एक प्रमुख हमरस्ता आहे. हा रस्ता सांताक्रूझ येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो. सांताक्रूझ पूर्व, कुर्ला पश्चिम, टिळकनगर इत्यादी उपनगरांमधून पवई तलावाच्या दक्षिणेकडून साधारणपणे पूर्वेकडे धावणारा हा रस्ता चेंबूर येथे पूर्व द्रुतगती महामार्गापाशी (राष्ट्रीय महामार्ग ३) संपतो. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असून मुंबई विद्यापीठ, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) ह्याच मार्गावर आहेत. वांद्रे कुर्ला संकुलाकडे जाण्याचा मार्ग देखील येथून सुरू होतो. जागतिक बँकेने पुरस्कृत केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील ४५४ कोटी रुपये वापरून हा जोडरस्ता बांधला गेला. विविध कारणांस्तव ११ वर्षे रेंगाळलेला हा प्रकल्प अखेर २०१४ साली पूर्ण झाला व १८ एप्रिल २०१४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ह्या रस्त्यासाठी मुंबईमधील पहिला व भारतामधील दुसरा दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]