Jump to content

नक्षत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंचक नक्षत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
सूर्यसिद्धांतानुसार नक्षत्रांची मांडणी
सूर्यसिद्धांतानुसार नक्षत्रांची मांडणी

आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे.

चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६० अंश भागिले २७ = १३° २०′) १३ अंश २० कला असते. प्रत्येक नक्षत्र हा परत ४ पदां मध्ये भागला गेला आहे.

आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत.

# नाव फलज्योतिष्यान्वये देवता संबंधित तारका मानचित्र स्थिती पद
पद १ पद २ पद ३ पद ४
अश्विनी केतू β (बिटा) आणी γ (गामा) मेष तारामंडल ०° – १३° २०′ मेष चु चे चो ला
भरणी शुक्र 35 Arietis, 39 Arietis आणि 41 Arietis 13AR20-26AR40 ली लू ले लो
कृत्तिका रवी Pleiades (star cluster) 26AR40-10TA00
रोहिणी चंद्र Aldebaran 10TA00-23TA20 वा वी वु
मृगशीर्ष मंगळ λ, φ Orionis 23TA40-06GE40 वे वो की
आर्द्रा राहू Betelgeuse 06GE40-20GE00 कु
पुनर्वसु गुरू Castor आणि Pollux 20GE00-03CA20 के को हा ही
पुष्य शनी γ, δ आणि θ Cancri 03CA20-16CA40 हू हे हो डा
आश्लेषा बुध δ, ε, η, ρ, आणि σ Hydrae 16CA40-30CA500 डी डू डे डो
१० मघा केतू Regulus 00LE00-13LE20 मा मी मु मे
११ (11) पूर्वाफाल्गुनी शुक्र δ आणि θ Leonis 13LE20-26LE40 मो टा टी टू
१२ (12) उत्तराफाल्गुनी रवी Denebola 26LE40-10VI00 टे टो पा पी
१३ (13) हस्त चंद्र α, β, γ, δ आणि ε Corvi 10VI00-23VI20 पू
१४ (14) चित्रा मंगळ Spica 23VI20-06LI40 पे पो रा री
१५ (15) स्वाती राहू Arcturus 06LI40-20LI00 रू रे रो ता
१६ (16) विशाखा गुरू/बृहस्पति α, β, γ आणि ι Librae 20LI00-03SC20 ती तू ते तो
१७ (17) अनुराधा (Anurādhā) शनी β, δ and π Scorpionis 03SC20-16SC40 ना नी नू ने
१८ (18) ज्येष्ठा (Jyeshtha) बुध α, σ, and τ Scorpionis 16SC40-30SC00 नो या यी यू
१९ (19) मूळ (Mūla) केतू ε, ζ, η, θ, ι, κ, λ, μ and ν Scorpionis 00SG00-13SG20 ये यो भा भी
२० (20) पूर्वाषाढा (Pūrva Ashādhā) शुक्र δ and ε Sagittarii 13SG20-26SG40 भू धा फा ढा
२१ (21) उत्तराषाढा (Uttara Ashādhā) रवी ζ and σ Sagittarii 26SG40-10CP00 भे भो जा जी
२२ (22) श्रवण (Shravana) चंद्र α, β and γ Aquilae 10CP00-23CP20 खी खू खे खो
२३ (23) धनिष्ठा (Shravishthā) or Dhanisthā मंगळ α to δ Delphinus 23CP20-06AQ40 गा गी गु गे
२४ (24) शतभिषा (Shatabhisha) राहू γ Aquarii 06AQ40-20AQ00 गो सा सी सू
२५ (25) पूर्वाभाद्रपदा (Pūrva Bhādrapadā) गुरू/बृहस्पति α and β Pegasi 20AQ00-03PI20 से सो दा दी
२६ (26) उत्तराभाद्रपदा (Uttara Bhādrapadā) शनी γ Pegasi and α Andromedae 03PI20-16PI40 दू त्र
२७ (27) रेवती (Revatī) बुध ζ Piscium 16PI40-30PI00 दे दो चा ची

पुण्यामधे "नक्षत्र उद्यान" नावाचे एक उद्यान कोथरूडमध्ये आहे.

२८वे नक्षत्र

[संपादन]

तैत्तिरीय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यांमध्ये अभिजित हे २८ वे नक्षत्र आहे. परंतु कालांतराने हे नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले, म्हणूनच आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात. अभिजित नक्षत्र हे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र यांच्यादरम्यान आहे. उत्तराषाढाचा शेवटचा एक चरण व श्रावणाचा आरंभीचा एक चरण मिळून अभिजित नक्षत्र होते.

त्रिपाद नक्षत्रे

[संपादन]

कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे असे म्हणतात.[][]

पंचक नक्षत्रे

[संपादन]

धनिष्ठा नक्षत्राचे ३रे आणि ४थे चरण, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे असे म्हणतात.[][]

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस जर त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र लागलेले असेल तर या नक्षत्राचे दोष लागू नये म्हणून अग्नीदाह करताना पुत्तलविधी केला जातो. किंवा सुतकाचे दिवस संपल्या नंतर, म्हणजेच ११ व्या दिवशी त्रिपाद नक्षत्र / पंचक नक्षत्र शांती केली जाते.[]

पुस्तके

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ उमेश पाण्डे. "शुभा शुभ जानने की तीस सरल विधियाँ". prayog.pustak.org. ६ डिसेंबर २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "पंचक (Panchak) - क्या होता है पंचक नक्षत्र, कब लगता है पंचक और प्रभाव". astroswamig.com. ३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b "पंचक के शुभ नक्षत्र और शुभ फल, जानिए..." हिंदी वेब दुनिया. ३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.