नीरज चोपडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नीरज चोपडा (चोप्रा)
Neeraj Chopra Of India(Javelin).jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव नीरज चोपडा (चोप्रा)
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २४ डिसेंबर, १९९७ (1997-12-24) (वय: २३)
जन्मस्थान पानिपत,हरियाणा
खेळ
देश भारत
खेळ मैदानी खेळ
खेळांतर्गत प्रकार भालाफेक


नीरज चोपडा (नीरज चोप्रा) हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.

कारकीर्द[संपादन]

२०१८ राष्ट्रकुल खेळ[संपादन]

२०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.[१]

२०१८ आशियाई खेळ[संपादन]

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.[२] या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान त्यांना मिळाला.[३] आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले.[४]

पुरस्कार[संपादन]

२०१८ मध्ये भारत सरकारतर्फे नीरजला अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

  1. ^ "आशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-27. 2018-08-27 रोजी पाहिले.
  2. ^ "आशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-27. 2018-08-27 रोजी पाहिले.
  3. ^ "नीरज चोप्रा ध्वजधारक - Google शोध". www.google.co.in. 2018-08-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Neeraj Chopra- News18 Lokmat Official Website". News18 Lokmat. 2018-09-02 रोजी पाहिले.