नीडरजाक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नीडर जाक्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
नीडर जाक्सन
Niedersachsen
जर्मनीचे राज्य
Flag of Lower Saxony.svg
ध्वज
Coat of arms of Lower Saxony.svg
चिन्ह

नीडर जाक्सनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
नीडर जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी हानोव्हर
क्षेत्रफळ ४७,६२४ चौ. किमी (१८,३८८ चौ. मैल)
लोकसंख्या ७९,२२,००० (३१ जुलै २०१२)
घनता १६६ /चौ. किमी (४३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-NI
संकेतस्थळ www.niedersachsen.de

नीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत.

आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: