नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

साचा:Infobox roadनागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग  किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा ८ पदरी नियोजित महामार्ग आहे जो महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरला महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईशी जोडेल.[१] हा महामार्ग  १० जिल्ह्यातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे नागपूर आणि मुंबईमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल .[२] या प्रकल्पासाठी ₹४६,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि ८६०३ हेक्टर जमिनीची गरज आहे.[३]

प्रकल्प तपशील[संपादन]

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल. सपाट जमिनीवर या मार्गाची वेगमर्यादा ताशी १५० किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी १०० किमी असेल. [४] राज्य सरकार मार्गावर  २४ शहरे तयार करणार आहे ज्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था समाविष्ट आहेत. १० जिल्ह्यात या प्रकल्पासाठी एकूण २८,२८० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे, त्यातील ८,५२० हेक्टर महामार्गासाठी वापरली जाणार आहेत तर १०,८०० हेक्टर हे नवीन नगरां साठी असेल.[५] प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी मरारविमला  बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे.[६]

महामार्गावरील पूर्व बांधकाम कार्याचा वेग वाढविण्यासाठी, मरारविमने या प्रकल्पाला पाच पॅकेजमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक पॅकेजसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनी नेमली.[७]नागरी काम  आता १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे .[८]

हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यातून जाईल. हा महामार्ग १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही. या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे, वाहनांसाठी ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग इतके महामार्गाच्या खालून जाणारे रस्ते अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसंच स्थानिक जनतेलाही महामार्गाचा कोणताच अडथळा त्यांच्या दळणवळणात होणार नाही आणि अपघात टाळले जातील. या द्रुतगती महामार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन्स आणि वीज वाहतुक सुविधा टाकल्या जातील.[९]

प्रकल्पाबाबतच्या ठळक गोष्टी[संपादन]

 • महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा संपूर्णपणे नव्यानं उभा राहणारा आहे (ग्रीनफिल्ड प्रकल्प).
 • नागपूर आणि मुंबईमधील अंतर, प्रवासी वाहतुकीला ८ तासात व मालवाहतुकीला १६ तासात पार करता येईल.
 • या महामार्गामुळे महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २४ जिल्हे एकमेकांना जोडले जातील.
 • हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग राज्याच्या सहा महसूल विभागांपैकी पाच विभागात असलेल्या दहा जिल्ह्यांतील सव्वीस तालुक्यांमधील ३९२ गावांमधून जाणार आहे.
 • यामुळे महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदराशी आणि जिथून नागपूरच्या हवाई मार्गानं जगात कुठेही मालवाहतुक होईल अशा मिहानशी जोडले जाणार आहेत.
 • यासाठी लागणारी जमीन एका विशिष्ट पद्धतीची योजना राबवून जमीन धारकांकडून एकत्र केली जाणार आहे, जिथे जमीनमालक या सर्व योजनेचे भागीदार होतील. याच योजनेअंतर्गत प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांचा, म्हणजेच नव-नगरांचाही विकास होणार आहे.
 • महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे.[१०]

कृषी समृद्धी केंद्र[संपादन]

१० जिल्ह्यांमध्ये मिळून २० पेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रं प्रस्तावित आहेत. या द्रुतगती मार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रं विकसित केली जाणार आहेत. अशा दोन नगरांमधलं सरासरी अंतर ३० कि.मी. असणार आहे. प्रत्येक नगराचा आकार साधारण १००० ते १२०० एकर [४०० ते ५०० हेक्टर (२ कि.मी. x २.५ कि.मी.)] इतका असणार आहे. केंद्रामध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल. याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्र देखील असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, १५% भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर २०% भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच १०% भाग हरितक्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल आणि ५% भाग हा सार्वजनिक आणि त्यासारख्या वापरासाठी ठेवलेला असेल.[११]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Rawal, Swapnil (10 March 2018). Hindustan Times. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 11 March 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 2. ^ Engineer, Rayomand (30 May 2018). The Better India. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 3. ^ Jog, Sanjay (30 May 2018). DNA. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 4. ^ Chacko, Benita (20 February 2017). Indian Express. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 5. ^ Financial Express. 31 May 2017. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 6. ^ Jog, Sanjay (28 March 2018). DNA. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 7. ^ Mehta, Manthan K (11 May 2016). (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य); हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य); हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
 8. ^ Sheikh, Ateeq (3 January 2017). DNA. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 May 2018 रोजी मिळवली) |archiveurl= requires |url= (सहाय्य). 31 May 2018 रोजी पाहिले.  Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
 9. ^ "Maharashtra Samruddhi Mahamarg | Nagpur Mumbai Super Communication Expressway Details". www.mahasamruddhimahamarg.com (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 10. ^ "Maharashtra Samruddhi Mahamarg | Project Concept". www.mahasamruddhimahamarg.com (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 11. ^ "Maharashtra Samruddhi Mahamarg | Krishi Samruddhi Kendra". www.mahasamruddhimahamarg.com (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले.