दलित साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत.  :


असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :

 • १ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.
 • बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 • ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे त्याचे स्वागताध्यक्ष होते.
 • एक अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी या गावी २७-२८ फेब्रुवारी १९८८ या तारखांना झाले होते. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
 • ३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.
 • ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
 • दलित साहित्य संमेलन, पुलगावला १९९० या वर्षी झाले. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
 • २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.
 • ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.
 • ११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
 • १२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.

 • २०१७ साली ज्यावेळी डोंबिवलीत ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते त्या सुमारास कल्याणात ‘समरसता’ संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलनही पार पडले. या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे होते. या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात ११ ठराव पास करण्यात आले.

१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत ‘दलित’ऐवजी ‘आंबेडकरवादी साहित्य’ असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा. ८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये.

या ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली.

दलित साहित्य संमेलनातील भाषणे[संपादन]

 • अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे (पुस्तक, संपादक - वामन निंबाळकर, प्रकाशक - प्रबोधन प्रकाशन, नागपूर- १९९१)

हे सुद्धा पहा[संपादन]