दलित साहित्य संमेलन
दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. परंतु 1961 पासून 'दलित साहित्य' संकल्पनेला विरोध करीत भाऊसाहेब अडसूळ, आप्पासाहेब रणपिसे व विजय सोनवणे यानी बौद्ध साहित्य संमेलने भरवली ती परंपरा आजही सुरू आहे. म्हणुन बौद्ध साहित्य संमेलने ही दलित साहित्य संमेलनात मोडली जात नाहीत.
दलित साहित्य संमेलने:
- अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
- कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
- राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
- अस्मितादर्शन साहित्य संमेलन
- आदिजन साहित्य संमेलन
- आदिवासी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन
- अस्मितादर्श साहित्य संमेलन
- आंबेडकरी युवा साहित्य संमेलन
- आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन
- आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन
- आंबेडकरी साहित्य संमेलन
- आविष्कार साहित्य संमेलन
- ओबीसी साहित्य संमेलन
- राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन
- चमार एकता सम्मेलन
- अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन
- अखिल महाराष्ट्र दलित साहित्य संमेलन
- दलित अधिकार संमेलन
- दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन
- दलित करोडपतींचे व्यापारिक सम्मेलन
- राष्ट्रीय दलित कलम साहित्य अधिवेशन
- दलित काँग्रेस सम्मेलन
- दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन
- दलित नाट्यसंमेलन
- दलित पिछड़ा सम्मेलन
- दलित महासम्मेलन
- दलित महिला सम्मेलन
- दलित-मुस्लिम एकता सम्मेलन
- दलित मुव्हमेन्ट असोसिएशनचे वार्षिक सम्मेलन
- अंतर्राष्ट्रीय दलित सम्मेलन
- अतिदलित सम्मेलन
- राज्यस्तरीय दलित संमेलन
- राष्ट्रीय दलित सम्मेलन
- दलित सम्मेलन
- काँग्रेसचे दलित सम्मेलन
- ज़िला दलित सम्मेलन
- बहुजन समाज पार्टीका दलित सम्मेलन,
- मंडल दलित स्म्मेलन
- दलित अस्मिता सम्मेलन
- दलित साहित्य विचारवेध संमेलन
- दलित साहित्य अकादमीचे संमेलन
- दलित साहित्य विचारवेध संमेलन
- दलित साहित्य संमेलन
- दलित सेनेचे जिल्हा संमेलन
- द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन
- परिवर्तन साहित्य संमेलन
- परिवर्तनी साहित्य संमेलन
- प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
- फुले-आंबेडकर साहित्य संमेलन
- अखिल भारतीय फुले-आंबेडकरवादी साहित्य संमेलन
- फुले आंबेडकरी साहित्य संमेलन
- फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन
- फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन
- राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
- महात्मा फुले साहित्य संमेलन
- महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
- बामसेफ
- राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य संमेलन
- महादलित सम्मेलन
- रमाई चळवळीचे साहित्य संमेलन
- रमाई साहित्य संमेलन
- राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
- राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन
- अखिल भारतीय वामनदादा कर्डक साहित्य संमेलन
- विद्रोही साहित्य संमेलन (१)
- विद्रोही साहित्य संमेलन (२)
- राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन
- सत्यशोधकी साहित्य संमेलन
- समरसता साहित्य संमेलन
- सम्यक थिएटर पारिवारिक साहित्य संमेलन
- सम्यक साहित्य संमेलन
- भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन
- संविधाननिर्माता साहित्य संमेलन
- सावित्री साहित्य संमेलन, वगैरे वगैरे...
असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :
- १ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.
- बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे त्याचे स्वागताध्यक्ष होते.
- एक अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी या गावी २७-२८ फेब्रुवारी १९८८ या तारखांना झाले होते. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
- ३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.
- ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
- दलित साहित्य संमेलन, पुलगावला १९९० या वर्षी झाले. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
- २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.
- ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.
- ११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
- १२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.
- २०१७ साली ज्यावेळी डोंबिवलीत ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते त्या सुमारास कल्याणात ‘समरसता’ संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलनही पार पडले. या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे होते. या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात ११ ठराव पास करण्यात आले.
१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत ‘दलित’ऐवजी ‘आंबेडकरवादी साहित्य’ असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा. ८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये.
या ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली.
दलित साहित्य संमेलनातील भाषणे
[संपादन]- अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे (पुस्तक, संपादक - वामन निंबाळकर, प्रकाशक - प्रबोधन प्रकाशन, नागपूर- १९९१)