सत्यशोधकी साहित्य संमेलन
Appearance
सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात.
- महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते.
- भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले. श्रीराम गुंदेकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते तर बाबुराव गुरव हे याचे उद्घाटक होते. सत्यशोधकीय साहित्य लेखनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जयवंत गुजर यांना या संमेलनात 'रावबहादूर वंडेकर पुरस्कार' देण्यात आला. याचबरोबर अरुण शिंदे यांना 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार' तर नूतन माळवी यांना 'सावित्रीबाई फुले पुरस्कार' देऊन या सहाव्या सत्यशोध साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले.
- ८-९ मे २०१० या दिवसांत गेवराई(जिल्हा बीड) येथे ७वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. जी.ए. उगाले होते.
- सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
- त्यानंतरचे २रे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.
- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात १२ मार्च २०१५ रोजी पहिले महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष गणेश मुळे होते.
पहा : सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन; महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन