डून एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डून एक्सप्रेसचा शयनयान डबा

१३००९/१३०१० डून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी उत्तराखंड राज्याच्या देहरादून शहराला कोलकाता महानगरातील हावडा शहरासोबत जोडते. डून एक्सप्रेस दररोज हावडा रेल्वे स्थानक ते देहरादून रेल्वे स्थानकांदरम्यान धावते व १५७७ किमी अंतर ३५ तासांमध्ये पूर्ण करते. ही गाडी १९२५ सालापासून सुरू आहे.

बोगी[संपादन]

सध्या डून एक्सप्रेसला 1 वातानुकूलित 2 टायर, 3 वातानुकूलित 3 टायर, 11 श्ययन वर्ग, 3 बिना आरक्षित सामान्य, 2 बैठक कम प्रवास सामान बोगी अस्या एकूण 20 बोगी आहेत. या रेल्वेला खानपान व्यवस्था बोगी नाही. प्रवाश्यांच्या मागनी नुसार भारतीय रेल्वे वारंवार त्यांच्या अधिकारात रेल्वे सेवेत बदल करते.

सेवा[संपादन]

डून एक्सप्रेस तिचा जानेचा एकूण 1557 किमी प्रवास सरासरी तासी 44.59 की.मी वेगाने 34 तास आणि 55 मिनिटात करते आणि परतीचा तेवढाच प्रवास सरासरी तासी 45.13की.मी 34 तास आणि 30 मिनिटात करते. भारंतीय रेल्वेचे नियमांनुसार या रेल्वेचा सरासरी वेग तासी 55 की.मी पेक्षा कमी असल्याने या रेल्वेचे प्रवास भाड्यावर अधिभार समावेश नसतो. या रेल्वेचे कांही प्रवास मार्गाचे विधुतीकरण झालेले असल्याने ही रेल्वे हावडा जंक्शन पासून मुघळसराई जंक्शन पर्यन्त WAP 4चे सहायाने चालते आणि पुढील प्रवास मार्गाचे विधुतीकरण झालेले असल्याने लखनऊ किंवा तुघलकबाद नंतर ती WDM 3 Aचे सहायाने धावते.

वेळापत्रक[संपादन]

रेल्वे

क्रं.

प्रस्थान वेळ आगमन वेळ
13009 हावडा

जंक्शन [१]

20.30 hrs(IST) दररोज देहरादून 7.25 hrs (IST) तिसरा

दिवस

13010 देहरादून [२] 20.25 hrs(IST) दररोज हावडा

जंक्शन

6.55 hrs (IST) तिसरा

दिवस

मार्ग[संपादन]

ही गाडी पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्यातील बर्धमान, आसनसोल, धनबाद, गया, मुघलसराई, वाराणसी, फैजाबाद, लखनौ, हरदोई, बरेली, मोरादाबाद, हरिद्वार ह्या स्थानकांवरून धावते. या रेल्वेला उपासना एक्सप्रेस रेल्वे क्रं. 12327 / 28 या हावडा आणि देहरादून येथे मिळतात. [३]

अपघात[संपादन]

दि. 31 मे 2012 रोजी रुळावरून घसरल्याने या रेल्वेचा अपघात झाला. त्यात 5 प्रवाशी दगावले आणि 50 प्रवाशी जखमी झाले. [४]

दि . 28 एप्रील 2014 रोजी जफरगंज स्टेशन नजदीक उत्तर प्रदेश्यातील आंबेडकर नगर जवळ रेल्वे रुळावरून रेल्वे घसरल्याने अपघात झाला आणि त्यात 3 प्रवाशी ठार झाले आणि 6 जखमी झाले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हावडा जंक्शन आणि देहरादून दरम्यान केंद्र" (इंग्लिश भाषेत). २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "देहरादून आणि हावडा जंक्शन दरम्यान स्थानके" (इंग्लिश भाषेत). २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "डून एक्सप्रेस वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-08-23. २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "हावडा-देहरादून एक्सप्रेस डून" (इंग्लिश भाषेत). २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)