Jump to content

टिफनी ब्रार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टिफनी ब्रार

आई लेस्ली ब्रार
वडील तेज प्रताप सिंह ब्रार
गुरुकुल रामकृष्ण मिशन विवेकानंद विश्वविद्यालय, कोइंबतूर
व्यवसाय ज्योतिर्गमय फाउंडेशनची संस्थापक, विकलांगता अधिकार कार्यकर्ता
धंदा सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक
पुरस्कार भारताचे राष्ट्रपती, होलमन पारितोषिक कडून राष्ट्रीय पुरस्कार

टिफनी ब्रार या एक भारतीय समुदाय सेवा कार्यकर्त्या आहेत. सर्व वयोगटातील अंधांना जीवन कौशल्ये शिकवणाऱ्या ज्योतिर्गमाया फाउंडेशन [१] नामक संस्थेच्या या संस्थापक आहेत. त्या एक प्रशिक्षक, अपंगत्व जागृतीसाठी प्रचारक आणि सर्वसमावेशक समाजासाठी वकिली करणाऱ्या आहेत.[२] यांनी प्राणवायूच्या विषारी प्रभावामुळे लहानपणीच स्वतःची दृष्टी गमावली.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

[संपादन]

टिफरी ब्रार ही जनरल टीपीएस ब्रार आणि लेस्ली ब्रार यांची एकुलती एक मुलगी आहे.[३] टिफनीचा जन्म भारतातील चेन्नई येथे झाला. येथे तिच्या वडिलांची बदली झाली होती. ती पंजाबमध्ये लहानाची मोठी झाली.[४]

टिफनी ब्रारला टेरी सिंड्रोम झाला आणि ती तिच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आंधळी झाली.[१][५] तिच्या वडिलांच्या व्यवसायामुळे,[५] टिफनीने मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. ती अंध असल्यामुळे तिच्यासाठी शाब्दिक संवाद महत्त्वाचा होता. याच कारणास्तव ती बहुभाषिक झाली.[६][७]

तिच्या बालपणात, टिफनीला पाच भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता यायल्या लागल्या.[५] तिने तिचे शिक्षण ग्रेट ब्रिटनमध्ये सुरू केले. त्या वेळेस तिच्या वडिलांची बदली तेथे झाली होती.[१][४] जेव्हा तिचे कुटुंब भारतात परतले, तेव्हा टिफनी अंधांसाठीच्या शाळांमध्ये आणि लष्करी शाळांमध्ये शिकली.[५] केरळमध्ये तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिच्या वडिलांची दार्जिलिंगमध्ये बदली झाली, जिथे टिफनीने मेरी स्कॉट होम फॉर द ब्लाइंडमध्ये शिक्षण घेतले.[५]

एक अंध व्यक्ती म्हणून, टिफनी ब्रारला शाळा कठीण वाटली.[१] तिला वर्गाच्या मागच्या रांगेत बाजूला बसवले जायचे आणि कधीकधी तिला प्रश्नांची उत्तरे देण्याची परवानगी नसायची. तिच्या ब्रेल लिपीची पुस्तके काहीवेळा उशिरा आल्या तर काही वेला आल्याचे नाहीत.[१] तिला तिच्या पालकांनी आश्रय दिला आणि संरक्षित केले.[७]

तिच्या शाळेत, टिफनी ब्रारला इतर विद्यार्थ्यांद्वारे अलिप्तपणा अनुभवला. तिला बऱ्याच इव्हेंटमधून वगळण्यात आले. बारावीच्या वर्गात सीबीएसई बोर्डात तिने पहिला क्रमांक पटकावला.[४]

शाळा पूर्ण केल्यानंतर, टिफनी ब्रार यांनी २००६ मध्ये त्रिवेंद्रम येथील शासकीय महिला महाविद्यालयात इंग्रजी साहित्याची पदवी प्राप्त केली.[५] त्यानंतर २००९ मध्ये टिफनी ब्रार यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून ब्रेल विदाउट बॉर्डर संस्थेसाठी काम करण्यास सुरुवात केली.[५][८] त्यांनी विविध संस्थेबरोबर काम केले. तिथे त्या अनेक वंचित अंध लोकांना भेटल्या ज्यांना त्यांच्या घरात बंदिस्त केले होते आणि त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात नव्हते.[५] एका प्रवासादरम्यान त्यांना आढळले की रस्ते निसरडे आहेत किंवा दगडांनी भरलेले आहेत. यामुळे ते रस्ते अंध व्यक्तिंना वापरण्यालायक नव्हते. भारताच्या काही भागात काही सोसायट्यांमध्ये अंध लोकांना त्यांच्या घरात बंदिस्त केले आहे. त्यांनी अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी ज्योतिर्गमय फाउंडेशनची [१] स्थापना केली.[१] केरळमध्ये, दृष्टिहीन मुलांना मल्याळम, प्रादेशिक भाषेत सॉफ्टवेअरद्वारे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी विशेष शाळा नाहीत. तसेच त्यांना ब्रेल किंवा इंग्रजी भाषा शिकवली जात नाही. ही व्यवस्था बदलण्यासाठी ज्योतिर्गमय संस्थेचा प्रचार टिफनी ब्रार करतात.[८]

दोन वर्षे काम केल्यानंतर टिफनी ब्रार यांनी कोइंबतूर येथील श्री रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठातून विशेष शिक्षण (दृष्टिदोष विशिष्ट) मध्ये बी.एड केले.[४] जुलै २०१२ मध्ये त्यांनी अंधांसाठी मोबाईल शाळा ज्योतिर्गमय (म्हणजे "प्रकाशाकडे नेणारी") चालवायला सुरुवात केली. या संस्थेची कल्पना तामिळनाडूतील निवृत्त पोलीस अधिकारी एन. कृष्णस्वामी यांच्याकडून आली होती. यामार्गे गरीबी, अपंगत्व किंवा अंतराने विचलित झालेल्या मुलांना मदत करता येईल असा कयास होता.[८]

स.न. २०१८ मध्ये, भारत सरकारने वायनाडमध्ये आलेल्या पूरामध्ये केलेल्या कामासाठी टिफनी ब्रार यांची त्यांच्या कामासाठी प्रशंसा केली. येथे त्यांनी मदत शिबिरांसाठी साहित्य गोळा केले होते.[९]

टिफनी ब्रार आता संपूर्ण भारतात आणि परदेशात एकट्याने प्रवास करतात.[१०][११]

कारकीर्द

[संपादन]

टिफनी ब्रार यांची पहिली नोकरी रिसेप्शनिस्टची होती. त्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठात विशेष शिक्षणात बी.एड.चे शिक्षण घेतले आणि त्यानंतर जुलै २०१२ मध्ये ज्योतिर्गमय फाउंडेशन[१२] स्थापन केली. ही संस्था केरळमधील अंध आणि अंशतः दृष्टी नसलेल्यांना लोकांना मदत करण्याचे काम करते.[१३][१४]

टिफनी ब्रार यांनी अंध मुलांसाठी फिरती शाळा सुरू केली. त्या म्हणतात "जर अंध शाळेत जाऊ शकत नसेल तर शाळा त्यांच्याकडे गेली पाहिजे."[१५] कंठारी येथे नेतृत्वाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना या कल्पनेची प्रेरणा मिळाली. कंठारी येथील शिबिर जर्मन महिला सब्रीये टेनबर्कन आणि तिचा डच भागीदार पॉल क्रोनबर्ग यांनी चालवले होते.[३]

ज्योतिर्गमय फाउंडेशनच्या माध्यमातून, टिफनी अंध लोकांना ब्रेल, गतिशीलता, मूलभूत संगणक वापर आणि जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण देतात.[९] त्यांनी अलीकडेच एक प्रकल्प सुरू केला आहे, ज्याचे नाव रोड टू इंडिपेंडन्स आहे. या माध्यमातून केरळमध्ये प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात. त्या एक कलाकार, शिक्षिका आणि प्रेरक वक्ता आहे,[१६] त्यांनी डब्ल्यु.डब्ल्यु.एफच्या २०१६ मधील अर्थ अवर मोहिमेसाठी भारतामध्ये राजदूत म्हणून काम केले आहे.[१७] २०२० मध्ये त्या अमेरिकेतील लाइटहाऊस फॉर द ब्लाइंड अँड व्हिज्युअली इम्पेयर्ड्सकडून होलमन पारितोषिक मिळवणाऱ्या पहिली भारतीय बनल्या.[३] टिफनी ब्रार यांना २५००० डॉलरचे बक्षीस मिळाले. हे बक्षीस अंध आणि अंशतः दृष्टी नसलेल्या लोकांसह तिच्या कार्याला पुढे नेण्यासाठी दिले होते.[३]

स.न. २०१९ मध्ये, टिफनी ब्रार यांनी तिरुवनंतपुरममध्ये अंध-अपंग मुलांसाठी बालवाडी आणि अंगणवाडी उघडली. याचे उद्घाटन केरळच्या , जे के शैलजा, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.[१८]

त्रिवेंद्रम, २०१८ मध्ये निषेध करताना टिफनी ब्रार
२०१७ मध्ये ब्रसेल्स, बेल्जियम येथील युरोपियन संसदेत जगभरातील सामाजिक परिवर्तन निर्मात्यांविषयी माहितीपट दाखवताना टिफनी ब्रार उपस्थित होत्या.

टिफनी ब्रार यांनी टिफी टेम्पलेटची रचना केली. याचा आविष्कार पॉल डिसूझा यांनी केला होता. अंध लोकांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्यापासून रोखण्यासाठी भारतीय चलनी नोटांची ओळख करून देणारा हा एक छोटा साचा आहे.[१९][२०]

पुरस्कार

[संपादन]
चित्र:Tiffany Brar receiving National Award from the President of India,Dr.Ram Nath Kovind.jpg
भारताचे माननीय राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करताना टिफनी ब्रार
 • २०१२ मध्ये त्यांना सामाजिक कार्यकर्त्यासाठी केरळ राज्य पुरस्कार मिळाला.
 • २०१५ मध्ये त्यांना होप ट्रस्टकडून वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.
 • २०१६ मध्ये त्यांना रोटरी इंटरनॅशनलचा सर्वोच्च पुरस्कार फॉर द सेक ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला.
 • २०१६ मध्ये त्यांना प्रतिष्ठित सार्थक नारी महिला अचीवर्स पुरस्कार मिळाला.
 • २०१७ मध्ये त्यांना दूरदर्शनकडून बोल्ड आणि ब्युटीफुल पुरस्कार मिळाला.
 • २०१७ मध्ये त्यांना सरोजिनी त्रिलोक नाथ-नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडकडून राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आदर्श मॉडेल पुरस्कार मिळाला.
 • २०१७ मध्ये त्यांना टेड-एक्स वाझ्थाचाउड द्वारे एज ऑफ अज्ञात पुरस्कार मिळाला.
 • २०१७ मध्ये त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून 'सर्वोत्कृष्ट आदर्श' म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[१८]
 • २०१८ मध्ये त्यांना जॉब डे फाउंडेशनकडून वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना रोटरी इंटरनॅशनल कडून मेक ए डिफरन्स पुरस्कार मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना वुमन ऑफ व्हिजन केरळ वनिता रथना पुरस्कार मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना पद्मश्री मामूटीकडून फिनिक्स पुरस्कार मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना रोटरी इंटरनॅशनल कडून व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना विवेक ओबेरॉय, ओमंग कुमार आणि हुमा कुरेशी यांच्याकडून झी टिव्ही द्वारे रिअल हिरो पुरस्कार मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना पाम इंटरनॅशनल कडून उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यासाठी कर्म रथना पुरस्कार मिळाला.
 • २०१८ मध्ये त्यांना नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल्स कडून हॅलेन केलर पुरस्कार मिळाला, माननीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी दिला.[९]
 • २०९८ मध्ये त्यांना जॉन अब्राहमने प्रदान केलेल्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडकडून नीलम खुर्शीद कांगा पुरस्कार मिळाला.[२१]
 • २०१९ मध्ये त्यांना लेडीज सर्कल इंडियाकडून तिच्या समुदाय सेवेसाठी वंडर वुमन पुरस्कार मिळाला.
 • २०१९ मध्ये त्यांना कोचोसेफ चितिल्लापिल्ली फाउंडेशन कडून सामाजिक सेवेतील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार मिळाला, जो कोचोसेफ चितिल्लाप्पिल्लीने दिला .
 • २०१९ मध्ये त्यांना महिलांना आर्थिक व्यासपीठाकडून जगाला एक चांगले स्थान पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठित महिला मिळाल्या.
 • २०१९ मध्ये त्यांना द इंटरनॅशनल अलायन्स फॉर वुमन, ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड ऑफ डिफरन्स इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला.
 • २०१९ मध्ये त्यांना नेदरलँडमधील व्हॉइस फ्रॉम ज्योतिर्गमाया प्रकल्पासाठी द स्पिंडल पुरस्कार मिळाला.
 • २०२० मध्ये त्यांना वर्ल्ड पल्स, यूएसए कडून स्पिरिट अवॉर्ड्स मिळाले.
 • २०२० मध्ये त्यांना दी हॉलमॅन पारितोषिक[२२] लाईटहाऊस फॉर द ब्लाइंड, यूएसए कडून मिळाले.[३]
 • २०२१ मध्ये त्यांना नॅसकॉम कडून प्रेरणादायी महिला पुरस्कार मिळाला.

संदर्भ

[संपादन]
 1. ^ a b c d e f g "Tiffany's next, pre-school for visually impaired kids" (इंग्रजी भाषेत). Tribuneindia News Service. 12 June 2019. 2 April 2021 रोजी पाहिले.
 2. ^ "Welcome to Jyothirgamaya Foundation! | Jyothirgamaya". www.jyothirgamayaindia.org. 2017-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-28 रोजी पाहिले.
 3. ^ a b c d e "Tiffany Brar bags Holman Prize 2020". The New Indian Express. 30 August 2020. 2 April 2021 रोजी पाहिले.
 4. ^ a b c d George, Sanu (10 June 2019). "Visually challenged Tiffany Brar has big vision" (इंग्रजी भाषेत). thehansindia.com. 4 April 2021 रोजी पाहिले.
 5. ^ a b c d e f g h Krishnan, Madhuvanti S. (7 January 2016). "From darkness to light". The Hindu (इंग्रजी भाषेत). 1 April 2021 रोजी पाहिले.
 6. ^ "Dispelling Darkness- Jyothirgamaya Foundation's Tiffany Brar". The New Indian Express. 2016-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-02 रोजी पाहिले.
 7. ^ a b Koshy, Sneha Mary (5 September 2015). "Visually Impaired Teacher Helps Others See the World". NDTV.com.
 8. ^ a b c Ramadurai, Charukesi (29 August 2013). "India's mobile school for blind students puts empowerment on the curriculum | Charukesi Ramadurai". The Guardian. 4 April 2021 रोजी पाहिले.
 9. ^ a b c "Tiffany Brar of Jyothirgamaya Foundation gets Mindtree Helen Keller Award". The New Indian Express. 4 December 2018. 2 April 2021 रोजी पाहिले.
 10. ^ "From darkness to light". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2016-01-07. ISSN 0971-751X. 2016-05-02 रोजी पाहिले.
 11. ^ "Tiffany Brar". YouTube. 10 November 2017. 10 May 2021 रोजी पाहिले.
 12. ^ "Behold a world unseen". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2012-07-23. ISSN 0971-751X. 2016-01-28 रोजी पाहिले.
 13. ^ "They Say the Blind Should Not Lead the Blind. She Proves Them Wrong". The Better India (इंग्रजी भाषेत). 2015-12-22. 2016-05-02 रोजी पाहिले.
 14. ^ "Tiffany Brar, the blind woman who now lead other people through 'Jyothirgamaya' - MotivateMe.in". MotivateMe.in (इंग्रजी भाषेत). 2016-01-07. 2016-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-02 रोजी पाहिले.
 15. ^ "A Star Named 'Tiffany'". The Citizen. 2016-01-28 रोजी पाहिले.[permanent dead link]
 16. ^ "Dispelling Darkness- Jyothirgamaya Foundation's Tiffany Brar". The New Indian Express. 8 March 2016. 4 April 2021 रोजी पाहिले.
 17. ^ "Interview Of The Week: Outshining The Darkness - Trivandrum News | Yentha.com". www.yentha.com. 2016-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-02 रोजी पाहिले.
 18. ^ a b "This 28-year-old woman plans to change lives of visually-challenged children of Trivandrum". The New Indian Express. 29 July 2019. 2 April 2021 रोजी पाहिले.
 19. ^ "TIFFY TEMPLATE: NOW, NO CHEATING THE VISUALLY IMPAIRED!". 10 May 2021 रोजी पाहिले.
 20. ^ "Bengaluru man invents device to help the blind distinguish fake currency". Deccan Chronicle. 31 January 2017.
 21. ^ Chandran, Cynthia (18 July 2019). "Thiruvananthapuram: Tiffany to start 'school' for visually challenged" (इंग्रजी भाषेत). Deccan Chronicle. 4 April 2021 रोजी पाहिले.
 22. ^ "This Kerala-based visually-challenged activist vows to empower disabled". The New Indian Express. 2021-06-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]