झरी जामणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झरी-जामणी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
झरी जामणी तालुका
झरी जामणी तालुका
Jharijamanitaluka.JPG
महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील झरी जामणी तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा यवतमाळ जिल्हा
जिल्हा उप-विभाग वणी उपविभाग
मुख्यालय झरी जामणी

क्षेत्रफळ ७५१ कि.मी.²
लोकसंख्या ७२१५५ (२००१)
साक्षरता दर ४१०२६ (पुरुष - २६६०९, स्त्री - १६४१७)

तहसीलदार श्री एस.एम. कुमरे
पर्जन्यमान १०४०.५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

झरी जामणी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याची निर्मिती १९९७ साली करण्यात आली. तालुक्याचे मुख्यालय झरी या गावात आहे. येथून सुमारे ३ कि. मी. अंतरावर जामणी गाव आहे. या दोन गावांच्या संयुक्त नावाने या तालुक्याचे नाव झरी जामणी असे ठेवण्यात आले. महत्त्वाची सर्व कार्यालये, विद्यालये, महाविद्यालय झरी गावात आहेत. झरी जामणी तालुक्यात एकूण १५४ गावे असून ३४ पाडे आहेत. तालुक्यात कापूस, ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, इ. पिके घेतली जातात तर मोह, तेंदू, डिंक हे महत्त्वाचे गौण वनोपज येथे आहेत. झरी जामणी तालुक्यात कोलाम, गोंड, परधान, आंध या आदिवासी समाजाचे लोक बहुसंख्येने राहतात. तालुक्यातील पिवरडोल, चालबर्डी, अडेगाव, कायर, माथार्जुन आदी ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिरे आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ